** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 12, 2020

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


 

कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, बावणी बंधाऱ्यावर पाणी आल्याने आयटीआय पाचगाव मार्गे वाहतुक सुरू.   

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू, रांगोळी ते इचलकरंजी रस्त्यावर पाणी आल्याने बोरगाव, जंगमवाडी मार्गे वाहतुक सुरू.

गगनबावडा तालुक्यातील आंदूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने अणदूर, मणदूर, वेतवडे, बालेवाडी मार्गे वाहतुक सुरू.

शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु. धरणगुत्ती गावाजवळ पाणी आल्याने जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरू.

कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु. सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने कौलगे हमीदवाडा खडकेवाडा मार्गे वाहतूक सुरु.

पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.