** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 13, 2020

शिष्यवृत्तीच्या प्रलंबित अर्जावर कार्यवाहीसाठी 17 पर्यंत मुदत वाढ




कोल्हापूर,दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): सन 2019-20 या वर्षामधील जिल्ह्यातील पोस्ट मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन https://Mahadbtmahit.gov.in या संकेत स्थळावर महाविद्यालयीन संस्था स्तरावर प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जावर पुढील कार्यवाहीसाठी संस्थांना दिनांक 17 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.
संबंधित महाविद्यालयांनी दिव्यांग लाभ्यार्थ्यांनी (पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती दिव्यांग व्यक्तीसाठी) या योजनेंतर्गत भरलेल्या अर्जाची पडताळणी करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवावेत, असे आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.