** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 2, 2020

ई फायलिंगसारखे नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पाडावे - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी



-          
       कोल्हापूर,दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई फायलिंगसारखे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पाडावे. वकिलांनी काळानुसार बदलून इ-फायलिंगसारख्या तंत्रज्ञानाद्वारे दावे व केसेस दाखल करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी केले.
        सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व वकिलांना ई फायलिंगचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.  यावेळी जिल्हा न्यायाधीश 3 महेश जाधव, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.राउळ,  जिल्हा बारचे अध्यक्ष आर.बी.गावडे, सचिव गुरुप्रसाद माळकर जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक संभाजी पाटील, न्यायसंकुलातील कर्मचारी उपस्थित होते.
            जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाडगे म्हणाले, देश कोव्हिड-19 मुळे लॉकडाऊन झाला आहे. न्यायालयातील कामकाज नियमितपणे चालू करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने पक्षकारांची गैरसोय टाळणे व वेळेत प्रकरणे दाखल करण्याकरिता ई फायलिंग प्रशिक्षणाचा सर्व वकिलांना याचा चांगला फायदा होणार आहे.
      
0 0 0 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.