कोल्हापूर,
दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय): शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 10 वी पास दिव्यांग
विद्यार्थ्यांकरिता केंद्र शासनाच्या योजनेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग व
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती शासकीय
तंत्रनिकेतनच्या प्राचार्यानी दिली.
व्यावसायिक प्रशिक्षण वर्गामध्ये (फक्त
कोल्हापूर जिल्हा दिव्यांग व्यक्तींसाठी) कार्यालयीन सहायक (संगणकीय), मोबाईल
दुरूस्ती व शिलाई काम (पुरूष/स्त्री) असे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत.
या प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या किमान 5 प्रशिक्षणार्थींनींसाठी
प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील. प्रशिक्षणार्थींकडून कोणत्याही प्रकारची फी
आकारली जाणार नाही. आवश्यक उपकरणे व साहत्य पुरविण्यात येईल. तसेच प्रवास भत्ता,
विद्या वेतन व इतर सोयी सुविधा केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षणार्थींस
देण्यात येईल.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी
(राज्यस्तरीय प्रवेश) स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, यंत्र
अभियांत्रिकी, औ. अणुविद्युत व माहिती तंत्रज्ञान या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 5
विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना
शैक्षणिक फी माफ असून वसतिगृह, भोजन व भत्ता मोफत आहे. तसेच विद्या वेतन, पुस्तके,
स्टेशनरीसाठी भत्ता अशा सोयी येथे उपलब्ध आहेत.
इच्छूक दिव्यांग विद्यार्थ्यांनी अधिक
माहितीसाठी www.gpkolhapur.org.in व www.dtemaharashtra.gov.in या
संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनही संस्थेच्या प्राचार्यानी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.