** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 13, 2020

व्यक्तिमत्व विकास ऑनलाईन सत्र मार्गदर्शनाचे आयोजन



 कोल्हापूर दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने बुधवार दि. 15 जुलै रोजी ऑनलाईन स्वयंरोजगाराबाबत व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे बेरोजगार युवकांना कमी भांडवलामध्ये वेगवेगळे उद्योग,स्वयंरोजगार कसा करता येईल याबाबत ऑनलाईन सत्राचे आयोजन केलेले आहे. कोरोना जागतिक महामारीमुळे तसेच संपूर्ण जनतेला संचारबंदी असलेने तरुण बेरोजगार युवकांना काम नसल्याने तसेच शासकीय व खाजगी कंपन्यामध्ये नोकरीची कमतरता असल्याने युवकांनी स्वयंरोजगार कसा करावा व स्वावलंबी कसे बनावे यासाठी ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे.
         जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात असून  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) संजय पवार व संदिप धनंजय úहे आपणांस मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या स्मार्ट फोनवर https://meet.google.com हे ऍ़प डाऊनलोड करुन https://meet.google.com/ons-upnk-mkv या लिंकवर ऑनलाईन जॉईन होवून मार्गदर्शन प्राप्त करावे. सकाळी 11.30 वा. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राची सुरूवात होणार असून जास्तीत-जास्त युवकांनी सहभागी होवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.