इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी तयार होत आहेत आकर्षक आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेणपणत्यांसह भेटवस्तू

 















कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग, मतिमंद, गतिमंद मुलांच्या शाळांमध्ये दिवाळीसाठी विशेष मुले आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार करण्यात गुंतली आहेत. यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनेटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या वस्तू, स्पेशल ऑलंपिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते ते दाखवून दिले आहे.

        इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयम मतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी माहिती दिली. या शाळेतील उद्योग केंद्रात 18 वर्षापुढील 56 मुले आहेत. अत्यंत सुंदर पध्दतीने गणेश मूर्ती तयार करतात. वेगवेगळी फुले तयार करतात. दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात येत आहे. फाईल तयार करण्यात येतात शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येत असते. दुर्लक्षीत असणाऱ्या या मुलांना आमच्या संस्थेमार्फत सक्षम करण्यात येते. या वस्तूंची खरेदी करावी असेही त्या म्हणाल्या. संपर्क- नवीन न्यायालयाच्या मागे, कसबा बावडा, कोल्हापूर. प्रमोद भिसे- 7276051472.

            जिज्ञासा विकास मंदिर बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत अत्यंत आकर्षक आकाश कंदीलची निर्मिती होत आहे. या शाळेच्या स्मिता दीक्षित म्हणाल्या, मेणपणत्या मुलं सुंदर रंगवतात. वजनानुसार उटण्याचं पॅकिंग करतात. शिवण विभाग, पाक विभागातही या मुलांना वेगवेगळ्या पध्दतीचं प्रशिक्षण दिलं जातं. मुलांसाठी व्यायामशाळा देखील आहे. मुलांना सतत कार्यरत ठेवलं जातं. या मुलांच्या सुंदर कलाकृती खरेदी करून आपल्या दिवाळीबरोबरच या मुलांच्या दिवाळीचा आनंदही व्दिगुणीत करावा. संपर्क- रघुनंदन हॉल, क्रशर चौक, कोल्हापूर. स्मिता दीक्षित- 9850060903.

            चेतना अपंगमती विकास संस्थेचे चेतना विकास मंदिर -कृष्णात चौगुले व्‍यवस्थापकीय अधीक्षक- कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात. मुलींसाठी चेतना बजार सुरू केले. तेलाचा घाणा सुरू आहे. 50 हजार पणत्या, 1 हजार डझन आकाश कंदील, 5 हजार लक्ष्‍मीपुजन पुडे दिवाळीच्या निमित्ताने विक्री करतो. 13 ते 14 लाखाची उलाढाल यामधून होत असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे दिवाळीचे साहित्य आम्ही मुलांकडून घरातून करून घेतले आहे. घरातून 25 हजार पणत्या रंगवून आलेल्या आहेत. 200 डझन आकाश कंदील घरातून तयार करून आलेले आहेत. चिमण्यांची घरटी बनवली आहेत. यावेळच्या गिफ्ट बॉक्समध्ये सॅनेटायझरच्या बाटलीचाही आम्ही समावेश केला आहे.

मुख्याध्यापिका उज्वला खेबुडकर - अमित सुतार, केदार देसाई, आशिष सावेकर, ओंकार राणे आणि प्राजक्ता पाटील या खेळाडूंनी स्पेशल ऑलंपिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत सादर केलेल्या राष्ट्रगीतात शाळेतील 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गोविंद नेहलानी दिग्दर्शित वुई केअर फिल्म फेस्ट यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या चित्रफितीतही चेतनाचा सहभाग राहिला आहे. संपर्क- कुष्ठधाम शेंडापार्क, कोल्हापूर, 0231-2690306/07.

            स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय कागल-तृप्ती गायकवाड- मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचे काम दिले जाते. एकूण 25 विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. वेगवेगळ्या सणानिमित्त साहित्य निर्मिती केली जाते. रक्षाबंधनला राख्या तयार केल्या जातात. दिवाळी सणासाठी आकाश कंदील, पणत्या, नक्षीदार मेणपणत्या, सुंदर फुले सद्या तयार करण्यात येत आहेत. मतिमंद मुलं देखील उत्तम पध्दतीने काम करतात हे त्यांच्या वस्तू निर्मितीमधून स्पष्ट झाले आहे. यामधून त्यांना विद्या वेतन मिळते. संपर्क- तृप्ती गायकवाड- 9545159374.

            सन्मती मतिमंद विकास केंद्र इचलकरंजी- व्यवसाय अधीक्षक किशोरी शेडबाळे- लिफाफे तयार करणे, बुके तयार करणे, बॉक्स फाईल तयार करणे, पणत्या रंगवणे, गिफ्ट बॉक्स, लक्ष्मीपुजनचा पुडा, रंगीबेरंगी पणत्या आदींचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेमार्फत काही विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. संपर्क- किशोरी  शेडबाळे 9096250952.

            सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ही विशेष मुले पाठीमागे नाहीत हे त्यांनी बनवलेल्या वस्तूंमधून दिसून येते. गरज आहे ती त्यांनी बनवलेल्या वस्तूंना खरेदी करून दिलखुलासपणे दाद देण्याची.

00000

           

         

         

         

 

स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन दिव्यांग, मतिमंद शाळेतील शिक्षकांकडून ईश्वर सेवा -प्रशांत सातपुते

 





कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.

       इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलीत स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. श्री.सातपुते म्हणाले, विशेष मुलांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या शाळांमधून होत आहे. याच प्रशिक्षणाच्या जोरावर ही मुले काही ठिकाणी नोकऱ्याही करत आहेत. पंखाविना भरारी आणि जिद्द काय असते ते या मुलांनी दाखवून दिले आहे.

          जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, विशेष मुलांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टिने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे काम हे प्रेरणादायी आहे. या मुलांनी बनवलेल्या वस्तू निश्चितच गौरवास पात्र आहेत आणि अशा मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक कर्मचारी हे देखील सन्माननीय ठरत आहेत.

          स्वयम उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनीही यावेळी मनोगतात या शाळेमध्ये देणारे प्रशिक्षण, होणारे उपक्रम याविषयी माहिती दिली. यावेळी स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष राजूभाई जोशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष अमरदिप पाटील, श्रीनिवास मालू, खजानिस महेंद्र परमाळ, सदस्य कुलदीप कामत, मनीष देशपांडे, वकील सुलक्ष्मी पाटील, मुख्याध्यापक प्रमोद भिसे आदींसह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.

अलमट्टीतून 30000 क्युसेक विसर्ग सुरू

 

          कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 231.73 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 30000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 104.72  टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 76.99 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.11 दलघमी, पाटगाव 105.04 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.05 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 10.10 सुर्वे 12.6 फूट, रुई 40.2 फूट, इचलकरंजी 36 फूट, तेरवाड 34.9 फूट, शिरोळ 28 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 16 फूट तर नजीकच्या सांगली 9.9 फूट व अंकली 10.2 फूट अशी आहे.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी कृषी पणन विभागाच्या चार योजना

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यामुळे, हवामान, संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतात. अशा कृषी उत्पादनास भौगोलिक चिन्हांकन/मानांकन प्राप्त करण्यासाठी पणन महामंडळामार्फत चार योजना तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष एस.घुले यांनी दिली.

 भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यामुळे, हवामान, संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतात. ते वर्षानुवर्षे कायम राहत असतील तर अशा उत्पादनांची नोंदणी भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालय चेन्नई येथे करावी. अशा उत्पादकांना सुरवातीस दहा वर्षे, इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादकांपासून भेसळ होणे, रास्त किंमतीपेक्षा कमी किंमत मिळणे या सारख्या गोष्टींपासून संरक्षण मिळते. पुन:श्च संरक्षण कालावधी वाढविता येतो.  पणन मंडळाच्यावतीने राज्यात 4 स्वतंत्र योजना तयार करण्यात आल्या आहेत,

भौगोलिक चिन्हांकन/मानांकन बाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांची नोंदणी करणे तसेच या शेतमालाची विक्री व्यवस्था/ निर्यात याबाबत कामकाज करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नोंदणी करावयाच्या संस्था आणि कृषी पणन मंडळ कामकाज करेल.

भौगोलिक मानांकनामुळे त्या त्या प्रदेशातील स्थानिक उत्पादकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. भौगोलिक चिन्हांकन/मांनाकन प्राप्त उत्पादकांच्या अधिक उत्पादनांसाठी, तसेच या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये कृषि विभागातर्फे आणि महाराष्ट्र राज्य कृषि स्पर्धात्मक प्रकल्प अंतर्गत एकुण 24 कृषि उत्पादकांना भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. एकूण 24 कृषी उत्पादनांकरीता राज्यामध्ये 27 उत्पादकांच्या संस्था कामकाज करीत आहेत.

भौगोलीक चिन्हांकन/ मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रचार व प्रसिध्दीसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनुदान योजना -भौगोलिक मानांकन संदर्भातील सर्वकश माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे, उत्पादकांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे व नोंदणीच्या आवश्यकतेबाबतची माहिती उत्पादकांना देणे या उद्देशाने ही योजना कार्यान्वित. यामध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणाऱ्या संस्था लाभार्थी असतील. तसेच यामध्ये एक दिवसाच्या प्रशिक्षण आयोजनासाठी कमाल मर्यादा 10 हजार रु. अनुदान देय असेल. लाभार्थी संस्थेने पुर्व मान्यतेसाठी कृषि पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या अंतर्गत तालुका कार्यक्षेत्रात कमाल 3 कार्यक्रम या प्रमाणे जिल्हा कार्यक्षेत्रात कमाल 15 प्रशिक्षण कार्यक्रम घेता येतील.

