इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

राधानगरी, इचलकरंजी आणि शिरोळ प्रत्येकी 1 नामनिर्देशनपत्र दाखल आज एकूण 150 इच्छुकांनी 293 नामनिर्देशनपत्र घेतले




कोल्हापूर दि. 30 (जि.मा.का.) :  जिल्ह्यातील राधानगरी, इचलकरंजी आणि शिरोळ मतदार संघात प्रत्येकी 1 नामनिर्देशनपत्र दाखल झाले. आजच्या दिवशी 150 इच्छुकांनी 293 नामनिर्देशनपत्र घेतले.
         राधानगरी मतदार संघात विजयसिंह कृष्णाजी मोरे, इचलकरंजी मतदार संघात अभिजीत महावीर खोत आणि शिरोळ मतदार संघात शिवाजी धोंडीराम संकपाळ या तिघांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजच्या दिवशी नामनिर्देशनपत्र घेतलेल्या इच्छुकांची नावे पुढील प्रमाणे-
271 -चंदगड मतदार संघ- 1) विलास शामराव देसाई (महेश नरसिंगराव पाटील यांच्यासाठी-1), 2) शंकर रामा कांबळे (भिमा संभाजी नंदनवाडे यांच्यासाठी -1), 3) रणजित विष्णू कांबळे (संग्रामसिंह कुपेकर ऊर्फ संग्रामसिंह भाग्यश्राव देसाई यांच्यासाठी) (2), 4) विजय राजाराम देसाई (गंधालीदेवी कुपेकर ऊर्फ गंधालीदेवी संग्रामसिंह कुपेकर यांच्यासाठी) (2) 5) भुजंग मख्णू नाईक (विनायक ऊर्फ अप्पी विरगोंड पाटील यांच्यासाठी) (1), 6) काशिनाथ हनमंत कांबळे (स्वत:साठी)(1), 7) शाबु बाळाप्पा लाडलक्ष्मीकर (स्वत:साठी) (1), 8) राजेश नरसिंगराव पाटील (स्वत:साठी) (1), 9) शिवानंद हुंबरवाडी (पाटील राजेश नरसिंगराव यांच्यासाठी) (1), 10) अभय नरसोजीराव देसाई (सुश्मिता राजेश पाटील यांच्यासाठी) (1) 11) प्रकाश रामचंद्र रेडेकर (स्वत:साठी) (1), 12) पंडीत बाबु कांबळे (सुभाष वैजू देसाई यांच्यासाठी) (1), 13) रमेश दत्तू रेडेकर (स्वत:साठी) (2), 14) सुनिता रमेश रेडेकर (स्वत:साठी) (2), 15) संतोष कृष्णा पाटील (स्वत:साठी) (2), 16) राजू संतु किटवाडकर (प्रभाकर मारुती खांडेकर यांच्यासाठी) (1), 17) केशव अजित खांडेकर (प्रभाकर मारुती खांडेकर यांच्यासाठी) (1), 18) स्वाती महेश कोरी (स्वत:साठी) (1), 19) बाळेश बंडू नाईक (स्वत:साठी) (1), 20) श्रीपतराव दिनकराव शिंदे (स्वत:साठी)-1, 21) उत्तम शंकरराव पाटील (गोपाळराव मोतीराम पाटील-4), 22) दिपक यमाजी कांबळे (सुभाष वैजु देसाई यांच्यासाठी-1), 23) योगेश इराना पाटील (अशोक काशिनाथ चराटी यांच्यासाठी-4), 24) रामचंद्र परशराम कांबळे (स्वत:साठी-1), 25) प्रितम प्रकाश पाटील (राजू संतू किटवाडकर-1) 26) उदयसिंह रामचंद्र चव्हाण (स्वत:साठी-2), 27) आप्पासाहेब बाबुराव भोसले (स्वत:साठी-2) अशा 27 जणांनी 40 अर्ज घेतले.
 272- राधानगरी मतदार संघ- 1) मिलींद केरबा चव्हाण-4, 2) प्रविण कोरगावकर-2, 3) सलीम सुलतान खाडे-2, 4) दिलीप आनंदा गुरव-2, 5) दत्तात्रय मारुती रावत-1, 6) शितल दत्तात्रय रावत-1, 7) विजय विष्णू सांडूगडे-2, 8) रवींद्र तुकाराम जाधव-4, 9) शांताराम मारुती तौंदकर-4, 10) गंगाराम मधुकर पाटील-2, 11) धनाजी महादेव खोत-4, 12) दिपसिंह आण्णासाहेब नवणे-1 एकूण 12 जणांनी 29 अर्ज घेतले.
273 -कागल मतदार संघ- 1) किशोर विजय सणगर  (हसन मियाँलाल मुश्रीफ यांच्यासाठी) (4)  2) नविद हसन मुश्रीम (स्वत:साठी) (4), 3) सिध्दार्थ नागरत्न (स्वत:साठी) (4), 4) सागर शंकर कोंडेकर (स्वत:साठी) (4), 5) लक्ष्मण शंकर उदगट्टे (स्वत:साठी) (4), 6) रवींद्र  तुकाराम कांबळे (स्वत:साठी) (4), 7) एकनाथराव बाबुराव देशमुख (स्वत:साठी) (4), 8)  संजय गुरुदास चौगुले (समजितसिंह विक्रमसिंह घाटगे यांच्यासाठी)  (4), 9) नंदकुमार आप्पाजी माळकर (नवैदिता समजितसिंह घाटगे यांच्यासाठी) (4), 10) राजेंद्र भिमराव जाधव (स्वत:साठी) (4), 11) कृष्णा हनमंत देसाई (स्वत:साठी) (4), 12) ॲड. दयानंद बाबासाहेब पाटील (स्वत:साठी) (4), 13) ॲड. दयानंद बाबासाहेब पाटील (राजश्री दयानंद पाटील यांच्यासाठी) (1) अशा अशा  13 जणांनी 49 अर्ज घेतले. 
 274- कोल्हापूर (दक्षिण) मतदार संघ- 1) बंडोपंत रामचंद्र मालप (स्वत:साठी) (1), 2) प्रकाश रामचंद्र कारंजकर (अमल महादेवराव महाडिक यांच्यासाठी) (4), 3) प्रकाश रामचंद्र कारंजकर (शौमिका अमल महाडिक यांच्यासाठी) (4), 4) डॉ. प्रगती रवींद्र चव्हाण (स्वत:साठी) (2) 5) अमर राजराम शिंदे (स्वत:साठी) (4), 6) सर्जेराव निवृत्ती भोसले (राजू केशव जाधव यांच्यासाठी) (2), 7) अजितसिंह धोंडीराम पराकटे (ऋतुराज संजय पाटील यांच्यासाठी) (4), 8)  अजितसिंह धोंडीराम पराकटे (सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासाठी) (4), 9) अजितसिंह धोंडीराम पराकटे (प्रतिभा सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासाठी) (4), 10) अजितसिंह धोंडीराम पराकटे (पृथ्वीराज संजय पाटील यांच्यासाठी) (4), 11) कुमार बाबुराव परुळे ( बंडू गोपाळ माने यांच्यासाठी) (1), 12) संतोष गणपती बिसुरे (स्वत:साठी) (2), 13) राजेंद्र बाळासो कोळी (स्वत:साठी) (1), 14) विक्रमसिंह सदाशिवराव जरग (स्वत:साठी) (2), 15) सुहेल रियाज शेख (स्वत:साठी) (1) अशा 15 जणांनी 40 अर्ज घेतले.  
