कोल्हापूर,दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा व्यतिरिक्त निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स
आणि इतर अदरातिथ्य सेवा देणारे लॉज, गेस्ट
हाऊस 33 टक्के क्षमतेसह उद्या दिनांक 8 जुलै पासून अटी व शर्तींना अधिन राहून सुरु
करण्यास परवानगी देण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिला.
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती
व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दिनांक
6 जुलै मधील आदेशामध्ये
निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स आणि इतर अदरातिथ्य सेवा देणारे लॉज, गेस्ट
हाऊस 33% क्षमतेसह प्रतिबंधीत क्षेत्रा व्यतिरिक्त दिनांक 08/07/2020 पासून सुरु
करण्यास सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे.
निवास
व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स आणि इतर आदरातिथ्य सेवा देणारे लॉज, गेस्ट हाऊस इत्यादींसाठी आवश्यक अटी व सेवा शर्ती
पुढीलप्रमाणे-
कोविड -19 विषयी
प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स / स्टँडिज / एव्ही मीडिया (ऑडीओ-व्हीज्युअल) या माध्यमातून
मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे दिसतील अशा पध्दतीने ठळक अक्षरामध्ये दर्शनी भागामध्ये
लावावीत. या आस्थापनांमध्ये व त्याच्या बाहेरील आवारात जसे की पार्किंग व इतर मोकळ्या जागा यामध्ये गर्दी होणार नाही यासाठी योग्यती व्यवस्था करावी.
सामाजिक अंतर राखण्यासाठी बैठक व्यवस्थेच्या
ठिकाणी तसेच बाहेरील बाजूस रांगासाठी व बसण्याच्या व्यवस्थेसाठी विशिष्ट खुणा व सूचनांच्या माध्यमातून व्यवस्था
करावी.
आस्थापनेच्या प्रवेशव्दारामध्ये थर्मल स्क्रीनिंगची तरतूद करणे. स्वागत कक्ष
/ ठिकाणी संरक्षक काच बसविणे आवश्यक आहे. अतिथींसाठी पेडल ऑपरेट डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स / ऑटोमॅटीक सेन्सर असलेले
डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स स्वागत कक्ष, अतिथी
खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी , पार्कीग इत्यादी) विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत. चेहरा झाकणारे कव्हर / मास्क, ग्लोव्ह्ज इ. योग्य वैयक्तिक संरक्षणासाठी
निर्धारित केलेली साधने, आस्थापनेव्दारे अतिथींना व कर्मचारी यांना उपलब्ध करुन द्यावीत. संपर्क टाळण्यासाठी आस्थापनांमध्ये चेक-इन, चेक-आउट आणि इतर सर्व
सुविधांसाठी क्यूआर कोड, ऑनलाइन फॉर्म, डिजिटल पेमेंट्स, इ-वॉलेट इत्यादी सारख्या प्रणालींचा
वापर करावा. सामाजिक अंतराचे योग्य निकष पाळण्यासाठी लिफ्टमधील अतिथींची संख्या मर्यादित
ठेवावी.
वातानुकूलन संयंत्रणांचे बाबतीमध्ये CPWD (सेंट्रल
पब्लिक वर्कस डिपार्टमेंट) यांनी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे
जसे की, वातानुकूलीत यंत्रांचे तापमान हे 24-30 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत ठेवावे,
सापेक्ष आर्द्रता 40- 70 % च्या श्रेणीत असावी, शक्य तितकी हवा खेळती राहील याची व्यवस्था
करावी.
कोणतीही कोरोना सदृष्य आजराची लक्षणे नसलेल्या अतिथींना आस्थापनांमध्ये प्रवेश देणे
बंधनकारक असेल. आस्थापनांमध्ये
केवळ चेहरा कव्हर / मास्क वापरत असलेल्या अतिथींना प्रवेश देणे. तसेच वरील सर्व ठिकाणी चेहरा कव्हर / मास्क नेहमीच
परिधान करणे बंधनकारक असेल. स्वागत कक्षाच्या
ठिकाणी अतिथीचा / प्रवाशांचा संपूर्ण तपशील जसे की प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती
इ., फोटो असलेल्या ओळखपत्र आणि स्वयंघोषणा
पत्रासह सर्व माहिती नोंदवही मध्ये नोंदविणे बंधनकारक असेल. अतिथी / प्रवाशांनी आरोग्य
सेतु ॲप सक्तीने वापरणे बंधनकारक असेल. अतिथींना आस्थापनांमधील सेवांचा कमीत कमी
वापर करण्यास प्रोत्साहित करावे.