भौगोलीक चिन्हांकन/ मानांकन नोंदणीसाठी शेतक-यांना प्रोत्साहन देण्याकरिता नोंदणी शुल्कासाठी अनुदान योजना- भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने उत्पादकांना भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी शासकीय नोंदणी शुल्कापोटी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रति लाभार्थी कमाल 800  रु. मर्यादेपर्यंत अनुदान संबधित कृषि उत्पादनाचे मालकी असणाऱ्या संस्थेला अनुदान देय राहील. याकरीता शेतकऱ्यांनी भौगोलिक मानांकन नोंदणी केलेली असावी.  नोंदणी क्रमांक प्राप्त झालेला असावा. तसेच शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.

भौगोलिक चिन्हांकन/ मानांकन नोंदणी  प्राप्त उत्पादनांचे मुल्यसाखळी विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान योजना - भौगोलिक मानांकन नोंदणीकृत नैसर्गिक गुणवत्ता असलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, भेसळीला प्रतिबंध करणे, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात उत्पादित होणारी उत्पादने चिन्हासह विक्री करण्यासाठी बाजार विकास (सुयोग्य पॅकिंग, लेबलिंग, ब्रॅडिंग, बारकोड, वेबसाईट विकास इ.) करीता येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत-जास्त 3 लाखापर्यंत अर्थसहाय्य कृषि उत्पादनाचे मालकी असणाऱ्या व आवश्यक निकष पुर्ण करणाऱ्या संस्थेला देण्यात येईल.

कृषी पणन मंडळाच्या फळे व कृषिमाल महोत्सव उपक्रमामधील भौगोलिक चिन्हांकन / मानांकन उत्पादनांच्या स्टॉलकरिता अर्थसहाय्य योजना- भौगोलिक मानांकन उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करीता पणन मंडळाच्या फळे व शेतमाल महोत्सव योजनेअंतर्गत असलेल्या स्टॉलकरीता प्रति स्टॉल 3 हजार रु.अनुदान देण्यात येईल.

योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या राज्यातील 8 विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येईल. कोल्हापूर विभागातील मानांकन प्राप्त संस्थांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही श्री. घुले यांनी कळविले आहे.

00000

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शुक्रवारी शिबीर

 


   कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 28 ऑक्टोबर रोजी सोडण्यात येणारे शिबीर कार्यालाचे स्लॉट तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी केले आहे.

00000

 

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात अधीक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  सैनिकी मुलांचे वसतिगृह कोल्हापूर व पन्हाळाकरिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने, अशासकीय अधीक्षकाचे प्रत्येकी 1 पद भरण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.

हे अशासकीय पद फक्त सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या ज्युनियर कमिशन ऑफीसरसाठी आहे. त्यासाठी त्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, जेसीओ रॅंकमध्ये कमीत-कमी 5 वर्षे सेवा केलेली असावी व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र.0231-2665812 वर संपर्क साधावा.

000000

पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  सैनिकी मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पहारेकऱ्याचे 1 पद भरण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.

हे पद कंत्राटी पध्दतीचे व एकत्रित मानधनावर आहे. माजी सैनिकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र.0231-2665812 वर संपर्क साधावा.

000000

 

अलमट्टीतून 30000 क्युसेक विसर्ग सुरू

 


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 231.30 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 30000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 104.61 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 76.99 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.47 दलघमी, पाटगाव 105.04 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.05 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.1 सुर्वे 12.10 फूट, रुई 39.9 फूट, इचलकरंजी 36 फूट, तेरवाड 34.9 फूट, शिरोळ 28 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 16.6 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 10.6 फूट अशी आहे.

000000

 

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 3 नोव्हेंबरपासून

 


कोल्हापूर, दि. 27  (जिल्हा माहिती कार्यालय) : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FP दि. 2 नोव्हेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FR  दि. 3 नोव्हेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

          लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.

          पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत आणून द्यावा. धनाकर्ष शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक व मागणी केलेली मालिका पसंती क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.

          एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दि. 4 नोव्हेंबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाप्यात सकाळी 9.45 ते 2 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एक पेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाचा लिलाव दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे  प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी कळविले आहे.

000000

लाच घेणार नाही लाच देणार नाही प्रामाणिक आणि पारदर्शीपणे काम करेन जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा





कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन, अशी सत्यनिष्ठा प्रतिज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी आज घेतली.

       आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी या प्रतिज्ञेसह राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, तहसिलदार अर्चना शेटे, संतोष कणसे, रंजना बिचकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आदीसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, सर्व व्यक्ती चांगल्या असतात. एखाद्याचीच प्रवृत्ती मोहाला बळी पडते आणि त्यामुळे त्या विभागाला दोष येतो. कोणत्याही आमिषाला अथवा मोहाला अजिबात बळी पडू नका. प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे आपली कार्ये पार पाडा. घेतलेली प्रतिज्ञा अंमलात आणा, असे मार्गर्शन त्यांनी केले.

सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

आपल्या देशाची आर्थिक, राजनितीक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे, असा माझा विश्वास आहे. या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्व भागधारक जसे की, सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्रातील यांनी एकत्रित येवून काम करण्याची आवश्यकता आहे. यावर माझा विश्वास आहे.

          प्रत्येक नागरिकाने सावध रहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकाबाबत वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरूध्दच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे.

          अंतत: मी शपथ घेतो की,

जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन.

000000


सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

आजअखेर 45 हजार 92 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 466 प्राप्त अहवालापैकी 431 निगेटिव्ह तर 33 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 148 प्राप्त अहवालापैकी 147 निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझीटिव्ह आहेत, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 115 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 94 तर  21 पॉझीटिव्ह  असे एकूण 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 832 पॉझीटिव्हपैकी 45 हजार 92  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 107 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 55 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-4, गडहिंग्लज-2, हातकणंगले-2, कागल-3, करवीर-2, शाहूवाडी- 12, शिरोळ-2, नगरपरिषद क्षेत्र-2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 व इतर शहरे व राज्य 12 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-838, भुदरगड- 1197, चंदगड- 1155, गडहिंग्लज- 1381, गगनबावडा- 140, हातकणंगले-5195, कागल-1625, करवीर-5506, पन्हाळा- 1829, राधानगरी-1211, शाहूवाडी-1293, शिरोळ- 2442, नगरपरिषद क्षेत्र-7306, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 512 असे एकूण 45 हजार 630 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 202 असे मिळून एकूण 47  हजार 832  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 47 हजार 832 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 45 हजार 92 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 633 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 107  इतकी आहे.

000000

लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे तक्रार करा तक्रारदाराच्या शासकीय कामाचा पाठपुरावा करू -पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत

 



 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : लाच -लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून तक्रारदाराचे कोणतेही काम थांबणार नाही. त्याचा पाठपुरावा विभागामार्फत केला जाईल त्यामुळे शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले.

       सतर्क भारत, समृध्द भारत’ ही संकल्पना घेवून केंद्रीय दक्षता आयोगातर्फे उद्या दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने पोलीस उप अधीक्षक श्री. बुधवंत म्हणाले, उद्या मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे भ्रष्टाचार विरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आठवडी बाजाराच्या ठिकाणी माहिती पत्रकाच्या आधारे जनजागृती करण्यात येणार आहे.

          लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून आपले काम होणार नाही, अशी कोणतीही भीती नागरिकांनी बाळगू नये. त्यांचे शासकीय काम नियमानुसार होत असेल तर ते करून देण्याची जबाबदारी लाच लुचपत विभागाची आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. शासकीय काम करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी, लोकसेवक लाच मागणी करत असेल तर नागरिकांनी निर्धास्तपणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 7083668333, 9011228333, 0231-2540989 आणि 7875333333 या व्हॉट्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बुधवंत यांनी केले आहे.

000000

 

अलमट्टीतून 27779 क्युसेक विसर्ग सुरू

 


                कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 230.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 27779 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 104.61 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.04 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.52 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.10 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11 सुर्वे 12.8 फूट, रुई 40 फूट, इचलकरंजी 36 फूट, तेरवाड 35 फूट, शिरोळ 28.6 फूट, नृसिंहवाडी 28 फूट, राजापूर 16.9 फूट तर नजीकच्या सांगली 10.3 फूट व अंकली 11.2 फूट अशी आहे.

000000

 

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

आजअखेर 44 हजार 987 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 657 प्राप्त अहवालापैकी 625 निगेटिव्ह तर 30 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 65 प्राप्त अहवालापैकी 63 निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहेत, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 52 प्राप्त अहवालापैकी 3 पॉझीटिव्ह  असे एकूण 35 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 777 पॉझीटिव्हपैकी 44 हजार 987  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 160 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 35 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-1, चंदगड-1, हातकणंगले-10, कागल-2, करवीर-4, पन्हाळा-1, राधानगरी-1, शाहूवाडी- 8, शिरोळ-1, नगरपरिषद क्षेत्र-1, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 3 व इतर शहरे व राज्य 2 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-838, भुदरगड- 1193, चंदगड- 1155, गडहिंग्लज- 1379, गगनबावडा- 140, हातकणंगले-5193, कागल-1622, करवीर-5504, पन्हाळा- 1829, राधानगरी-1211, शाहूवाडी-1281, शिरोळ- 2440, नगरपरिषद क्षेत्र-7304, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 498 असे एकूण 45 हजार 587 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 190 असे मिळून एकूण 47  हजार 777 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 47 हजार 777 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 44 हजार 987 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 630 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 160  इतकी आहे.

