** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 14, 2020

खासगी रुग्णालयांनी रुग्ण सेवेसाठी सहकार्य करावे -सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर





कोल्हापूर,दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) :  इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित करु. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नॉन कोव्हिड रुग्णांवर खासगी रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयांनी पुढे येऊन रुग्ण सेवा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
       इचलकरंजी  येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाबाबत  आज आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी डॉ.‍ विकास खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील उपस्थित होते.
          राज्यमंत्री श्री. यड्रावकर यावेळी म्हणाले,  कोल्हापूरमधील सीपीआर कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी सीपीआरमधून संदर्भीत केलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास सुरु केले आहे. त्या प्रमाणेच इचलकरंजीतील खासगी रुग्णालयांनी नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढल्यास परिसरातील 40 रुग्णालयांना उपचारासाठी टप्या-टप्याने समावेश करुन घेतले जाईल. कोव्हिड विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही, ते म्हणाले.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनीही यावेळी निरामय, सेवाभारती, केअर अलायन्स यासारख्या खासगी रुग्णालयात रोटेशन प्रमाणे पाठविण्यात येणाऱ्या नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्याबाबत आवाहन केले.
          या बैठकीत आयजीएमच्या वरच्या मजल्यावर बाधित रुग्णांना  उपचारार्थ ठेवण्याचा  तसेच खालच्या मजल्यावर संशयितांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील हे समन्वयक म्हणून काम करतील. त्याचबरोबरच या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नॉन कोव्हिड रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे संदर्भीत करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.