** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 3, 2020

कृषि संजीवनी सप्ताहनिमित्त गुगल मीट लिंकद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन उमेश पाटील



        कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात कृषि संजिवनी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहात गुगल मीटद्वारे शेतकऱ्यांना कृषि विषयक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आहवान प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन संस्थेचे प्राचार्य उमेश पाटील यांनी केले आहे.     
            कृषि संजिवनी सप्ताहानिमित्त 1 ते 7 जुलै कालावधीत गाव पातळीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करुन शेतकऱ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान व शासनाच्या विविध योजनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. रामेतीमार्फत महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन आयोजित केले आहे.
        दि. 3 जुलै रोजी जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन गरज व कार्यपध्दती या विषयावर  कोल्हापूर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संग्राम धुमाळ, दि. 4 जुलै रोजी ट्रायकोग्रामा मित्र किडीचे उत्पादन तंत्रज्ञान व कीड नियंत्रणासाठी प्रभावी वापर या विषयावर नागपूर येथील प्रादेशिक केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे तंत्र अधिकरी प्रल्हाद कोल्हे, दि. 5 जुलै रोजी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राची सद्यस्थिती ,आव्हाने व उपाययोजना या विषयावर  शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विजयकुमार ककडे, ‍दि. 6 जुलै रोजी शाश्वत व स्वयंपूर्णविकासासाठी सेंद्रिय शेती या विषयावर श्री.सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र.कणेरीचे चेअरमन  प.पू.श्री.काडसिध्देश्वर महाराज मार्गदर्शन करणार आहेत.  3 ते 6 जुलै रोजी होणारे मार्गदर्शन सकाळी 11 ते 12-30 या वेळेत होणार आहे.  दि. 7 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना व व्यावसायिक संधी या विषयावर नाशिक येथील सहयाद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनीचे संचालक विलासजी शिंदे मार्गदर्शन करणार आहे.
            या मार्गदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील कृषि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावा.तसेच शेतकऱ्यांना/शेतकरी उत्पादक कंपनी, प्रतिनिधी यांना https://meet.google.com/oaw-rdzu-yys लिंक देवून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे.
 00 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.