275- करवीर मतदार संघ- 1) डॉ. प्रगती रवींद्र चव्हाण (स्वत:साठी-2), 2) युवराव वसंत पाटील (स्वत:साठी-2), 3) परिक्षित प्रताप कोंडेकर (प्रताप कृष्णात कोंडेकर-2), 4) युवराज नामदेवराव माने (चंद्रदिप शशिकांत नरके यांच्यासाठी-2), 5) अजित शशिकांत नरके (शैलेजा शशिकांत नरके यांच्यासाठी-2), 6) दिपक पंडीतराव पाटील (पांडुरंग निवृत्ती पाटील तथा पी.एन.पाटील यांच्यासाठी-4), 7) सुरेश शंकरराव तानुगडे (राहूल पांडुरंग पाटील यांच्यासाठी-4), 8) काशिनाथ दादू पाटील (डॉ. आनंदा दादू गुरव यांच्यासाठी-4), 9) प्रशांत बळीराम गुरव (काशिनाथ दादू पाटील-2), 10) लखन श्रीपती परीट (प्रदीप दादासाहेब पाटील यांच्यासाठी-3) अशा 10 जणांना 27 अर्ज घेतले.
276- कोल्हापूर उत्तर मतदार संघ- 1) डॉ. शिरीष रामकृष्ण पुणतांबेकर (स्वत:साठी-1), 2) अमित अरविंद अतिग्रे-2, 3) चंद्रकांत पंडीत जाधव-2, 4) अमित शामराव हुक्केरीकर-2, 5) सुभाष शांताप्पा शेटे-1, 6) इश्वर शिवपुत्र चन्नी-1, 7) शंकरलाल नंदलाल पंडीत-1, 8) राजेंद्र शंकरराव जाधव-1, 9) चंद्रकांत पांडुरंग भोसले-1 10) सर्जेराव निवृत्ती भोसले-2, 11) निवासी दत्तात्रय लाड-1, 12)शिवाजी लक्ष्मण तोडकर-1, 13) सलीम नुर महम्मद बागवान-1, 14) भरत देवराव पाटील-2, 15) देवेंद्र सुरेश जोंधळे-1, 16) संभाजी ऊर्फ बंडा माधवराव साळुंके-2, 17) संदीप दिगंबर जाधव-1, 18) सागर प्रल्हाद चव्हाण-1, 19) संजय दिनकराव माणगावकर-1, 20) अमित सुरेश आडसुळे-1 अशा 20 जणांनी 26 घेतले.
277- शाहूवाडी मतदार संघ-1) सत्यजित बाबासाहेब पाटील (2), 2) बाबासाहेब यशवंतराव पाटील (2), 3) स्वप्नील गणपतराव सातवेकर (3) 4) अविनाश शामराव केकरे (2), 5) संभाजी आनंदा यादव (2), 6) सुनील नामदेव पाटील (2), 7) अमोल निवृत्ती महापुरे (2)  अशा 7 जणांनी 15 अर्ज घेतले.
 278- हातकणंगले (अ. जा.राखीव) मतदार संघ- 1) संजय आण्णाप्पा कांबळे (स्वत्:साठी) (1), 2) ॲड. इंद्रजीत आप्पासाहेब कांबळे (स्वत्:साठी) (1), 3) प्रवीण बाबुराव जुगूळकर-कांबळे (स्वत्:साठी) (1), 4) अभिजीत सुरेश कांबळे (किरण सुकुमार कांबळे यांच्या साठी) (1), 5) अभिजीत सुरेश कांबळे ( शितल किरण कांबळे यांच्या साठी) (1),6) भगवानराव गणपतराव जाधव (राजूबाबा जयवंतराव आवळे यांच्यासाठी) (1), 7) सचिन चंद्रकांत शिरगावे (भास्कर महादेव शेटे यांच्यासाठी) (1), 8) मदन वजीर सरदार (स्वत्:साठी) (2), 9) कृष्णात ज्योती यशवंत (स्वत्:साठी) (1), 10) राजाराम वसंत कांबळे (प्रमोद गोविंद जाधव यांच्या साठी) (1), 11) राजाराम वसंत कांबळे (कृष्णात बापू सातपुते यांच्यासाठी) (1), 12) शशिकांत लिंगाजी कांबळे (संगीता चंद्रकांत हांडोरे यांच्यासाठी) (2), 13) ॲड. तेजस चिमाजी पठाणे (स्वत्:साठी) (1), 14) संदीप आकाराम दबडे (स्वत्:साठी) (1), 15) विनायक अशोक खोत (संदीप वसंत कांबळे यांच्यासाठी) (1), 16) शामराव जिन्नाप्पा गायकवाड (स्वत्:साठी) (2) अशा 16 जणांनी 19 अर्ज घेतले आहेत.
279 - इचलकरंजी मतदार संघ- 1) दत्तात्रय मारुती मांजरे (1), 2) बाळकृष्ण काशिनाथ म्हेत्रे (1), 3) प्रकाश कल्लाप्पा आवाडे (4), 4) राहूल प्रकाश आवाडे (4), 5) अभिजित महावीर खोत (2), 6) रमेश श्रावण कांबळे (1), 7) शाहुगोंडा सजगोंडा पाटील (1), 8) प्रकाश मारुती मोरबाळे (2), 9) संदोष दत्तात्रय कोळी ऊर्फ बाळमहाराज (1), 10) विद्यासागर देवाप्पा ऐतवडे (1), 11)  ईस्माईल अब्बास समडोळे (2) 12) ऋतुराज संजय शिंदे (1), 13) नितीन दिपील लायकर (2) 14) हेमंतकुमार हिरालाल राठी (1) अशा 14 जणांनी 24 अर्ज घेतले.  
280- शिरोळ मतदार संघ- 1) दिपक गुड्डाप्पा बन्ने (उल्हास संभाजी पाटील यांच्यासाठी) (1) 2) सुर्यकांत महालिंग मगदुम (उज्ज्वला उल्हास पाटील यांच्यासाठी) (1) 3) शिलकुमार महावीर चौगुले (अनिल बाळू मादनाईक यांच्यासाठी) (4) 4) श्रीपाल गुंडू बिंदगे (स्वत:साठी) (1) 5) विशाल आण्णासो लोहार (शिवाजीराव गोविंदराव धुमाळ यांच्यासाठी) (1)  6) जहीर अनवर पटेल (दादेपाशा अफजल पटेल यांच्यासाठी) (1)  7) रमेश मारुती बिरणगे (सुनील रामचंद्र खोत यांच्यासाठी) (2)  8) इम्रान युसूफ शेख (स्वत:साठी) (1)  9) नाथा शामराव (कांबळे) देशमुख (स्वत:साठी) (1) 10) दिलीप रामचंद्र गाडगीळ (दिलीपराव बाबुराव माने-पाटील यांच्याठी) (1), 11) सचिन साताप्पा  मजले (स्वत:साठी) (1)  12) सुरेश शंकर सासणे (स्वत:साठी) (1), 13) नवनाथ दत्तात्रय खोत (प्रमोद दादा पाटील यांच्यासाठी) (1), 14 ) अभिजित प्रकाश प्रभावळकर (राजवर्धन विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्यासाठी) (4)  15) ॲड. महेश नारायण जोशी (स्वत:साठी) (1)  16) बजरंग आप्पा कुंभार (स्वत:साठी)  (2)  अशा 16 जणांनी 24 अर्ज घेतले आहेत.
000000

