कोल्हापूर,दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी
10 वाजेपर्यंत 1136 प्राप्त अहवालापैकी 1113 निगेटिव्ह तर 18 अहवाल पॉझीटिव्ह
आहेत. (दोघांचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आहे तर 3 अहवाल नाकारण्यात आले आहेत.)
जिल्ह्यात आजअखेर एकूण 1082 पॉझीटिव्हपैकी 797 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजअखेर जिल्ह्यात एकूण 263 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 18 पॉझीटिव्ह
अहवालापैकी भुदरगड तालुक्यातील-1, चंदगड तालुक्यातील-3, गडहिंग्लज-2, हातकणंगले
तालुक्यातील-1, कागल तालुक्यातील-1, करवीर-3, शिरोळ तालुक्यातील-1, नगरपरिषद
क्षेत्रातील -3, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात-3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
पुढीलप्रमाणे - आजरा- 95, भुदरगड- 79, चंदगड- 121, गडहिंग्लज- 118, गगनबावडा- 7,
हातकणंगले- 22, कागल- 59, करवीर- 46, पन्हाळा- 32, राधानगरी- 73, शाहूवाडी- 188,
शिरोळ- 18, नगरपरिषद क्षेत्र- 125, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-75 असे एकूण 1058 आणि जिल्हा व राज्यातील 24 असे मिळून एकूण 1082 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात
संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1082 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 797
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 22 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 263 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.