इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यांवर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, चिखली ते राष्ट्रीय महामार्ग पाणी आल्याने वाहतूक बंद.  चिखली गावाच्या कमानी जवळ पाण्या आल्याने व प्रयाग पुल ते वरणगे रस्त्यावर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद, वरणगे, पाडळी, यवलुक, खुपिरे मार्गे वाहतुक सुरू. बाचणी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, कसबा बीड, घानवडे मार्गे वाहतूक सुरू, शिरोली गावाजवळ मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद. शिरोली, दुमाला, घानवडे, हसूर, दुमाला, सोनाळी ते चाफोडी मार्गे वाहतूक सुरू, महे पुलावर 4 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, महे गावापर्यंतची वाहतूक बालिंगा पाडळी व कसबा बीड करिता कुडित्रे कारखाना सांगरूळ मार्गे वाहतूक सुरू, कोगे बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद.कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बांलिगा पाडळी कोगे मार्गे वाहतुक सुरू, लहान पुलावर 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद, कोल्हापूर परिते मार्गे व बालिंगे पाडळी महे मार्गे वाहतुक सुरू, शेळकेवाडी गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद.

चंदगड तालुक्यातील चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. इब्राहिमपूर पुलावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, कनुरू गवसे मार्गे वाहतुक सुरू, करंजगाव पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद.  मांडेदुर्ग मोरीवर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, ढोलगरवाडी गौळवाडी मार्गे वाहतुक सुरू, तळगुळी सी. डी. वॅर्कवर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, कुदनुर पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद, ढोलकरवाडी सी. डी. वॅर्कवर  1.6 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. म्हळेवाडी व निट्टुर गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद, कोवाड ढोलकरवाडी गौळवाडी मार्गे वाहतूक सुरू. माणगाव के.टी. वीयरवर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. कोवाड गावाजवळ 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. काणूर व गवसे गावाजवळ 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद.  

गडहिंग्लज तालुक्यातील  भडगाव पुलावर 1.6 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, गडहिंग्लज आजरा नेसरी मार्गे वाहतुक सूरू. उंबरवाडी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद, सुळे महागाव मार्गे वाहतुक सुरू, निलजी बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद.दुंडगे, जरळी, मुंगळी, नूल मार्गे वाहतुक सुरू,  जरळी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, गडहिंग्लज, आजरा, नेसरी, महागाव मार्गे वाहतुक सुरू, हलकर्णी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद, बसरगे येनेचवंडी, नंदनवाड, हलकर्णी वाहतूक सुरू, कानडेवाडी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. नेसरी, अडकूर मार्गे वाहतुक सुरू.

भुदरगड तालुक्यातील हळदी गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद. परिते शेळेवाडी मार्गे वाहतूक सुरू.

हातकणंगले तालुक्यातील ऐतवडे पुलावर पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरु. रांगोळी ते इचलकरंजी रस्त्यावर 2.6 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद,जंगमवाडी, बोरगाव, इचलकरंजी अशी वाहतुक वळविण्यात आली आहे. इचलकरंजी जुन्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद, इचलरकंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरु. माणकापूर इचलकंरजी दरम्यान पाणी आल्याने माणकापूर शिवनाकवाडीमार्गे वाहतूक सुरू, निलेवाडी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद, वारणानगर चिकुर्डे मार्ग वाहतूक सुरु.

गगनबावडा तालुक्यातील मनवाडा बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, कोल्हापूर चिखली, पाडळी, येवलुज, बाजारभोगाव मार्गे वाहतूक सुरु.

शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु. धरणगुत्ती गावाजवळ 2 फूट पाणी आल्याने जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरू.

राधानगरी तालुक्यातील निढोरी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद, यमगे- निपाणी मार्गे वाहतूक सुरू, शिंदेवाडी गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद, निढोरी ते मुदाळ मार्गे वाहतूक सुरु. शिरगाव बंधाऱ्यावर 5 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, तारळे, राशिवडे  मार्गे वाहतूक सुरु.

कागल तालुक्यातील चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, कौलगे, हमीदवाडा, खडकेवाडा मार्गे चिखली वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु. सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद, हासुर बोळावी, ठाणेवाडी मार्गे देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. कुरकली पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, कोल्हापूर कुरुकली व हासुर करिता हळदी सडोली खालसा मार्गे वाहतूक सुरु आहे. चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद कौलगे हमीदवाडा खडकेवाडा मार्गे वाहतूक सुरु.

आजरा तालुक्यातील साळगाव बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, ओडीआर 139 सोहाळे, बाची मार्गे वाहतूक सुरू.

पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, पोहाळे- पोहाळेवाडी मार्गाने व मलकापूर यळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे वाहतूक सुरू. गोठे पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद मल्हार पेठ, सुळे, कोदवडे मार्गे वाहतूक सुरु. माजगाव पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू. केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने रस्ता बंद. गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.

शाहूवाडी तालुक्यातील डोणोली गावाजवळ बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, थेरगाव, सातर्डे सातवे शिंदेवाडी व थेरगाव सावर्डे, सातवे मार्गे वाहतूक सुरू. शिरगांव मठ ते सवतेमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, मलकापूर, सावे, बांबवडे, सुरुड मार्गे वाहतूक सुरू.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.