इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले धरणातून 4256 तर अलमट्टीतून 180000 क्युसेक विसर्ग सुरू

 

            कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे 4 व 5 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहेत. राधानगरी धरणात 232.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 व सांडव्यातून 2856 असा एकूण 4256  तर अलमट्टी धरणातून 180000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, शिरगांव, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. तुळशी नदीवरील बीड व आरे. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपन, ठाणे आळवे व यवलूज.  कुंभी नदीवरील- शेनवडे, वेतवडे, सांगरूळ व कळे. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगांव, चावरे व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली,निळपण व वाघापूर. हिरण्यकेशी नदीवरील-खणदाळ व निलजी. घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, आडकूर व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, कामेवाडी व कोवाड. असे एकूण 69 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 73.04 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 92.428 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 78.68 दलघमी, वारणा 834.95 दलघमी, दूधगंगा 614.79 दलघमी, कासारी 68.92 दलघमी, कडवी 60.89 दलघमी, कुंभी 63.55 दलघमी, पाटगाव 95.72 दलघमी, चिकोत्रा 28.64 दलघमी, चित्री 47.608 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा  44.17  दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 43.6 फूट, सुर्वे 41.0 फूट, रुई 71.7 फूट, इचलकरंजी 66.6 फूट, तेरवाड 58.6 फूट, शिरोळ 54.9 फूट, नृसिंहवाडी 54.6 फूट, राजापूर 42.3 फूट तर नजीकच्या सांगली 20.9  फूट व अंकली 28.3 फूट अशी आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.