कोल्हापूर
दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय):- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन
दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05
वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या समारंभास सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई
वडील तसेच कोरोना योध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या
आजारावर मात केलेले नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले आहे.
या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर
कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु
नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ
करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्या नंतर
आयोजित करावा. दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सर्व सार्वजनिक व शासकीय इमातींवर, तसेच
ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.
सामुदायिक देशभक्तीपर गीतगायन, वाद विवाद
स्पर्धा, प्रश्नमंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धा, एखाद्या विषयाचा वेबीनार
अशा कार्यक्रमांचे अंतर्भाव असलेले खास कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांमार्फत
ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावे.
स्वातंत्र्य दिनाचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त
प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याबाबत तसेच कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर ठेऊन व याबाबतच्या सर्व नियमांचे
पालन करण्याबाबत तसेच प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.