निवास व्यवस्था असलेल्या
आस्थापनांमधील रेस्टॉरंटससाठी निर्गमित
केलेल्या खालील तपशीलवार मार्गदर्शक सूचनांचे
पालन करणे बंधनकारक असेल.
सामाजिक अंतर सुनिश्चित
करण्यासाठी आसन व्यवस्था पुनर्रचित करणे. मेनू कार्ड ऐवजी ई-मेनू आणि डिस्पोजेबल पेपर,
नॅपकिन्स यांचा वापर जास्तीत जास्त करावा. एकत्र बसणेच्या टेबलाऐवजी (Dine-in) खोलीतील
सेवा किंवा टेक-अवे यांचा जेवणांच्या जागेसाठी वापर करावा. फक्त निवासी अतिथींसाठी / निवासी प्रवाशांसाठी रेस्टॉरंटस् उपलब्ध करून देणेत यावे.
आस्थापनांमधील गेमिंग आर्केड / मुले खेळण्याचे क्षेत्र / जलतरण तलाव / करमणूक
केंद्रे / सार्वजनिक कार्यक्रम/ व्यायामशाळा (जेथे लागू असेल त्या ठिकाणी ) बंद ठेवणे
बंधनकारक असेल. आस्थापनांच्या आवारामध्ये
मोठी संमेलने / एकत्र येणे. हे कायमच
निषिद्ध राहील. तथापि जास्तीत जास्त 15 सहभागींच्या अधीन असलेल्या 33% क्षमतेवरील मीटींग
हॉल / कॉन्फरन्स हॉलचा वापर करण्यास परवानगी असेल.
ड)
साफसफाई, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण :
आस्थापनांमध्ये प्रत्येक वेळी
अतिथी / निवासी प्रवासी यांनी खोली सोडल्यानंतर
त्यांनी वापर केलेल्या खोल्या आणि इतर सेवा / जागांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे
बंधनकारक असेल. अतिथी / प्रवासी / ग्राहक यांचा मुक्काम संपल्यानंतर ती खोली किमान
24 तास कोणत्याही इतर अतिथी / प्रवासी / ग्राहक यांना न देता रिकामी ठेवावी. अतिथी
/ प्रवासी / ग्राहक यांनी खोली सोडल्यानंतर सर्व प्रकारची कपडे, टॉवेल्स, बेडशीट ,
पिलो कव्हर बदलणे व निर्जंतुक करणे बंधनकारक असेल. आस्थापनांमधील स्वागत
कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी , पार्कीग इत्यादी) आवारात प्रभावी
आणि वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे. प्रामुख्याने शौचालये, स्वच्छतागृहे आणि
हात धुण्यासाठी असलेली ठिकाणे / क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणे बंधनकारक असेल.
आस्थापनांमधील स्वागत कक्ष,
अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी, पार्कीग इत्यादी) सर्व अतिथी सेवा क्षेत्रात
आणि सामान्य भागात वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागाची जसे की दरवाजाचे हॅण्डल, लिफ्ट
मधील बटण, रेलिंग, बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या, टेबल, स्वच्छतागृहातील सर्व ठिकाणी
यांची साफसफाई आणि नियमित निर्जंतुकीकरण 1% सोडियम हायपोक्लोराइट वापरून करणे बंधनकारक
असेल. ठराविक अंतराने सर्व वॉशरूमची साफसफाई, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक
असेल. आस्थापनांमध्ये
निवासी अतिथी / निवासी प्रवासी / निवासी ग्राहक यांनी वापरलेली तसेच कर्मचाऱ्यांनी
वापरलेली चेहरा कव्हर / मास्क / ग्लोव्हजची
योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक असेल.
आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीचे आस्थांपनांमधील
इतरांपासून विलगीकरण करण्यात यावे. अशा परिस्थितीमध्ये तात्काळ जवळचे रुग्णालय / क्लिनिक, अथवा जिल्हा तसेच राज्य हेल्पलाईन
क्रमांकावर तात्काळ माहिती कळविणे. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे
(जिल्हा आरआरटी / उपचार करणारे चिकित्सक) यांचेकडून जोखीम मूल्यांकन केले जाईल
आणि त्यानुसार प्रकरणामध्ये त्याचे / तिचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण आवश्यक असल्याने
व्यवस्थापना संदर्भात पुढील कार्यवाही सुरू केली जाईल.
जर व्यक्ती कोरोना सकारात्मक (कोरोना +ve) आढळली तर परिसर निर्जंतुकीकरण
करावा.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860
(45) याच्या कलम 188,
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे
फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.
000000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.