** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 8, 2020

जिल्ह्यातील 8 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु



कोल्हापूर, दि. 8 (जि.मा.का.) : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 राज्यमार्ग व 6 प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 
चंदगड तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर, आजरा, महागाव, हलकर्णी, खानापूर जिल्हा हद्दीपर्यंत रा.मा. क्र. 201 मार्गावर चंदगड इब्राहिम पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून कनुर, गवसे, इब्राहिमपूर, आडकूर प्रजिमा क्र. 66 प्र.जि.मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
आजरा तालुक्यातील प्रजिमा 52 पासून नवले देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, साळगाव राम क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा साळगाव बंधाऱ्यावर अर्धा फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून इजिमा 139 सोहाळे मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
कागल तालुक्यातील सोनाळी सावर्डे बु. सावर्डे खु. केनवडे,गोरंबे, आनुर, बस्तवडे प्रजिमा क्र. 46 मार्गावर बस्तवडे बंधाऱ्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून राज्यमार्ग 195 निढोरी मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
गगनबावडा तालुक्यातील  शेणवडे, अंदूर धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशिवडे बु., परिते प्र.जि.मा. क्र. 34 मार्गावर अंदूर बंधाऱ्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून  जनदूर मणदूर वेतवडे बालेवाडी प्रजिमा क्र. 25 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
चंदगड तालुक्यातील गुडवळे, खामदळे, हेरे सावर्डे हलकर्णी प्रजिमा क्र. 71 मार्गावर करंजगाव पुलावर 3 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पाटणे फाटा मोटणवाडी रा.मा. 189 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
आजरा तालुक्यातील नवले, देवकांडगाव, साळगाव प्रजिमा क्र. 58 मार्गावर साळगाव बंधाऱ्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून ODR 139 सोहाळे बाची मार्गे पर्यायी वाहतुक सुर आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, नुल, येणेचवंडी, नंदनवाड प्रजिमा 86 मार्गावर निलजी बंधाऱ्यावर 1 फूट पाणी आल्याने व नंदनवाड गावाजवळ पाणी आल्याने वाहतुक बंद असून प्रजिमा 80 वरून दुंडगे-जरळी-मुंगळी- नुल मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.