इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

आजअखेर 46 हजार 928 जणांना डिस्चार्ज

 


       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3713 प्राप्त अहवालापैकी 3699 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 12 आहेत.(2 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन चाचणीचे 93 प्राप्त अहवालापैकी 91 निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.  खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 108 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 103 तर 5 पॉझीटिव्ह, असे एकूण 19 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार40 पॉझीटिव्हपैकी 46 हजार 928 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 434 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 19 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा 3, गडहिंग्लज- 1, हातकणंगले-1, कागल-1, करवीर-3, पन्हाळा-3, नगरपरिषद क्षेत्र-2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-3 व इतर शहरे व राज्य 2 असा समावेश आहे.

          आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 862, भुदरगड- 1227, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1459, गगनबावडा- 145, हातकणंगले-5282, कागल-1663, करवीर-5621, पन्हाळा- 1854, राधानगरी-1236, शाहूवाडी-1349, शिरोळ- 2499, नगरपरिषद क्षेत्र-7421, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 906 असे एकूण 46 हजार 736 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 304 असे मिळून एकूण 49 हजार 040 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 040 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 46 हजार 928 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 678 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 434 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

00000

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदारांची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र आवश्यक

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्ववार्षिक निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित झाला आहे. सदर निवडणूकीचे मतदान मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार असून मतमोजणी गुरूवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. 

मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त खालील नमुद कागदपत्रे आयोगाच्या निर्देशानुसार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

यामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायविंग लायसन्स), पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य/केंद्र शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य खाजगी उद्योग समूहांनी कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र, लोकसभा व राज्यसभा सदस्य/विधानसभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना निर्गमित केलेली अधिकृत ओळखपत्र, पदवीधर/शिक्षक मतदार संघामधील शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना संबंधित संस्थांनी निर्गमित केलेले ओळखपत्र, विद्यापीठाने निर्गमित केलेले पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.

00000

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्ववार्षिक निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित झाला आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार असून मतमोजणी गुरूवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. 

          या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे मा. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून  निर्देश प्राप्त आहेत.

मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

00000

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध सर्व्हेक्षण मोहीम सर्व सहभागाने यशस्वी करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 




संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान-  2020

 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : अदयापही निदाना पासून वंचित असणाऱ्या क्षयरोग कुष्ठरुग्ण, गृहभेटीव्दारे शोधून काढण्यासाठी रुग्णशोध मोहीम राबविण्याचे ठरविलेले आहे. कोव्हिड 19 च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाचे तुलनेत अत्यंत कमी झालेले आहे. भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक उपाययोजना म्हणून संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवावी. सर्व्हेक्षण मोहीमत कोव्हिड संशयित सापडल्यास त्यांची ही त्वरित तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.  

संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण मोहीम कुष्ठरुग्ण शोध अभियानाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे जिल्हा श्यल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी , सहायक संचालक, (कुष्ठरोग) डॉ.  पी. आर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ, डॉ. विनोद मोरे ,डॉ. प्रकाश पवारा, डी. टी. सी. वैद्यकीय अधिकारी डॉ.  मानसी कदम, डॉ. विनायक भोई समिती सदस्य उपस्थीत होते.

          जिल्हात 1डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020या दरम्यान मोहीम राबविण्यात येणार आहे. रुग्ण शोधण्याचे  प्रमाण वाढविणे, समाजामध्ये या रोगांबददल जास्तीत जास्त जनजागृती करणे. रोगाबददलची शास्त्रोक्त माहिती लोकांपर्यंत पोहचविणे लवकर निदान करणे रुग्णांना लवकरात लवकर उपचारावर घेणे. ही या मोहीमेची ध्येआहेत. 12 तालुक्यांतर्गत कार्यक्षेत्रांची एकूण 3482726 लोकसंख्या 696545 इतकी घरांची निवड करण्यात आलेली आहे. मोहीमेसाठी एकूण 2846 पथके 5692 इतके कर्मचारी काम करणार आहेत. मोहीमेसाठी कोल्हापूर ग्रामीण मधील 100 टक्के लोकसंख्या शहरी भागातील 30 टक्के  लोकसंख्या निवडलेली आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी संगणक सादरीकरणाद्वारे दिली.

          डॉ. कुंभार म्हणाल्या, एकूण 14 दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.  दररोज एका टिम नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात प्रत्येक पथकाद्वारे दर दिवशी 20 घरे शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. घरातील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल, महिला सभासदांची तपासणी आशा महिला स्वयंसेविकेमार्फत पुरुष सभासदांची तपासणी टीम मधील पुरुष कर्मचारी स्वयंसेवका मार्फत  करण्यात येईल. ऑटोरिक्षाव्दारे माइकिंग,पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके, पथनाट्य, आकाशवाणी वरील मुलाखती द्वारे या मोहिमेचे जनजागरण करण्यात येणार आहे.

क्षयरोगाची लक्षणे जसे-  दोन आठवडयापेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ.

 प्राथमिक टप्प्यात जर औषधे व्यवस्थित नाही घेतली तर औषधाला दाद देणारा (एम.डी.आर.टी.बी.) रोग होऊ शकतो. एम.डी.आर.टी.बी. चे त्वरीत निदान व्हावे म्हणून सी.बी.नेट मशीन सारखे अदयावत मशीन सी. पी.आर. सावित्रिबाई फुले हॉस्पिटल तर उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आय. जी. एम. हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपलब्ध आहे. या मशीनद्वारे 2 तासामध्ये टी.बी. आणि एम. डी. आर. (रिफाम्पसिन रेझिन्स्टन्ट ) आहे का नाही हे तपासले जाते. एच. आर. सी. टी. /एक्सरे/ सोनोग्राफी इ. तपासण्या जिल्हा क्षयरोग केंद्रात पूर्णपणे मोफत केल्या जातात.

कुष्ठरोगाची लक्षणे जसे- त्वचेवर,फिकट/लालसर,बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम येणे, जाड,बधीर,तेलकट,/चकाकणारी  त्वचा, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण पणे बंद करता ने येणे

लक्षणे असणा-या व्यक्तींनी मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वयंसेवकांकडून योग्य ती माहिती द्यावी स्वयंसेवकांकडून तपासणी करून घ्यावी. एच.आर.सी.टी./एक्स.रे/ सोनोग्राफी इ. निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या जिल्हा क्षयरोग केंद्रात पूर्णपणे मोफत केल्या जातात. लवकर निदान, उपचार तसेच रुग्ण पोषण आहार इत्यादी योजनांचा लाभ घेऊन जिल्हा क्षयमुक्त कुष्ठरोगमुक्त,निरोगी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी केले.

00000