कोल्हापूर,दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): आज
सकाळी 10 वाजेपर्यंत 405 प्राप्त अहवालापैकी 380 निगेटिव्ह तर 16 अहवाल पॉझीटिव्ह
आहेत. तर 9 अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1252 पॉझीटिव्हपैकी 852
जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 375 पॉझीटिव्ह रुग्ण
आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 16 पॉझीटिव्ह
अहवालापैकी आजरा-1, चंदगड-1, हातकणंगले-1, करवीर-2, राधानगरी-1,
नगरपरिषदक्षेत्र-1, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 8 व इतर जिल्हा व राज्य -1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची
संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 96, भुदरगड- 80, चंदगड- 154, गडहिंग्लज- 127,
गगनबावडा- 7, हातकणंगले- 26, कागल- 59, करवीर- 67, पन्हाळा- 42, राधानगरी- 75,
शाहूवाडी- 191, शिरोळ- 24, नगरपरिषद क्षेत्र- 164, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-112
असे एकूण 1224 आणि जिल्हा व राज्यातील 28 असे मिळून एकूण 1252 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात
संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1252 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी
852 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 25 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे
आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 375 इतकी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.