कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राधानगरी धरणात 235.69 दलघमी
पाणीसाठा आहे. आज सकाळी 7
वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र. 3 व 6 उघडले
आहेत. राधानगरी धरणातून 4256 तर अलमट्टी धरणातून 40922 क्युसेक पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला
आहे.
पंचगंगा
नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी,
तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील-
राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी
नदीवरील बीड, कासारी नदीवरील- बाजारभोगाव,
वालोली, पुनाळ तिरपन, ठाणे आळवे व यवलूज. कुंभी नदीवरील- सांगरूळ, वारणा नदीवरील-चिंचोली व माणगांव, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी,
सुळकूड व दत्तवाड असे एकूण 24 बंधारे पाण्याखाली
आहेत. नजिकच्या कोयना धरणात 76.82 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 112.294 टीएमसी इतका
पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 83.43 दलघमी, वारणा 846.21 दलघमी,
दूधगंगा 635.93 दलघमी, कासारी 64.49 दलघमी, कडवी 65.63 दलघमी, कुंभी 65.93 दलघमी,
पाटगाव 98.52 दलघमी, चिकोत्रा 30.26 दलघमी, चित्री 51.384 दलघमी, जंगमहट्टी 34.651
दलघमी, घटप्रभा 44.170 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060
दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी
पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 34.10 फूट, सुर्वे 34.10 फूट, रुई 65.10 फूट, इचलकरंजी 62
फूट, तेरवाड 56 फूट, शिरोळ 48 फूट, नृसिंहवाडी 46.10 फूट, राजापूर 35.7 फूट तर
नजीकच्या सांगली 12.6 फूट व अंकली 19.8
फूट अशी आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.