** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 1, 2020

आजअखेर 725 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 74 प्राप्त अहवालापैकी 58 निगेटिव्ह तर 15 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 865 पॉझीटिव्हपैकी 725 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 128 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 15 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा तालुक्यातील-2, गडहिंग्लज तालुक्यातील-1, कागल तालुक्यात-1, करवीर तालुक्यात-1, शिरोळ तालुक्यात-1,  नगरपालिका क्षेत्रातील-6 व इतर राज्यातील -3 असा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 81, भुदरगड- 76, चंदगड- 91, गडहिंग्लज- 105, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 58, करवीर- 26, पन्हाळा- 29, राधानगरी- 69, शाहूवाडी- 186, शिरोळ- 9, नगरपरिषद क्षेत्र- 48, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47 असे एकूण 848 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, सातारा-1,  कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 17 असे मिळून एकूण 865 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 865 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 725 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 128 इतकी आहे.
0 0 0 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.