कोल्हापूर,
दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 75.61 दलघमी
पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून 2111 क्युसेक
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील-
इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. तसेच आज, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने
भरला आहे. नजिकच्या कोयना धरणात 31.99 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 68.149 इतका
पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 42.11 दलघमी, वारणा 401.30 दलघमी,
दूधगंगा 283.92 दलघमी, कासारी 30.46 दलघमी, कडवी 25.23 दलघमी, कुंभी 32.01 दलघमी,
पाटगाव 39.69 दलघमी, चिकोत्रा 16.83 दलघमी, चित्री 15.08 दलघमी, जंगमहट्टी 9.04
दलघमी, घटप्रभा 43.98 दलघमी, जांबरे 16.85
दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.5 फूट, सुर्वे 12.8 फूट, रुई
39.8 फूट, इचलकरंजी 35 फूट, तेरवाड 34.6 फूट, शिरोळ 27.9 फूट, नृसिंहवाडी 20.9
फूट, राजापूर 11.6 फूट तर नजीकच्या सांगली 7 फूट व अंकली 6.3 फूट अशी आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.