000000

 

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

कंटेन्टमेन्ट झोन बाहेरील व्यायामशाळा मार्गदर्शक तत्वानुसार सुरु जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील कंटेन्टमेट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा जारी केलेल्या मानक कार्यप्रणाली/ उद्या दिनांक 25 ऑक्टोबरपासून सुरु  करण्याचे  आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा दि. 25 ऑक्टोबर पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासाठी मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कंटेन्टमेन्टच्या झोनच्या बाहेरील उद्या दि. 25 आक्टोबर पासून सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

सर्व संबंधीत व्यायामशाळांकडून परिशिष्ट - 1 मध्ये नमूद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करण्याचे अधिकारी त्या त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत आहेत.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असा, इशाराही देण्यात आला आहे.

परिशिष्ट-1

कन्टेटमेंट झोनच्या बाहेरील सर्व व्यायामशाळा दिनांक 25/10/2020 पासून संचालन / सुरु करणेबाबत मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक‍ तत्वे खालीलप्रमाणे राहतील.

सामाईक बंधनकारक सूचना –

1)     कोव्हीड -19 संसर्ग कमी करण्याबाबत सामाईक प्रतिबंधात्मक योजना मध्ये जसेकी सार्वजनिक आरोग्य चांगले राखणेबाबतच्या बाबीचा समावेश असेल. व्यायामशाळा व परिसरामध्ये प्रतिबंधात्मक बाबीचे निरिक्षण व पालन सर्वाकडून ( व्यायामशाळा येणारे सदस्य, भेट देणार व कर्मचारी वर्ग) केले जाईल.

अ)   वैयक्तिक सर्वानी शक्ततोवर कमीत कमी 6 फूट अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. 

ब)  व्यायामशाळा व परिसरामध्ये सर्व वेळी चेहऱ्यावर मास्क/ चेहरा कव्हर वापरणे बंधनकारक असेल. परंतू व्यायामशाळेमध्ये प्रत्यक्ष व्यायाम करत असताना N-95 मास्क चा वापर केल्यास श्वासोश्वासामध्ये अडथळे येऊ शकतात. त्याअनुषंगाने व्यायाम करत असताना सर्जीकल मास्क अथवा मल्टी लेअर असलेले कापडी मास्क , कापूस मिश्रणांचे घट्ट विणलेले जे सुरक्षितपणे नाक, तोंड आणि हनवटीच्या खाली व्यवस्थित बसतील ते वापरणे योग्य असेल. तसेच व्यायामादरम्यान सिंगल लेअर कपडयाचे मास्क वापरता येतील.

क) हात अस्वच्छ नसलेतरी साबणाचा वापर करून (कमीत कमी 40 ते 60 सेंकदापर्यत) हात धुणे. जेथे शक्य असले तेथे अक्लोहोल आधारित हॅण्ड सॅनिटायझर ( किमान 20 सेंकद) चा वापर करणे बंधनकारक असेल.

ड) नाक व श्वासोश्वासाविषयीचा शिष्टाचार कडकपणे पाळणे. जसेकी खोकतांना किंवा शिंकताना नाक व तोंड हे टिश्यू पेपर/ रुमाल/ कोपर वळवून पूर्ण झाकले जाईल याची खबरदारी घेणे. व वापरलेला टिश्यू पेपरचा तात्काळ योग्य पध्दतीने विल्वेवाट लावणे.

इ) व्यायामशाळेत येणाऱ्या व भेट देणाऱ्या सर्वानी स्वताच्या आरोग्याचे निरिक्षणे करणे आणि आजारी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक असेल.

फ) व्यायामशाळा व परिसरामध्ये थुंकण्यास पूर्ण पणे प्रतिबंध असेल.

ग) व्यायामशाळेत येणाऱ्या ( व्यायामशाळा येणारे सदस्य, भेट देणार व कर्मचारी वर्ग ) सर्वाना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक असलेबाबत सूचित करणे.

सामाईक प्रतिबंधात्मक उपाययोजना 

1)     कन्टेटमेंट झोनच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व व्यायामशाळा या बंदच राहतील. फक्त कन्टेटमेंट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरू करणेस परवानगी असेल.

2)     सर्व व्यायामशाळा संचालकांना केंद्र शासन, राज्य शासन यांचेकडून वेळोवेळी कोव्हीड -19 संसर्ग रोखणेबाबत निर्गमित केलेल्या आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचना / SOP / अधिसूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

3)     65 वर्षावरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुलांना व्यायामशाळेच्या बंधिस्त परिसराचा वापर व्यायामासाठी करता येणार नाही. व्यायामशाळेचे व्यवस्थापन करणारी संस्था यांनी सदस्य, अभ्यागत आणि कर्मचारी वर्गास याप्रमाणे सूचना देणे बंधनकारक असेल.

व्यायामशाळा सुरू करणेबाबत विशिष्ट उपाययोजना –

अ)   व्यायामशाळा सुरू करणेपूर्वी योग्य प्लेसमेंट किंवा उपकरणे यासह प्रक्रिया आणि परिसर पुनर्निदेशित करणे.

I)      व्यायामशाळा मजला क्षेत्राचे प्रत्येक व्यक्तीस 4 चौ. मीटर वर आधारित नियोजन करणे.