1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त
मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
कोल्हापूर - 27 (जिमाका) : सामाजातील जेष्ठ नागरिक यांचे स्थान बळकट व सुस्थितीत  होण्यासाठी तसेच त्यांचा वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे जावा, समाजात त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे, आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने जेष्ठ नागरिक धोरण जाहिर केले आहे, अशी माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी दिली.
राज्यात जेष्ठ नागरिक धोरण जाहिर झाले असून, त्याला अनुसरुन राज्याचे सर्व समावेशक धोरण 2013 ची अंमलबजावणी करण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्थळ : ऑडिटोरिअम हॉल, सी.पी.आर. परिसर, कॅन्टीन जवळ, कोल्हापूर या दिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, छत्रपती प्रमिलाराजे शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिरामध्ये बी.पी., डोळे, दात, कान, नाक, घसा, ऑर्थो मानसोपचार समुपदेशन, फिजिओथेरपी, देह अवयव दान, हिमोग्लोबिन, ह्दय रोग, रक्त लघवी आदींची तपासणी या शिबीरात करण्यात येणार आहे. तसेच पोलिस विभागामार्फत मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येणार असून, एस.टी. महामंडळातर्फे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सवलतीचे पास देण्यात येणार आहे. तसेच तहसिलदार करवीर यांच्याकडून राज्य शासनाच्या योजनाबाबत माहिती दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त जेष्ठ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात येत आहे.
0000



राधानगरी धरणातून 400 क्युसेक विसर्ग जिल्ह्यात 1 बंधारा पाण्याखाली



 कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) :  राधानगरी धरणातून 400 क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयनेतून 2100 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 12.3 फूट होती. जिल्ह्यातील 1 बंधारा पाण्याखाली आहे.
राधानगरी धरणात आज अखेर 8.25 टीएमसी पाणीसाठा आहे.
 पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 105.15  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.45 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.76 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.69 टीएमसी, पाटगाव 3.69 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 12.3 फूट, सुर्वे 14.8 फूट, रुई 41 फूट, इचलकरंजी 37.6 फूट, तेरवाड 36.6 फूट, शिरोळ 29.6 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 17.3 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट अंकली 11.2 फूट अशी आहे.
00000

जिल्ह्यात पावसाची विश्रांती



            कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 1.67 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 31854.85 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.14 मिमी इतकी नोंद झाली.         
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
शाहूवाडी तालुक्यात 1.67 एकूण 3026.83 मिमी पाऊस झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000


ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन




कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अधिष्ठाता, छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत जागतिक ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन उद्या मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ऑडिटोरिअम हॉल, सी.पी.आर.येथे करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी दिली.
         या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बी.पी., डोळे, दात, कान, नाक, घसा, ऑर्थो, मानसोपचार, समुपदेशन, फिजिओथेरपी, देह/अवयव दान, हिमोग्लोबीन तपासणी, ह्दय तपासणी, रक्त व लघवी तपासणी इत्यादी तपासण्या घेण्यात येणार आहेत.  पोलिस विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांना मोफत कायदे सल्ला दिला जाणार आहे. एस. टी. महामंडळामार्फत ज्ये्ष्ठ नागरिकांकरिता सवलतीचे पास दिले जाणार आहेत. तहसिलदार  करवीर यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाच्या ज्या योजना चालू आहेत त्यांची माहिती दिली जाणार आहे.
            जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. कामत यांनी केले आहे.
0000

