इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० जून, २०२०

आजअखेर 720 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 99 प्राप्त अहवालापैकी 96 निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यातील 1 अहवाल नाकारण्यात आला. जिल्ह्यात आजअखेर एकूण 841 पॉझीटिव्हपैकी 720 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 110 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 2 पॉझीटिव्ह अहवाल हे यामध्ये आजरा- 1 व सातारा जिल्ह्यातील -1 असा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 79, भुदरगड- 75, चंदगड- 90, गडहिंग्लज- 103, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 57, करवीर- 25, पन्हाळा- 29, राधानगरी- 68, शाहूवाडी- 184, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 39, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47 असे एकूण 827 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, सातारा-1, कर्नाटक-4 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 14 असे मिळून एकूण 841 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 841 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 720 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 110 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा दौरा



        कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
       बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह येथून कृष्णराज देसाई यांचे निवासस्थानाकडे प्रयाण, 10.10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत श्री. कृष्णराज देसाई यांच्या निवासस्थानी राखीव (स्थळ : दौलत बंगला, व्हिक्टर पॅलेस पाठीमागे, रूक्मीणीनगर, कोल्हापूर), दुपारी 2 ते 2.15 वाजेपर्यंत मा. लोकनेते बाळासाहेब देसाई पुतळा स्थळपाहणी, महाराणी ताराराणी चौकाजवळ, 2.30 वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन, 3 वा. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, सोईनुसार शासकीय वाहनाने दौलतनगर, ता. पाटण जि. सातारकडे प्रयाण.
0000

शेजारील जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी 31 जुलैअखेर दैनंदिन पास देण्यासाठी विशेष अधिकारी प्राधिकृत -जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई



      कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात विविध आस्थापनामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना ये-जा करण्यासाठी आता 31 जुलै 2020 पर्यंत दैनंदिन पास देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी विशेष अधिकारी प्राधिकृत केले आहेत, यापूर्वी ही मुदत 30 जून 2020 पर्यंत होती. 
              कोरोना विषाणू (कोव्हिड १९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने 31 जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे.  मात्र, हे करताना राज्याची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी उद्योग घटकांना परवानगी दिली आहे.
           जिल्हयातील विविध उद्योग घटकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात उद्योग घटकांमध्ये कामगार कामास आहेत तसेच विविध शासकीय, निम शासकीय विभागामधील अधिकारी / कर्मचारी, खासगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांचे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि सर्व बँक कर्मचारी यांना देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणा-या सांगली व सातारा जिल्हयातून वारंवार कामावर जाण्यासाठी ये-जा करावी लागते. त्यानुसार कामगार तसेच अधिकारी / कर्मचाऱ्यांना  त्यांच्या कामाच्या ठिकाणी ये -जा करण्यासाठी दैनंदिन पास देणे आवश्यक असून यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
          यामध्ये कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योग व इतर खासगी आस्थापनांसाठी  महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर यांची तर सर्व शासकीय विभाग व सर्व बँक आस्थापनांसाठी  तहसिलदार करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा आणि शाहूवाडी  यांची तसेच खासगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांसाठी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशित केले आहे.  संबंधित अधिकारी/कर्मचारी व कामगारांना पास वितरीत करण्यापूर्वी अधिकारी/कर्मचारी व कामगारांची खालील कागदपत्रे तपासून 31 जुलैपर्यंतचे दैनंदिन पास देण्याबाबतची कार्यवाही करावी.
         यामध्ये ती  व्यक्ती काम करीत असलेल्या आस्थापनेचे प्रमाणपत्र, व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत आधारकार्ड किंवा इतर रहिवास इत्यादी पुरावा, व्यक्तीचे ओळखपत्र यांचा समावेश आहे. या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) कलम 188 अन्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी दिला.
0000000

जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन -जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई



कोव्हीड विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देशाचे पालन आवश्यक
कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत  येत्या 31 जुलैपर्यंत वाढविण्यात येत असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करुन  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 31 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असून प्रतिबंधीत / बंद क्षेत्रे व सुट / वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवणेत येत आहेत. शासनाच्या दिनांक 29 जून 2020 रोजीच्या आदेशामध्ये नमुद प्रतिबंध व सुट लागु असेल.
कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतूदींच्या अंमलबजावणीसाठी निर्गमीत केलेल्या अधिसुचनेनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेव भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोव्हीड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देशाचे पालन आवश्यक
कोव्हीड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देश जिल्हयातील सर्व नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बंधनकारक आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीदरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक आहे. दुकानामध्ये व  दुकान परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती / गिऱ्हाईक तसेच उपस्थित असलेल्या व्यक्ती / गिऱ्हाईक मध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल. विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.  अंत्यसंस्कार / अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल. राज्य तसेच स्थानिक प्राधिकरणाव्दारे करण्यात आलेल्या नियमानुसार तसेच कायद्यामध्ये नमूद असलेल्या तरतूदीनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी थुंकणे हे दंडनिय असेल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त दिशानिर्देशानुसार शक्यतोवर काम हे घरातून करणे विषयीची बाब पाळण्यात यावी.  कार्यालये/ आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिग/ हॅड वॉश/ सॅनिटायझर हे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. कामाच्या ठिकाणीअसलेल्या सार्वजनिक वापराचे ठिकाणे तसेच सर्व गोष्टी ज्या मानवी संपर्कामध्ये उदा. दरवाज्याचे हॅण्डल, इत्यादी तसेच सतत हाताळली जाणाऱ्या बाबींची पुन्हा पुन्हा निजतुकिकरण करण्यात याव्यात.  तसेच कामाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामागारामधील पुरेसे अंतर, कामाच्या वेंळादरम्यान पुरेसे अंतर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळामध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.  देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
00000

संसर्ग रोखण्यात यशस्वी झाल्याबद्दल गृहराज्यमंत्र्यांकडून कौतुक कोरोना रोखण्यासाठी कोल्हापूरने युनिक पॅटर्न राबविला -गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई



कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तीनही मंत्र्यांनी तसेच प्रशासनाने विशेषत: पोलीस, आरोग्य, महसूल   या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले आहे. या नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी आज दिल्या.
        येथील शासकीय विश्राम गृहातील राजर्षी शाहू सभागृहात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.
            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल यांनी संगणकीय सादरीकरण करून कोव्हिडबाबत सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी 18 प्रवेश नाक्यावरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या संगणक प्रणालीद्वारे तपासणीबाबतची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती यादव, समाज कल्याण आयुक्त बाळासाहेब कामत, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनीही यावेळी माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागाचा आढावा दिला.
            गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यावेळी म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी चांगलं प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. 24*7 फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली आहे. विशेषत: पोलीस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून ते पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे.
            जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता या पुढील काळात घ्यावी. पणन, उत्पादन शुल्क, वस्तु व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्री महोदयांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सोबत : फोटो जोडला आहे.
000000

31 जुलै अखेर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सहभाग नोंदवावा -कृषि सहसंचालक श्री. दशरथ तांभाळे



      कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): खरीप हंगाम सन 2020-21 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग सोयाबीन या पिकासाठी लागू आहे. पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 31 जुलै 2020 अखेर मुदतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागीय कृषि सहसंचालक श्री. दशरथ तांभाळे यांनी केले आहे.
         सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जदार अथवा बिगर कर्जदार ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र राहतील. योजनेतील सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका राहणार असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के तर नगदी पिकासाठी 5 टक्के इतका आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2020 अखेर आहे.
         कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही योजना राबविण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.
            प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी, लावणी झाल्यामुळे (एकुण पेरणी क्षेत्राच्या 25 टक्क्यापेक्षा कमी पेरणी झाल्यास) होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये (सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत) पूर, पावसातील खंड, दुष्काळ..इ. सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण पुरविण्यात येत आहे.
          याशिवाय पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात येणारी घटीमुळे होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीनंतर 14 दिवसापर्यंत नुकसानसाठी विमा संरक्षण आहे.
         शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याकरिता नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड/आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/सहमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बॅंक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे खाते कार्यरत असणारी बॅंक शाखा/ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, संबधित विमा कंपनी कार्यालय, आपले सरकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.
         याशिवाय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुनही शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.
000000