II)   सामाजिक अंतर राखले जाणेसाठी Cardio & Strength  उपकरणे हलवून कमीत कमी 6 फूट अंतरावर ठेवणे. व्यायामादरम्यान शारीरिक श्रम केल्याने श्वास बाहेर टाकणे व तीव्रता यामध्ये  वाढ होत असल्याने कोव्हीड -19 चा संसर्ग रोखणेसाठी सामाजिक / शारीरिक अंतर राखणे महत्वाचे आहे. श्वासाची गती व तीव्रता वाढविणाऱ्या व्यायामासाठी असलेल्या उपकरणा दरम्यान 12 फूट अंतर राखले जावे. तसेच श्वासाची गती व तीव्रता वाढविणाऱ्या व्यायामाव्यतिरिक्त इतर व्यायाम प्रकाराच्या साधानामध्ये कमीत कमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल. जिथे शक्य असेल त्या ठिकाणी X  पॅर्टनमध्ये उपकरणांची मांडणी करावी जेणेकरून जास्तीत जास्त अंतर राखले जाईल. इतर प्रत्येक मशीन बंद करा किंवा उपकरणे इतरत्र हलवा जेणेकरून जागा उपलब्ध होईल.

III)जेथे उपलब्ध असेल तेथे उपकरणे हलवून व्यायामशाळेच्या बाहेरील जागेचा वापर करावा.

IV)व्यायामशाळेमध्ये व्यायामासाठी असलेल्या बंधिस्त भागात प्रवेश आणि व्यायाम करताना विशिष्ट खुणा आणि रांगा यांचे मार्कीग करावे.

V)   6 फूटाचे सामाजिक अंतर राखले जाईल, याअनुषंगाने व्यायामशाळेच्या आत व बाहेरील परिसरात विशिष्ट खुणासह रांगाचे व्यवस्थापन करावे.

VI)संपर्क न येणाऱ्या कार्ड आधारित ऑनलाईन पेंमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

VII)वातानुकूलन / व्हेटिंलेशनसाठी CPWD  ने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल जसेकी सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान सेंटींग 24 ते 30 सेल्सियस, सापेक्ष आर्दता 40 ते 70 % राखली जाईल त्याचबरोबर जास्तीत जास्त स्वच्छ हवा आतमध्ये येईल आणि Cross व्हेटिंलेशन पुरेशे असेल.

VIII)सामान्य व्यायामशाळा मजला, विशिष्ट व्यायाम क्षेत्र आणि कर्मचारी खोल्यामध्ये कमीत कमी कर्मचारी आणि सदस्य राहतील यासाठी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

. विशिष्ट भागात परवानगी असलेल्या सदस्यांची संख्या कमीत कमी ठेवावी.

. विशिष्ट व्यायामासाठी फिटनेस सेशन लागू करून विशिष्ठ सत्रासाठी सदस्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करून घेऊन त्यांना नेमून दिलेल्या वेळेमध्ये  प्रवेश देणे.

IX)योग्य सामाजिक अंतर राखून लॉकर सुविधेचा वापर करावा.

X)   डस्टबिन व कचरापेटी हे नेहमीच झाकलेले राहील याची खात्री करणे.

XI)जेथे लागू असेल तेथे स्पा, सौना, स्टीम बाथ आणि जलतरण तलाव हे बंद राहतील.

निर्जतुकीकरण –

वैद्यकीयदुष्टया परवानगी असलेल्या निर्जतुक साधनांचा वापर करून व्यायामशाळा आणि परिसर निर्जतुकीकरण करणे बंधनकारक असेल. यामध्ये खालील बाबींचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक असेल.  ( याव्यतिरिक्त ही इतर बाबींचे निर्जतुकीकरण करता येईल)

i.        व्यायामशाळा इमारतीमधील प्रवेशव्दार, खोल्या.

ii.     कर्मचारी , सदस्य आणि अभ्यागत यांनी वापरलेले सर्व खुल्या जागा.

iii.   वॉशरुम व शौचालय.

iv.    Shoe Bath. (सदस्यांना स्वतंत्र कसरत शुज घेणेस प्रोत्साहित करावे) .

v.      वारंवार स्पर्श केले जात असलेले सर्व पृष्ठभाग / जागा ( Door knobs, Handles etc.)

vi.    व्यायामशाळेतील उपकरणे.

व्यायामशाळेतील व्यायामक्रियेचे नियोजन आणि वेळापत्रक –

i.        व्यायामशाळेतील उपकरणांच्या फेर मांडणी नंतर उपलब्ध होणाऱ्या प्रति सत्र जास्तीत जास्त क्षमतेचे मोजणी करावी आणि त्याप्रमाणे सत्राचे वेळापत्रक तयार करून सदस्यांना सुचित करावे.

ii.     गट फिटनेस रुम व वर्ग 

अ)   प्रत्येक सत्रामध्ये सदस्यांचे येत जात असताना होणारा संपर्क टाळणेसाठी वर्ग सत्र व वेळामध्ये कमीत कमी 15 ते 30 मिनिटाचा कालावधी राखणे.