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

निर्भयपणे मतदान करा दिव्यांगांनीही आपला हक्क बजावावा - सोनाली नवांगुळ





कोल्हापूर,दि. 29 (जि.मा.का) : सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सुट्टीसाठी बाहेर न जाता निर्भयपणे प्रथम आपले मतदान करावे. दिव्यांगांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन युथ आयकॉन लेखिका, मुक्त पत्रकार सोनाली नवांगुळ यांनी केले.  
भारताच्या घटनेने मतदानाचा मोलाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी समजून बरेचजण पर्यटनाला जातात. परंतु त्या दिवशी सर्वप्रथम आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्यानंतर सुट्टीची मजा घ्यावी, असे सांगून सोनाली नवांगुळ म्हणाल्या, समाजाच्या, देशाच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. त्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. तो आपला हक्क, कर्तव्य आणि जबाबदारीही आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे.  जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हिल चेअर, रॅम्प, मदतनीस अशी सोय दिव्यांग मतदारांसाठी करण्यात आली आहे. अशा मतदारांनीही मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, त्यासाठी मी शुभेच्छा देते.
00000
                            

जांभुळनेवाडीत मतदान प्रतिज्ञा तर पोवारवाडीत सायकल रॅली गांवागावात होत आहे मतदार जागृती




कोल्हापूर,दि.29 (जि.मा.का) : मतदान जागृतीसाठी आज दिवसभरात जांभुळनेवाडीत मतदान प्रतिज्ञा, इचलकरंजीत पथनाट्या तर शिंदेवाडीत महिलांची मतदान जनजागृती फेरी संपन्न झाली. याबरोबरच जिल्ह्यात गांवागावातून तसेच शाळामधून विद्यार्थ्यांच्या रॅली, रांगोळी तसेच चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, सायकल रॅलींचेही आयोजन करण्यात आले.
विधानसभा निवडणूकीत अधिकाधिक मतदारांनी घराबाहेर पडून भारतीय लोकशाहीने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांनी ढवळून निघाला आहे. गावागावात लोक मतदान जागृतीचे विविध कार्यक्रम करुन घराघरापर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्याचं काम करीत आहेत. आज दिवसभरात जिल्हयातील अनेक गांवात मतदार जागृतीपर पालकसभा, पथनाट्य, जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, मतदान प्रतिज्ञा, चित्रकला स्पर्धांचे कार्यक्रम घेण्यात आले.
मतदार जागृतीच्या उद्देशाने आज जिल्ह्यातील अनेक गावात तसेच शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विद्यामंदिर कसबा ठाणे येथे जनजागृती रॅलीसह चित्रकला स्पर्धा, चंदूरच्या संजीवन विद्यामंदिराच्यावतीने प्रभातफेरी, इचलकरंजी येथे मतदार जागृतीपर पथनाटय सादर करण्यात आले, भुदरगड, विद्यामंदिर मोरेवाडी, विद्यामंदिर पडळ येथे रांगोळी स्पर्धा, केंद्रशाळा कोडोली येथे प्रभातफेरी, वारनुळ येथे चित्रकला स्पर्धा, जांभुळनेवाडी येथे मतदान प्रतिज्ञा तसेच पोवारवाडी येथे सायकल रॅली काढण्यात आली. मतदार जनजागृती प्रभातफेऱ्यामध्ये मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानासाठी वेळ काढा, मतदान आपला हक्क आहे, मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, अशा घोषणा देण्यात आल्या.
00000
                            



उत्पादन शुल्क विभागाचा छापा 3 लाख 26 हजार रुपायांची गोवा बनावटीची दारु जप्त



      कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) :  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील हेरे येथे आज छापा घातला. या छाप्यात 3 लाख 26 हजार 640 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. 
      याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.
          विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवैध दारु जप्त करण्यासाठी भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. आदर्श आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी अवैध मद्य विक्री, वाहतूक, साठा अशा ठिकाणी आणि सीमावर्ती भागात अवैद्य व्यवसायिकांवर या पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. चंदगड तालुक्यातील हेरे येथील राजेंद्र गवस यांच्या घरी अवैद्यरित्या विक्री करण्यासाठी गोवा बनावटीचा मद्य साठा असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली. भरारी पथकाने आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकला असता, घरालगताच्या अडगळीच्या खोलीत प्लॅस्टीक ताडपद्रीच्या खाली गोवा बनावटीचा विविध ब्रँडचा विदेशी मद्य साठा आढळून आला. अवैध रित्या मद्यसाठा केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
          जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये हायवर्डस फाईन व्हिस्की, मॅकडॉल नं.1, गोल्डन एस.ब्ल्यू व्हिस्की, इम्पोरियल ब्ल्यू व्हिस्की, टुबर्ग बिअर या ब्रँडच्या 750 व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले 58 बॉक्स आढळून आले आहेत. भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जनन्नाथ पाटील,किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
0 0 0 0 0


संशयास्पद बँक व्यवहाराबाबत सतर्क रहा खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांचे निर्देश



            कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : विधानसभा निवडणुकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या पथकाला दक्ष ठेवावे. विशेषत: बँकांमधील संशयास्पद खात्यातील व्यवहाराबाबत सतर्क राहून त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांनी आज दिले.
       येथील शासकीय विश्रामगृहात आज सकाळी 11 वाजता खर्च विषयक निवडणूक निरीक्षक शील आशिष, आर. नटेश, शादाब अहमद आणि जे. आनंद कुमार यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने, उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपाध्यक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सी व्हिजलचे  नितीन बांगर, आयकर विभागाचे उप नोडल अधिकारी महेश लोंढे आदी उपस्थित होते.
          सुरुवातीला जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी श्री. राजमाने यांनी सर्वांचे स्वागत करुन, सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाची माहिती दिली.  खर्च विषयक निरीक्षक श्री. आशिष यांनी सर्वप्रथम सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. यामध्ये आयकर विभागाच्या पथकाची तयारी, पोलीस दलाचे मनुष्यबळ, विविध पथके,समाज माध्यम सनियंत्रण, अवैध दारुवरील कारवाई, पेड न्यूज, मतदान जन जागृती मोहीम, बँक व्यवहार यांचा समावेश होता.  यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बँक पथकांनी अधिक सजग आणि दक्ष राहून संशयास्पद बँक व्यवहारावर करडी नजर ठेवावी. बँकांमधील संशयास्पद व्यवहाराबरोबरच नवीन खाते उघडणाऱ्यांच्या बाबतीतही दक्षता घ्यावी. तसेच पेटीएम वरुन होणाऱ्या संशयास्पद आणि मोठ्या रक्कमांच्या व्यवहाराबाबतही दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
          जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष आणि उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाबाबतची माहिती सर्व पथकांनी जिल्हास्तरीय  खर्च विषयक समितीला दररोज द्यावी. याकामी कुणीही हयगय करु नये अशी सूचना निरीक्षकांनी यावेळी दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलाने आवश्यकतेनुसार पथकांची निर्मिती करावी.


