** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 3, 2020

संघटित शेतकऱ्यांच्या माध्यातून जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पाची अमंलबजावणी - दशरथ तांबाळे



कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : शेतमालाच्या उत्पादनापासून ग्राहकापर्यंत सर्व घटक व त्यांची कार्याची साखळी अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह व स्पर्धात्मक बनविण्यासाठी राज्यात स्व. बाळासाहेब ठाकेर कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट ) प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात संघटित शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्मार्ट प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाचे अतिरिक्त संचालक दशरथ तांबाळे यांनी दिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसतंराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 1 ते 7 जुलै 2020 कालावधीत " कृषि संजीवानी सप्ताह " साजरा करण्यात येत आहे.  या सप्ताहात शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन योजना /तंत्रज्ञानाबाबत  प्रबोधन करण्यात येत  आहे. सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना गुगल मिटद्वारे दशरथ तांबाळे यांनी स्व. बाळासाहेब ठाकेर कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले.         
श्री. तांबाळे म्हणाले, शेत मालाची खात्रीशीर वितरण साखळी मजबूत झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक किफायतशीर दर मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी गट, संघ सोसायटी अथवा शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून संघटित होणे आवश्यक आहे. स्मार्टचा एकूण प्रकल्प रु 2100 कोटीचा असून त्यामध्ये 70 टक्के जागतिक बँक, 27 टक्के राज्य सरकार तर 3 टक्के हिस्सा खाजगी उदयोगाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यामातून उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाचा कालावधी 2021 ते 2026-27 असा 7 वर्षाचा आहे. कृषि विभागाच्या स्थित्यंतरानूसार यापूर्वी लागवड तंत्रज्ञान प्रसार, उत्पादकता वाढ, पीकपध्दती बदल व बाजारपेठेची उपलब्धता याबाबत यावर कृषि विभागाने काम केले असल्याचे ते म्हणाले.
            गुगल मीटद्वारे झालेल्या या उपक्रमात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हयासह  राज्यातील शेतकरी व कृषि अधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन संस्थेचे प्राचार्य उमेश पाटील यांनी केले.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.