कृषी संजीवनी सप्ताहाचा 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान आयोजन -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे



            कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी आणि कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्या शास्त्रज्ञ या सर्वांच्या समन्वयाने दिनांक 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषी संजिवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गावांमध्ये गावबैठका, शिवार भेटी, शेतीशाळा या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात प्रामुख्याने शेतकऱ्यांसोबत गावात कृषी विषयक राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच नाविन्यपूर्ण, प्रयोगशील व उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार व त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.
कृषी विषयक मोफत सल्ला व मार्गदर्शनकरीता एम. किमास पोर्टलवर शेतकरी नोंदणी, शेतकरी मासिकाचे वर्गणीदार वाढविणे, विविध पीक स्पर्धा आणि पुरस्कारांबाबत प्रचार-प्रसिध्दी, आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी म्हणी व घोषवाक्ये, सादरीकरणासह तांत्रिक मार्गदर्शन, पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान, आधारित फळ पीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण, वाचन आणि मार्गदर्शन, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, बियाणे, उगवण व क्षमता चाचणी प्रात्यक्षिक, कडधान्य आंतरपिक, बहुपीक पध्दती, हायड्रोफोनिक्स-हिरवा चारा निर्मिती, विविध केंद्र व राज्य शासन पुरस्कृत कृषी व कृषी संलग्न विभागांच्या योजना, भात, सोयाबीन, मका, ऊस पिकांवरील कडी व रोग व्यवस्थापन मार्गदर्शन आहे.
तसेच श्री, चारसुत्री, एस. आर. टी. पध्दतीने भात लागवड, बी-बियाणे, खते, औषधे खरेदी व वापर करताना घ्यावयाची काळजी, फळबाग लागवड कार्यक्रम, मूलस्थानी जलसंधारण, आपत्कालीन पीक नियोजन इत्यादी विषयांवर स्थानिक परिस्थितीनुसार तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.
          गावांमध्ये दिनांक 1 ते 7 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहात शेतकऱ्यांनी सहभागी होवून तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी/ उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच सप्ताहात सहभागी होणारे शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
000000

हरवलेल्या क्षणाला.. उबगलेल्या मनाला.. उभारी देणारं ‘हितगुज’






कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): ठिक सकाळी 10.15 वाजता... ते सगळे परिघाप्रमाणे उभे राहतात... सर्वांचे हात जोडले जातात... लॅपटॉपवरील प्रार्थनेबरोबर खड्या आवाजात ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ प्रार्थनेला सुरूवात होते... प्रार्थनेनंतर ध्यानधारणा ओमकार स्वराने...आणि हितगुजाने शेवट...हे दृष्य कोणत्याही शाळेतील नसून जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या कार्यालयातील आहे.
       गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यालयात ताण-तणाव मुक्त राहण्यासाठी हितगुज’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये जिल्ह्यातील एखादा अधिकारी हितगुजासाठी बोलविला जातो. बालपणापासून हरवत गेलेलं हितगुज या निमित्ताने होत जातं. या हितगुजामधून एक नवी ऊर्जा मिळून जाते. त्यामुळे मनाला उभारी तर मिळतेच शिवाय प्रसन्न मनाने कार्यक्षमता वाढते.
          जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, हेमंत निकम, दत्तात्रय कवितके, उपसंचालक भाग्यश्री फरांदे, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तहसिलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, लेखाधिकारी प्रशांत जाधव, डॉ. गोपाळ आयरोणी, पत्रकार अतुल जोशी आदी हितगुज करण्यासाठी सहभागी  झाले आहेत. या हितगुजामुळे गेल्या दोन महिन्यात आमच्या स्वभावात सकारात्मक बदल झाला आहे. लवकर उठणे, योग साधना, वाचन करत असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. ताण-तणावात उबगलेल्या मनाला, हरवलेल्या क्षणाला प्रभावीपणे जगण्याची रसद पुरवणारा ‘हितगुज’ उपक्रम अन्य कार्यालयांमध्ये निश्चितच व्हायला हवा.
           

