** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 3, 2020

महास्वयंम पोर्टलवर आधार व मोबाईल नंबर लिंक करण्याचे आवाहन



कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या ज्या उमेदवारांनी आधार व मोबाईल नंबर लिंक केलेला नाही अशा उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर आधार व मोबाईल नंबर लिंक करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी केले आहे.
        मेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आधार लिंक करण्यासाठी व नवीन नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.