** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 7, 2020

आजअखेर 763 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 291 प्राप्त अहवालापैकी 261 निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर 1 अहवाल नाकारण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1012 पॉझीटिव्हपैकी 763 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 234 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 29 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, चंदगड-3, गडहिंग्लज-1, हातकणंगले-1, करवीर-6, शिरोळ-3, नगरपरिषद क्षेत्रातील -12 आणि इतर जिल्ह्यातील 1  असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 94, भुदरगड- 77, चंदगड- 117, गडहिंग्लज- 113, गगनबावडा- 7, हातकणंगले- 19, कागल- 58, करवीर- 36, पन्हाळा- 29, राधानगरी- 73, शाहूवाडी- 187, शिरोळ- 15, नगरपरिषद क्षेत्र- 107, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-59 असे एकूण 991 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, सातारा-2, रत्नागिरी-1, कर्नाटक-7, आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 21 असे मिळून एकूण 1012 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 1012 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 763 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 234 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.