इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १९ मे, २०१६



कन्यागत महापर्वकाल
यंत्रणांनी आराखडयानुसार कार्यवाहीस प्राधान्य द्यावे
                                   - जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी
कोल्हापूर दि. 18 : कन्यागत महापर्वकाल 2016 साठी  विविध विकासकामांसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्‌यानुसार जिल्हयातील सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे सांगून कन्यागत  महापर्वकाल बाबत सर्वदूर माहिती पोहचविण्याचे नियोजन व्हावे अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.
नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाल 2016 साठीच्या आराखड्यातील कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. बैठकीस आमदार उल्हास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, उपवनसरंक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. एस. पाटील, सहाय्यक नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 कन्यागत महापर्वकाल 2016 साठी पहिल्या टप्यात करावयाच्या सर्व कामांचे सुक्ष्म नियोजन करुन सर्व विभागांनी आपापला कृति आराखडयानुसार कार्यवाही करावी, यामध्ये कसल्याही प्रकारची हयगय करु नये, अशी सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली. या बैठकीत कन्यागत महापर्वकाल 2016 निमित्त करावयाची प्रसिध्दी, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, सी. सी. टिव्ही यंत्रणा, दळण वळण सुविधा आदीं बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.