एमसीएमसीचे काम उल्लेखनीय - निवडणूक निरीक्षक शील आशिष
       जिल्ह्यासाठी कार्यरत असणाऱ्या एमसीएमसी समितीने गेल्या लोकसभा निवडणुकीतही उल्लेखनीय काम केले असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही जिल्हास्तरीय एमसीएमसी समितीमार्फत काम होईल असा विश्वास निवडणूक निरीक्षक शील आशिष यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले पेड न्यूज बाबतही एमसीएमसी समितीने अधिक दक्षतेने काम करावे.
पूर्वपीठिका निर्मिती चांगला उपक्रम
          जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी यावेळी उपस्थित खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांना प्रशासनाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेली निवडणूक पूर्वपीठिका दिली, व या पुस्तिकेबाबत माहिती दिली. यावर निवडणूक निरीक्षक शील आशिष म्हणाले, निवडणूक पूर्वपीठिका संदर्भासाठी तसेच मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी उपयुक्त असून, ही पुस्तिका निर्माण करुन कोल्हापूर जिल्ह्याने चांगले पाऊल उचलले आहे. या पुस्तिकेतील देण्यात आलेल्या माहितीचा मतदारांना, प्रसार माध्यमांना आणि अभ्यासकांना चांगला उपयोग होईल. या पुस्तिकेची सॉफ्ट कॉपी आवश्यक असणाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी. ही पुस्तिका मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. कोल्हापूर जिल्ह्यामधील चांगले उपक्रम होत आहेत. याची माहिती निश्चितच निवडणूक आयोगाला दिली जाईल, असेही ते म्हणाले.
000000
         



शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

निवडणूक खर्च सनियंत्रण यंत्रणा सज्ज चार खर्च निरीक्षक दाखल ; संपर्क क्रमांक जाहीर



            कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघासाठी चार खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून, त्यांनी खर्च विषयक सनियंत्रण यंत्रणेचा आढावा घेतला. खर्च विषयक निरीक्षक त्यांचे संपर्क क्रमांक आणि संपर्क अधिकारी जाहीर करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने यांनी दिली.
       जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून चार खर्च निरीक्षक आणि जिल्हा‍ निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर निवडणूक खर्च संनियंत्रण समिती, माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (MCMC) तक्रार निवारण व मदत केंद्र तसेच बँक रिपोर्ट कमिटी या 4 प्रमुख समित्या तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्र स्तरावर एक सहाय्यक खर्च निरीक्षक (AEO) एक लखा पथक 3 व्हिडीओ सर्वेक्षण पथके, 2 व्हिडीओ पाहणी पथके, 3 ते 4 भरारी पथके आणि गरजेनुरुप स्थिर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
       भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून भरारी पथके व स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित झाली आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून निवडणूकीच्या कालावधीत हेाणारे सभा, मेळावे, पदयात्रा इत्यादी प्रकारच्या प्रचार प्रसिध्दी घटनांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी व्हिडीओ सर्वेक्षण पथके कामकाज करत आहेत. भरारी पथके निवडणूक काळामध्ये बेकायदेशीरपणे वाटप होणाऱ्या रोख रक्कम, दारु, भेटवस्तू व मतदारांना थाकदपटशा दाखवणे इत्यादी गोष्टीवर निर्बंध आणण्यासाठी मतदारसंघांमध्ये रात्रंदिवस गस्त घालत आहेत. विधानसभा मतदार संघातील प्रमुख रस्त्यांवर स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत असून निवडणूक काळामध्ये रोख रक्कम, दारु, भेटवस्तू, शस्त्रास्त्रे इत्यादीच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी कामकाज करत आहेत. याशिवाय पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग या तपास यंत्रणेचे नोडल अधिकारीही निवडणूक खर्च सनियंत्रणसाठी कामकाज करत आहेत.
          जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्ष यांच्यासोबत झालेल्या  बैठकीमध्ये निवडणूक खर्चाच्या विविध बाबींचा प्रारुप दर तक्ता जाहीर करुन त्यावर हरकती मागवल्या होत्या. दिनांक 23 सप्टेंबर रोजी प्राप्त हरकतींचा विचार करुन अंतिम दर तक्ता घोषित करण्यात आला आहे. विधानसभा क्षेत्र स्तरावरील निवडणूक खर्च नियंत्रणाची संबंधित विविध पथकांचे प्रशिक्षण दिनांक 13 सप्टेंबर  रोजी शासकीय विश्रामगृह आणि दुपारच्या सत्रात केशवराव भोसले नाट्यगृह येथे घेण्यात आले. सहाय्यक खर्च निरीक्षक आणि त्यांची लेखा पथकांचे दुसरे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 20 सप्टेंबर रोजी झाले.
           दिनांक 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व बँकांची बैठक घेऊन निवडणूक काळात होणारे संशयास्पद व्यवहार व त्यांचे दैनंदिन रिपोर्टिंग, रोकड वाहनाची प्रमाणित कार्यपध्दती इत्यादीवर चर्चा करण्यात आली. दिनांक 26 सप्टेंबर रोजी सर्व चार खर्च निरीक्षक विधानसभा मतदारसंघांमध्ये दाखल झाले असून, त्यांची राहण्याची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे.  निवडणूक काळात त्यांचा मोबाईल क्रमांक आणि संपर्क अधिकारी यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.   
          विधानसभा मतदारसंघ 271 ते 273 साठी शील आशिष  यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी 7447368646 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून दिपक बी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी 9970264296 असा आहे.
          विधानसभा मतदारसंघ 274 व 275 साठी आर. नटेश  यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा भ्रमणध्वनी 9359314054 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून दयानंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी  9404986840 असा आहे.
          विधानसभा मतदारसंघ 276 व 277 साठी शादाप अहमद यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा भ्रमणध्वनी 7820836663 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून दिपक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी  8975050100 असा आहे.
          विधानसभा मतदारसंघ 278 व 280 साठी जे. आनंद कुमार यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा भ्रमणध्वनी 7756095278 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून अमर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी  9860610727 असा आहे.
          उमेदवारांनी त्यांचे निवडणूक खर्चाचे दैनंदिन लेखी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत सहाय्यक खर्च निरीक्षक व त्यांची लेखा पथके यांच्याकडे सादर करावयाची आहेत. या लेख्यांची तपासणी किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांकडून होणार आहे.
00000


मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे पोलीस दलासाठी टपाल मतदानाची सोय - पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख





        कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) :  विधानसभेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासाठी टपालाद्वारे मतदान  करण्याची सोय करण्यात आली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला टपालाद्वारे जास्ती जास्त मतदान होईल, याची दक्षता आम्ही घेत आहोत. येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.  
       राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अतिशय मुलभूत हक्क दिला आहे. मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा हक्क आणि कर्तव्य यामध्ये मतदानाचा हक्क अतिशय महत्वाचा आहे. आपला तो अधिकार आपण येत्या 21 ऑक्टोबर रोजी काळजीपूर्वक बजावावा, असे आवाहन करुन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख पुढे म्हणाले, नव मतदारांनी विशेष प्राथमिक लक्ष मतदानावर द्यावे. त्या दिवशी अन्य कामे थोडी बाजूला ठेवून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे आणि मतदान करावे. 
            विधानसभा निवडणुकीच्या कामकाजामध्ये पोलीस अधिकारी आणि जवान आपले कर्तव्य बजावत असतात. अशा परिस्थितीत त्यांचेही मतदान व्हावे त्यासाठी टपालाद्वारे मतदानाची सोय करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा मतदानासाठी पोलीस दलाकडून जास्ती जास्त मतदान होईल, याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत, असेही डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.
0 0 0 0 0 0 0

मतदार जागृतीसाठी जिल्हाभर पालकसभा, हळदी-कुंकू, विद्यार्थ्यांच्या रॅली





कोल्हापूर,दि.28 (जि.मा.का) : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज चव्हाणवाडी येथील केंद्र शाळेत प्रशासनाच्यावतीने महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे तसेच पोर्ले येथील शाळेत पालकसभांचे आयोजन करण्यात आले. याबरोबरच जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये मतदार जागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलींचेही आयोजन करुन घराघरापर्यंत तसेच घरातील प्रत्येकापर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्याचं काम होत आहे.
 प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, जिल्हयात येत्या 21 ऑक्टोबररोजी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुमीपेक्षा अधिक व्हावी, यासाठी मतदार जागृतीचे काम जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर प्रभावीपणे होत आहे. यामध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू, पालकसभा, पथनाटय, जनजागृती रॅली, संकल्प पत्र भरून घेणे, बचतगटांचे मेळावे तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्कतृत्व स्पर्धासह ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांचे कार्यक्रमही होत आहेत.
मतदान जागृतीच्या उद्देशाने आज जिल्ह्यातील अनेक गावात तसेच शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये विद्या मंदिर चंदगड येथे पालक सभा, विद्यार्थ्यांची रॅली, रांगोळी तसेच चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यामंदिर नंदवाळ येथे मतदान जागृती रॅली काढण्यात आली. कुमार व कन्या विद्यामंदिर उचगाव येथे मतदान जागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीस सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. चव्हाणवाडी येथे स्वीप अंतर्गत पालकसभा व हळदी कुंकंवाचा कार्यक्रम संपन्न झाला, पोर्ले येथील गोसावी वसाहतीत मतदान जागृती पालक सभा झाली. बॅ. बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिरातही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शाहू प्राथमिक विद्यालय तोरस्कर चौक, विद्यामंदीर आरळे, विद्यामंदिर तळेवाडी, विद्यामंदिर पाटपन्हाळा, विद्यामंदिर कळे, विद्यामंदिर इटे, विद्यामंदिर पोहाळे, विद्यामंदिर उत्तूर, विद्यामंदिर नंदगाव, कुमान व कन्या विद्यामंदिर माले, विद्यामंदिर वाकरे अशा कित्येक गावात मतदान जागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीज, महिला मेळावे, पालकसभा संपन्न झाल्या.
राजोपाध्येनगर येथील  मुन्यि. कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालयातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. मतदान आपला हक्क आहे, तो वाया घालवू नका अशा घोषणा देण्यात आल्या. मतदार जनजागृतीसाठी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी निबंधलेखन व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या.
00000

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

जिल्ह्यात एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही 118 जणांनी घेतले 193 अर्ज -अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर



कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.) :  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात झाली आहे. आजच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशपत्र दाखल झाले नाही. मात्र, 118 जणांनी 193 अर्ज घेवून गेले आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामांकन पत्र न स्विकारण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले असल्याने उद्या तसेच रविवारी आणि 2 ऑक्टोंबर रोजी नामांकन पत्र स्विकारण्यास सुट्टी असणार आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 118 जणांनी  196 अर्ज घेतले आहेत.  विधानसभा मतदार संघ निहाय आज  नामनिर्देशनपत्र घेवून गेलेल्यांची नावे आणि कंसात संख्या पुढीलप्रमाणे-
271 -चंदगड मतदार संघ- 1) शंकर सिताराम चव्हाण (गंगाधर बाळाप्पा व्हसकोटी यांच्यासाठी) (1) 2) गंगाधर बाळाप्पा व्हसकोटी (सदानंद राजकुमार हत्तरगी यांच्यासाठी) (2)  3) श्रीकांत अर्जुन कांबळे (स्वत:साठी) (2) 4) तुकाराम विठ्ठल पाटील (स्वत:साठी) (1) 5) चंदु रवळू भोगूलकर (स्वत:साठी) (1) 6) रामा नागोजी सुतार (नामदेव बसवंत सुतार यांच्यासाठी) (2) 7) डॉ. संजय भावकू पाटील (1), 8) रवी ऊर्फ  धोंडीबा भागोजी नाईक (1), 9) दत्तू गोमाजी नाईक (1), 10) ॲड. शंकर एस. पाटील (1), 11) जोतिबा रामचंद्र गोरल (1), 12) भैरु शंकर सुरंगे (स्वत:साठी) (4) अशा 12 जणांनी 18 अर्ज घेतले.
 272- राधानगरी मतदार संघ- 1) दत्तात्रय रामचंद्र पोतदार  (3), 2) भगवान पाडुरंग पाटील (2), 3) अजित तुकाराम पाटील (3), 4) दिपक आनंदराव शिरगावकर (3), 5) रणजित पाडुरंग कलेकर (1), 6) सुरेश गणपतराव पाटील (2), 7) धोंडीराम कृष्णा पाटील (3), 8) उत्तम श्रीपती चरापले (1), 9) युवराज रामचंद्र येडूरे  (1), 10) अजित राजाराम पाटील (1), 11) रवींद्र दत्तात्रय कदम (1) अशा 11 जणांनी 21 अर्ज घेतले.
273 -कागल मतदार संघ- 1) करण बाळू हजारे (म्हाळू बीरु हजारे यांच्यासाठी) (4), 2) पाटील एस.आर.तात्या (स्वत:साठी) (4), 3) अकाराम राजाराम बचाटे (संजय आनंदराव घाटगे यांच्यासाठी)  (4), 4) संतोष मारुती आगळे (अंबरिशसिंह संजय घाटगे यांच्यासाठी)  (4), 5) सुनील आप्पासो निर्मल (स्वत:साठी) (1) अशा  5 जणांनी 17 अर्ज घेतले. 
 274- कोल्हापूर (दक्षिण) मतदार संघ- 1) गौरव तुकाराम पणोरेकर (4), 2) दिलीप पाडुरंग कावडे (2), 3) अरविंद भीवा माने (3), 4) राजेंद्र कांबळे (2), 5) चंद्रकांत शंकरराव दळवी (1), 6) मोहन रामचंद्र सालपे (2) अशा  6 जणांनी 14 अर्ज घेतले. 
275- करवीर मतदार संघ- 1) आनंदराव शिवाजी माने (1),  2) अरविंद भीवा माने (3), 3) गौरव तुकाराम पणोरेकर (4), 4) माणिक बाबू शिंदे (3), 5) सतीश वाकरेकर (2) अशा 5 जणांनी 13 अर्ज घेतले.  
 276 -कोल्हापूर (उत्तर) मतदार संघ- 1) मुस्ताक अजिज मुल्ला (2), 2) उमेश विलासराव पागर (1), 3) सुजित रमेश देशपांडे (1), 4) सतीशचंद्र बाळकृष्ण कांबळे (2), 5) दिलदार मनसूर मुजावर (1), 6) डॉ. चंद्रकांत शंकरराव दळवी (1) अशा 6 जणांनी 8 अर्ज घेतले आहेत.
277- शाहूवाडी मतदार संघ-1) प्रविण प्रभाकर प्रभावळकर (2), 2) सचिन आनंदा कांबळे (2), 3) संतोष शिवाजी किबीले (2), 4) ओंकार भगवान सुतार (2), 5) तुकाराम नामदेव चौगुले (2), 6) सुनील पांडुरंग पाटील (2), 7) रवीकुमार सुधाकर कांबळे (3), 8) अशुतोष तुकाराम डोंगरे (2), 9)  भारत रंगराव पाटील  (3), 10) विनय विलासराव कोरे (4), 11) नानासाहेब शामराव पाटील (2), 12) अशोकराव रामचंद्र पवार (2), 13) शिवाजी महिपती वाघ (2) अशा 13 जणांनी 33 अर्ज घेतले.
 278- हातकणंगले (अ. जा.राखीव) मतदार संघ- 1) विद्यासागर देवाप्पा ऐतवडे  ,2) शिवाजी रघुनाथ अंबेकर, 3) राहूल उत्तम पाटोळे, 4) राजू दिलीप वायदंडे, 5) अविनाश श्रीकांत कांबळे, 6) रत्नदिप बाबूराव घोलप, 7) इरफान हारुण मुल्ला, 8) संदिप दत्तू गायकवाड, 9) गणेश देवगोंडा पाटील, 10) शिवाजी महादेव आवळे , 11) शिवाजी महादेव आवळे, 12) सागर नामदेव शिंदे, 13) तानाजी तुकाराम ढाले, 14) निलेश विठ्ठल पाटील, 15) सुहास लालासाहेब राजमाने, 16) दिपक संतराम रानमाळे, 17) प्रदीप गणपती माळी, 18) प्रदीप दिनकरराव पाटील, 19) भैरवनाथ ज्ञानू पोवार, 20) प्रदिप भिमसेन कांबळे, 21) महादेव भिमराव गायकवाड , 22) दिपक आण्णासो पाटील, 23) दयानंद शामराव मालेकर, 24) किरण दादू चव्हाण, 25) संदीप वसंत कांबळे , 26) युवराज शिवाजी कांबळे, 27) ॲड. वैशाली प्रशांत गंगावणे, 28) ॲड. वैशाली प्रशांत गंगावणे, 29) उमेश मल्लीकार्जुन मनवाडे, 30) चंद्रशेखर सदाशिव कांबळे, 31) चंद्रशेखर सदाशिव कांबळे, 32) सतीश नरसू मोरे अशा 32 जणांनी 35 अर्ज घेतले आहेत.
279 - इचलकरंजी मतदार संघ- 1) प्रदिप भिमसेन कांबळे (2), 2) अभिजित महावीर खोत (1), 3) राजू बापुसो गांजवडे (1), 4) संजय परशराम पोळ (2), 5) कुबेरसिंग उत्तमसिंग राजपूत (2), 6) उमेश बाजीराव खांडेकर (2), 7) निलेश हिंदुराव मोरबाळे (1), 8) अमर जयसिंग भोसले (1), 9) रावसाहेब गणपती निर्मले (2),  10) भाऊसो शंकर वडे (1), 11) अमोल शामराव चौधरी (1), 12) मोहन पांडुरंग मालवणकर (1), 13) दत्तात्रय मारुती आपके (1), 14) रावसाहेब गणपती निर्मळे (1), 15) महेश रावसाहेब मालगावे  (2), रमेश तुकाराम पाटील (1) अशा 16 जणांनी 22 अर्ज घेतले.   
280- शिरोळ मतदार संघ- 1) रामा वसंत चौगुले,(सलीम सिकंदर नदाफ यांच्यासाठी) 2) आदम बाबू मुजावर, 3) सुनील श्रीपती संकपाळ, 4) शिवाजी धोंडीराम संकपाळ, 5) अन्वर चंदन जमादार, 6) महेंद्र सिध्दाप्पा हत्ती, 7) मुबीन शोकत मुल्ला, 8) गौतम रामचंद्र कांबळे, (अरुण मायाप्पा कडाळे यांच्यासाठी)  9) सुनील बळवंत कुरुंदवाडे, 10) तानाजी मोहन थोरवत, 11) शरद दगडू पोवार, 12) सतीश भगवान भंडारे अशा 12 जणांनी 15 घेतले आहेत.
जिल्ह्यातील विधानसभा  निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2019 आहे.
000000



