** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 13, 2020

आजअखेर 859 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 449 प्राप्त अहवालापैकी 391 निगेटिव्ह तर 57 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर 1 अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1309 पॉझीटिव्हपैकी 859 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 424 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 57  पॉझीटिव्ह अहवालापैकी, गडहिंग्लज-5,  हातकणंगले-1, करवीर-14, पन्हाळा-8, शाहूवाडी-1, शिरोळ-3, नगरपरिषदक्षेत्र-14, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 11 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 96, भुदरगड- 80, चंदगड- 154, गडहिंग्लज- 132, गगनबावडा- 7, हातकणंगले- 27, कागल- 59, करवीर- 81, पन्हाळा- 50, राधानगरी- 75, शाहूवाडी- 192, शिरोळ- 27, नगरपरिषद क्षेत्र- 178, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-123 असे एकूण 1281 आणि जिल्हा व राज्यातील 28 असे मिळून एकूण 1309 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 1309 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 859 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 424 इतकी आहे.
0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.