** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 3, 2020

व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यातून 94 उमेदवारांची निवड



कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित केलेल्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय व्हर्च्युअल रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 156 उमेदवारांची प्राथमिक तर 94 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी दिली.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29 जून ते 1 जुलै या कालावधीत ऑन लाईन व्हर्च्युअल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे स्थलांतर झाल्याने उद्योग घटकांना मनुष्यबळाची कमतरता भासत होती. जिल्ह्यात सध्या काही अटी व शर्तीच्या आधारे सुरु झालेल्या औद्योगिक कंपन्या सुरु करण्यात आल्या असून उद्योगाना मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित रोजगार  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात 10 उद्योजकांना सहभाग घेतला.
रोजगार मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, बॅक ऑफीस, विमा सल्लागार, एजन्सी मॅनेजर, अकौन्टंट,डाटा ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, सीएनसी, व्हिएमसी,आयटीआय, डिप्लोमा,    बीई,फौन्ड्री, हेल्पर या 441 रिक्त पदासाठी 578 बेरोजगार उमेदवारांच्या दुरध्वनीद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. यापैकी 156 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली येऊन 94 उमेदवारांची  अंतिम निवड करण्यात आली आहे.
          भविष्यातही अशा प्रकारे व्हर्च्युअल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा मानस असून जिल्यातील आस्थापनांनी जास्तीत जास्त रिक्तपदांची मागणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑन लाईन नोंदणी करावी, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.