ब) जेथे शक्य असेल त्या ठिकाणी ग्रुप फिटनेस वर्ग हे ऑनलाईन पध्दतीने घ्यावेत.

क) खोलीचा आकार आणि व्यायामाच्या स्वरूपावर प्रत्येक गट फिटनेस वर्गामध्ये परवानगी  असलेल्या सदस्यांची संख्या प्रतिबंधित करावी.

व्यायामशाळेतील वैयक्तिक प्रशिक्षण –

अ)   वैयक्तिक प्रशिक्षणा दरम्यान जेथे शक्य असेल तेथे प्रशिक्षक व ग्राहक यांच्यामध्ये 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल.

ब) सत्रामध्ये फक्त अशा व्यायामाचा व उपकरणांचा वापर / समावेश करावा की ज्यामध्ये प्रशिक्षक आणि ग्राहक यांच्यामध्ये कमीत कमी सामाजिक संपर्क येईल. 

क) व्यायामाच्या प्रति सत्रामध्ये ग्राहकामध्ये पुरेसे अंतर राखले जाणेच्या दृष्टीने कमीत कमी पुरेसे सदस्य / ग्राहकांची संख्या निश्चित करावी.

ड) जिथे उपलब्ध असेल तेथे व्यायामशाळेच्या बाहेरील परीसराचाही वापर करावा.

कर्मचाऱ्यांसाठी 

अ)   सामाजिक अंतर राखणेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची शिफ्ट आणि उपस्थिती सुनिश्चित करावी.

ब)  कन्टेटमेंट झोनमध्ये रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यत कन्टेटमेंट झोन बंद होत नाही, तोपर्यत व्यायामशाळेमध्ये प्रवेश देणेत येवू नये.

क) कचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचारी वर्गास मार्गदर्शक सूचनांची माहिती आणि प्रशिक्षण देणेत यावे.

ड) अधिक जोखिम असलेल्या जसेकी वयस्कर, गर्भवती महिला कर्मचारी व्याधीग्रस्त कर्मचारी यांच्याबाबत अधिक सावधगिरी बाळगावी. त्यांना ग्राहकांशी थेट संपर्क येणाऱ्या कामामध्ये समावेश करू नये.

पुरवठयाची उपलब्धतता आणि व्यवस्थापन 

i.        व्यायामशाळेचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेने सदस्य, अभ्यागत आणि कर्मचारी वर्गासाठी वैयक्तिक सुरक्षीततेची साधने जसेकी मास्क, फेस कव्हर, हॅण्ड सॅनिटायझर याची पुरेश्या प्रमाणात उपलब्धतता करावी.

ii.     सदस्य आणि कर्मचारी यांना व्यायामाचे उपकरण , व्यायामापूर्वी आणि नंतर स्वच्छ करणेसाठी पुरेश्या प्रमाणात निर्जतुकीकरण वाइप्स, सोल्युशन आणि नष्ट करण्याजागे पेपर टॉवेल्सची उपलब्धतता करावी.

iii.   व्यायामापूर्वी सदस्यांच्या O2 Saturation ची नोंद करणेसाठी पल्स ऑक्सीमीटरची उपलब्धता करावी.

व्यायामशाळा उघडल्यानंतर –

        प्रवेशावेळी -

i.        व्यायामशाळेमध्ये प्रवेश करताना प्रवेश व्दाराजवळ  हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंनसर व थर्मल स्क्रिनिंगची सोय करावी.

ii.     व्यायामशाळेमध्ये केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींना ( कर्मचाऱ्यांसह) प्रवेश असेल.

iii.   व्यायामशाळेमध्ये फक्त चेहरा कव्हर / मास्क वापरणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश बंधनकारक असेल.   (No Mask – No Entry)

iv.    व्यायामशाळेमध्ये सर्व सदस्य / अभ्यागत व कर्मचारी यांनी धोका ओळखणेसाठी पूर्ण वेळ आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.

v.      व्यायामशाळा परिसरामध्ये व आतील बाजूस कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयक पोष्टर स्टिकर्स ठळकपणे दर्शविणेत यावी. कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या जनजागृती बाबत असलेल्या Audio & Video क्लिप  नियमितपणे सुरू ठेवाव्यात.

vi.    रांगेमध्ये नेहमीच 6 फूट सामाजिक अंतर राखावे.

vii. पुरेसे सामाजिक अंतर राखले जाणेच्या दृष्टीने पार्कीगच्या ठिकाणे , कॉरीडॉर आणि लिफ्टमधील गर्दीचे व्यवस्थापन करावे.

viii.           सदस्य / अभ्यांगताना व्यायामशाळेमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राखणेच्या दृष्टीने आणि परिसर व उपकरणे यांचे निर्जतुकीकरण करणेसाठी वेळा राखीव ठेवून स्वंतत्र सत्र निहाय वेळा निश्चित करून द्याव्यात.

ix.    व्यायामशाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या सर्व सदस्य आणि अभ्यागताची नोंदणी ( पूर्ण नांव, पत्ता, मोबाईल क्रंमाक इत्यादी) स्वंतत्र रजिस्टरमध्ये केली जाईल.

