** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, July 11, 2020

आजअखेर 810 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजेपर्यंत 552 प्राप्त अहवालापैकी 539 निगेटिव्ह तर 10 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोघांचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आहे तर 1 अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आला आहे.) जिल्ह्यात आजअखेर एकूण 1139 पॉझीटिव्हपैकी 810 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 305 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 10 पॉझीटिव्ह अहवालापैकी हातकणंगले -1, करवीर-3,  पन्हाळा-2, नगरपरिषद क्षेत्रातील -1, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात-2, जिल्हा व राज्यातील -1  असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 95, भुदरगड- 79, चंदगड- 137, गडहिंग्लज- 122, गगनबावडा- 7, हातकणंगले- 24, कागल- 59, करवीर- 50, पन्हाळा- 42, राधानगरी- 74, शाहूवाडी- 191, शिरोळ- 20, नगरपरिषद क्षेत्र- 132, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-81 असे एकूण 1113 आणि जिल्हा व राज्यातील 26 असे मिळून एकूण 1139 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 1139 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 810 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 24 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 305 इतकी आहे.
0000000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.