कोल्हापूर,दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी
10 वाजेपर्यंत 327 प्राप्त अहवालापैकी 319 निगेटिव्ह तर 8 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 888 पॉझीटिव्हपैकी 729 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजअखेर जिल्ह्यात एकूण 147 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 8 पॉझीटिव्ह
अहवालापैकी चंदगड तालुक्यातील-1, कागल तालुक्यातील-1, शाहूवाडी तालुक्यातील-1,
कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील-3 व मुंबई-2 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
पुढीलप्रमाणे - आजरा- 81, भुदरगड- 76, चंदगड- 95, गडहिंग्लज- 105, गगनबावडा- 7,
हातकणंगले- 16, कागल- 58, करवीर- 26, पन्हाळा- 29, राधानगरी- 69, शाहूवाडी- 187,
शिरोळ- 10, नगरपरिषद क्षेत्र- 59, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-50 असे एकूण 868 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1 आणि
सातारा-2 असे इतर जिल्हा व राज्यातील 20 असे मिळून एकूण 888 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 888 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 729 रूग्णांना
डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ
दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 147 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.