व्यायामशाळेत Cardio & Strength Training  उपकरणे वापरून व्यायाम करणेपूर्वी. –

i.        वापर करावयाची सर्व उपकरणे तसेच पुन्हा पुन्हा स्पर्श केल्या जाणाऱ्या जागा इत्यादीचे निर्जतुकीकरण करावे.

ii.     व्यायामशाळेत येणाऱ्या सदस्य, अभ्यागत, कर्मचारी यांच्या हाताच्या मधल्या बोटाचे निर्जतुकीकरण करून पल्स ऑक्सीमिटरच्या सहाय्याने O2 Saturation ची तपासणी करावी. ज्याची O2 Saturation  95 % पेक्षा कमी असेल त्यांना व्यायामासाठी परवानगी देणेत येवू नये व त्यांच्याबाबत जवळ असलेल्या आरोग्य यंत्रणेस सूचना देवून संदर्भीत करावे.

iii.   प्रत्येक व्यायामाच्या उपकरणाजवळ हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन असावे.

iv.    व्यायामाच्या साधानांचा वापर करणेपूर्वी हात स्वच्छ केले जात असलेबाबत खात्री करावी.

व्यायाम सत्राच्या दरम्यान –

i.        व्यायामसाठी सर्वासाठी एकत्र असलेल्या मॅटचा वापर टाळावा यासाठी सदस्यांना त्यांची स्वंतत्र मॅट आणणेस सूचित करावे जे की ते परत घेवून जाऊ शकतील.

ii.     कोव्हीड -19 संसर्गाचा संभ्याव धोका लक्षात घेता, शक्य तेथे संगीत / गाणी वाजवली जाऊ शकतात. परंतू  ओरडणे / हास्य योगा यांना परवानगी असणार नाही.

iii.   श्वास घेणेमध्ये अडथळा येत असल्यास तात्काळ व्यायाम बंद करून O2 Saturation ची तपासणी करावी. ज्याची O2 Saturation  95 % पेक्षा कमी असेल त्यांना व्यायामासाठी परवानगी देणेत येवू नये व त्यांच्याबाबत जवळ असलेल्या आरोग्य यंत्रणेस सूचना देवून संदर्भीत करावे.

व्यायामानंतर आणि कॉमन परिसराबाबत –

i.        झाकण असलेल्या डस्टबिनचा वापर करून फेस कव्हर, मास्क, वापरलेले टॉवेल यांची योग्य विल्वेवाट लावावी.

ii.     वॉशरूममधील शॉवर परिसर व इतर भागांचे वापर करणेपूर्वी आणि वापरानंतर निर्जतुकीकरण करणे.

iii.   व्यायामाचे प्रत्येक सत्र संपलेनंतर इतर सदस्यांनी व्यायाम सुरू करणेपूर्वी व्यायामाची उपकरणे , पुन्हा पुन्हा स्पर्श केल्या जाणाऱ्या जागा ( Hand rails, Benches etc.) यांची स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे.

iv.    व्यायाम सत्रा दरम्यान मजल्यांची स्वच्छता करावी.

व्यायाम शाळा बंद करताना –

i.        शॉवर रुम आणि लॉकर/ चेंजिंग रूम यांचे निर्जतुकीकरण करावे.

ii.     सर्व वॉशरुमची खोलवर साफसफाई केली जाईल याची खात्री करणे.

iii.   व्यायाम शाळा बंद करणेपूर्वी सर्व परिसराचे निर्जतुकीकरण करावे.

व्यायामशाळा परिसरामध्ये संशयित प्रकरणी करावयाच्या अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाययोजना –

i.        आजारी असलेल्या व्यक्तीला इतरापासून दूर अशा स्वंतत्र खोली अथवा वेगळया असलेल्या भागामध्ये ठेवावे.

ii.     डॉक्टरांकडून तपासणी केली जात नाही तोपर्यत मास्क / चेहरा कव्हर संबंधितास वापरणेस द्यावा.

iii.   तात्काळ जवळ असलेल्या आरोग्य यंत्रणेला ( दवाखाना / क्लिनिक) माहिती द्यावी अथवा जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावे.

iv.    संबंधित आजारी व्यक्तीबाबत सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणामार्फत ( जिल्हा रॅपिड रिस्पॉन्स टिम / चिकित्सक) यामार्फत पुढील कार्यवाही केली जाईल आणि त्याअनुषंगाने Contact Tracing , सदर आजारी व्यक्तीवरील उपचार आणि निर्जतुकीकरण विषयक बाबी पार पाडल्या जातील.

v.      संबंधित व्यक्ती कोव्हीड -19 +Ve आढळल्यास संपूर्ण परिसराचे निर्जतुकीकरण करावे.

00000