जनजागृती रॅली, प्रतिज्ञा व विविध स्पर्धेतून जिल्ह्यात मतदान जागृती -जिल्हाधिकारी दौलत देसाई









कोल्हापूर,दि.27 (जि.मा.का) : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हयात मतदान जागृतीचा विशेष कार्यक्रम प्रशासनाने गतिमान केला आहे. जिल्ह्यातील गावागावात, शाळा-महाविद्यालयामध्ये मतदार जागृतीचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे होत आहे. मतदारांकडून या जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने पथनाटय, जनजागृती रॅली, संकल्प पत्र भरून घेणे, महिला व बचतगटांचे मेळावे यासह मतदान जागृतीपर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, शाहिरी-पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 मतदार जागृती मोहिमेत समाजातील सर्वच घटकांचा सहभाग घेण्यात येत असून संपूर्ण कोल्हापूरवासियांनी मतदार जागृतीच्या कामात स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी म्हणाले, यंदा मतदान प्रक्रियेत सर्वांचाच विशेषत: महिला, युवा, दिव्यांग अशा मतदारांचा 100 टक्के सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध हायस्कूलच्या  मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे.
वृध्द असो की जवान सर्वांनी करा मतदान!
हातकणंगले शिक्षण विभाग अंतर्गत भादोले, वाठार, पारगाव, नागाव, हेर्ले व सावर्डे या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांनी संकल्प पत्र भरून घेऊन मतदानाची शपथ घेतली. राधानगरी तालुक्यातील केंद्र शाळा धामोड येथे संकल्प पत्र भरून घेऊन मतदान जागृती रॅली काढण्यात आली. करवीर तालुक्यातील वळीवडे येथे तसेच कायदा महाविद्यालयात युवा मतदारांसाठी,गगनबावडा तालुक्यातील आनंदी विद्यालयात,पंचायत समिती गगनबावडा व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतदान प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले. वृध्द असो की जवान सर्वांनी करा मतदान! असा संदेश देत पाटपन्हाळा येथील द.रा. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थींनींनी मतदान जनजागृती रॅली काढली.
'नवे वारे नवी दिशा मतदान ठरेल उद्याची आशा', निर्भय होऊन मतदान करा अधिकाराचा सन्मान करा, चला मतदान करूया देशाची प्रगती करूया या घोषवाक्यांनी  पन्हाळ्यात मतदार जागृती करण्यात आली.  तालुक्यातील विद्या मंदिर दानेवाडी, विद्यामंदिर आरळे, विद्यामंदिर जाधववाडी या शाळांनी रॅली काढून तसेच चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य या  माध्यमातून जनजागृती केली. विद्यामंदिर जेऊर, विद्यामंदिर करंजफेण या शाळांनी प्रभातफेरी काढली. जय शिवराय हायस्कूल सातार्डे, विद्यामंदिर इंजोळे, कन्या व कुमार विद्यामंदिर माले, विद्यामंदिर तिरपन, विद्यामंदिर नाईक वसाहत जागली, शाहू हायस्कूल काटेभोगाव, कांदबरी हायस्कूल पोर्ले-बोरगाव, विद्यामंदिर बच्चेसावर्डे, विद्यामंदिर पिसात्रे, विद्यामंदिर देवाळे, विद्यामंदिर बांद्रेवाडी, विद्यामंदिर कसबा ठाणे, विद्यामंदिर पिसाळवाडी, रा.म.पाटील कुमार विद्यामंदिर कसबा ठाणे, विद्यामंदिर शहापूर या शाळांनीही रॅली काढली. गडहिंग्लज तालुक्यातील विद्यामंदिर बुगडीकट्टी येथे मानवी साखळी आणि पथनाट्याव्दारे जनजागृती करण्यात आली. कागल मतदारसंघामध्ये शाहीर राजेंद्र ढोरे व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर करून जनजागृती केली. तसेच चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि रॅलीच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. करवीर आणि शिरोळ  मतदार संघातही रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
00000


अलमट्टीमधून 128157 पाण्याचा विसर्ग जिल्हयात 5 बंधारे पाण्याखाली



 कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) :  कोयनेतून 2100 तर अलमट्टीमधून 128157 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 15.10 फूट आहे. वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणात आज अखेर 8.23 टीएमसी पाणीसाठा आहे.
 पंचगंगा नदीवरील- सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 122.659 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 104.94  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.44 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.33 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.68 टीएमसी, पाटगाव 3.70 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.10 फूट, सुर्वे 18.8 फूट, रुई 48 फूट, इचलकरंजी 47 फूट, तेरवाड 43 फूट, शिरोळ 44.6 फूट, नृसिंहवाडी 41.6 फूट, राजापूर 29 फूट तर नजीकच्या सांगली 17.6 फूट अंकली 24.11 फूट अशी आहे.
00000

चंदगड तालुक्यात 15 मिमी तर राधानगरी तालुक्यात सर्वात कमी 3.17 मिमी पाऊस


     
            कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 110.75 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 31827.74 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 9.23 मिमी इतकी नोंद झाली. 
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 5.75 एकूण 885.04 शिरोळ -8.57 एकूण 640.86, पन्हाळा -6.71 एकूण 2520.57, शाहूवाडी 10.33 एकूण 3013.83, राधानगरी 3.17 एकूण 3146, गगनबावडा - 14.50 एकूण 6994.50, करवीर 10.45 एकूण 1871.9, कागल 8.14 एकूण 2015, गडहिंग्लज 8.71 एकूण 1536.43, भुदरगड 7.40 एकूण 2758.60, आजरा 12 एकूण 3303  व चंदगड 15 मिमी एकूण 3142 इतका पाऊस झाला आहे.
00000