कोल्हापूर,दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी
10 वाजेपर्यंत 747 प्राप्त अहवालापैकी 740 निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (एकाचा
दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आला आहे.) जिल्ह्यात आजअखेर एकूण 983 पॉझीटिव्हपैकी 761
जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 208 पॉझीटिव्ह रुग्ण
आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 6 पॉझीटिव्ह
अहवालापैकी चंदगड तालुक्यातील -3 आणि नगरपरिषद क्षेत्रातील -3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
पुढीलप्रमाणे - आजरा- 92, भुदरगड- 77, चंदगड- 114, गडहिंग्लज- 112, गगनबावडा- 7,
हातकणंगले- 18, कागल- 58, करवीर- 30, पन्हाळा- 29, राधानगरी- 73, शाहूवाडी- 187,
शिरोळ- 12, नगरपरिषद क्षेत्र- 95, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-59 असे एकूण 963 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक
-1, कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1 आणि सातारा-2 असे इतर जिल्हा व राज्यातील 20 असे
मिळून एकूण 983 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 983 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 761
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 14 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 208 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.