000000


आजअखेर 716 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजेपर्यंत 318 प्राप्त अहवालापैकी 310 निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यातील 1 अहवाल प्रलंबित आहे तर चंदगड तालुक्यातील 1 पॉझीटिव्ह अहवाल रिपीट आला आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 839 पॉझीटिव्हपैकी 716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 112 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 5 पॉझीटिव्ह अहवाल हे नगरपरिषद क्षेत्राचा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 78, भुदरगड- 75, चंदगड- 90, गडहिंग्लज- 103, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 57, करवीर- 25, पन्हाळा- 29, राधानगरी- 68, शाहूवाडी- 184, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 39, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47 असे एकूण 826 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-4 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 13 असे मिळून एकूण 839 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 839 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 716 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 112 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

1 बंधारा पाण्याखाली कोयनेतून 2111 क्युसेक विसर्ग सुरू





          कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 73.01 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 32.08 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 67.181 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 42.07 दलघमी, वारणा 401.30 दलघमी, दूधगंगा 281.91 दलघमी, कासारी 30.16 दलघमी, कडवी 25.52 दलघमी, कुंभी 31.58 दलघमी, पाटगाव 38.74 दलघमी, चिकोत्रा 16.83 दलघमी, चित्री 15.01 दलघमी, जंगमहट्टी 8.87 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 15.44 दलघमी, कोदे (ल पा) 5.90 दलघमी असा आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.4 फूट, सुर्वे 12.10 फूट, रुई 39.8 फूट, इचलकरंजी 35 फूट, तेरवाड 34.6 फूट, शिरोळ 27.9 फूट, नृसिंहवाडी 20.9 फूट, राजापूर 11.9 फूट तर नजीकच्या सांगली 6.6 फूट व अंकली 5.11 फूट अशी आहे.
00000

गगनबावडा तालुक्यात काल 32 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 32 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 2.13 एकूण 116.38 मिमी, शिरोळ- 31.71 एकूण 119.86 मिमी, पन्हाळा- निरंक एकूण 358.71 मिमी, शाहूवाडी- 4.50 मिमी एकूण 493, राधानगरी- निरंक एकूण 464.50 मिमी, गगनबावडा-32 मिमी एकूण 1187.50 मिमी, करवीर- निरंक एकूण 314.91 मिमी, कागल- 0.29 एकूण 352 मिमी, गडहिंग्लज- 5.43 एकूण 223.14 मिमी, भुदरगड- 2 एकूण 392.20 मिमी, आजरा- 2 एकूण 455.25 मिमी, चंदगड- 5.67 मिमी एकूण 491.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

सोमवार, २९ जून, २०२०

आजअखेर 716 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 148 प्राप्त अहवालापैकी 144 निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यामध्ये 1 अहवाल नाकारण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 834 पॉझीटिव्हपैकी 716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 108 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 3 पॉझीटिव्ह अहवाल हे कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील आहेत.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 78, भुदरगड- 75, चंदगड- 90, गडहिंग्लज- 103, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 57, करवीर- 25, पन्हाळा- 29, राधानगरी- 68, शाहूवाडी- 184, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 34, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47 असे एकूण 821 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-4 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 13 असे मिळून एकूण 834 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 834 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 716 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 108 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

प्लाझ्मा थेरेपीमुळे 8 रूग्णांवर उपचार; 5 जणांना डिस्चार्ज प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर- पालकमंत्री सतेज पाटील



       कोल्हापूर,दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): येथील सीपीआर रूग्णालयामध्ये आजअखेर 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे. यातील 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित तिघांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
        जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरेपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई येथून सहभागी झाले होते.
            सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यावेळी म्हणाले, प्लाझ्मा थेरेपी कोरोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावत असून कोल्हापूर येथे रूग्णावर केलेली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्री श्री पाटील यावेळी म्हणाले, मुंबई येथील रूग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी कोल्हापूर येथून प्लाझ्मा पाठविण्यात आला होता. आजअखेर कोल्हापुरातील 8 रूग्णांवर प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे. यातील 5 रूग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.  प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर असून मुख्यमंत्री महोदयांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत आवाहन केले असून त्याला निश्चितपणे कोल्हापूर येथून चांगला प्रतिसाद मिळेल, असेही ते म्हणाले.
            आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या दोघांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.
        सोबत : फोटो जोडला आहे.
000000

रविवार, २८ जून, २०२०

आजअखेर 714 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 388 प्राप्त अहवालापैकी 367 निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यापैकी 15 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 820 पॉझीटिव्हपैकी 714 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 96 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 6 पॉझीटिव्ह अहवालामध्ये हातकणंगले-1, पन्हाळा-1, नगरपरिषद क्षेत्र -1 व कोल्हापूर  महानगरपालिका क्षेत्र -3  असा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 78, भुदरगड- 75, चंदगड- 83, गडहिंग्लज- 100, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 57, करवीर- 25, पन्हाळा- 29, राधानगरी- 68, शाहूवाडी- 184, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 33, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-44 असे एकूण 807 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-4 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 13 असे मिळून एकूण 814 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 820 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 714 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 96 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनावर चांगले नियंत्रण ॲन्टीजेन टेस्ट आणि संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या -गृहमंत्री अनिल देशमुख




       कोल्हापूर,दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील ग्रामसमिती, प्रभागसमिती, लोकप्रतिनिधी, प्रशासन या सर्वांनी मिळून कोरोनावर चांगले नियंत्रण ठेवले आहे. त्याबाबत पुढील काळातील नियोजन आणि त्याबाबतची योग्य तयारीही ठेवली आहे. तासाभरात अहवाल मिळणाऱ्या ॲन्टीजेन टेस्ट सुरू करून संस्थात्मक अलगीकरणावर अधिक भर द्यावा, अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली.
       येथील शासकीय विश्रामगृहातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात आज कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार पी.एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, महापौर निलोफर आजरेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
           जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून जिल्ह्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती, उपाययोजना आणि भविष्यातील तयारी याबाबत माहिती दिली. रूग्णांच्या डिस्चार्जबाबत राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याचे सांगून एकूण 814 पैकी ग्रामीण भागात 728, शहरी भागात 73, इतर जिल्ह्यामधील 13 असल्याचे आणि मृत्युदर अवघा 1 टक्का असल्याचे सांगितले. पीपीई कीट, एन 95 मास्क, सर्जीकल मास्क, ग्लोव्हज आदीचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचेही ते म्हणाले.
          विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे तसेच पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे संगणकीय सादरीकरण करून कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.  
          गृहमंत्री श्री. देशमुख यावेळी म्हणाले जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत 14 रूग्ण संख्या होती. जिल्ह्याच्या सीमा उघडल्यानंतर त्यामध्ये वाढ झाली. जिल्ह्यातील 38 हजार परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. हे मजूर आता पुन्हा जिल्ह्यामध्ये परत येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यावर मोठा ताण असणार आहे. या श्रमिकांचे दक्षता घ्यावी लागणार आहे. संस्थात्मक अलगीकरण वाढवून त्यावर अधिक भर द्या. त्याचबरोबर अवघ्या तासाभरात अहवाल मिळणाऱ्या ॲन्टीजेन टेस्ट घ्यायला सुरूवात करा.
          कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाबत चांगले नियंत्रण आणि योग्य नियोजन करण्यात आले आहे. प्लाझ्मा थेरेपीचा चांगला वापर करण्यात आला आहे. पल्स ऑक्सीमीटरवर भर दिला आहे. या सर्वामुळे जिल्ह्यातील संक्रमण फार कमी आहे. रेमडेझीवीअर या औषधांची खरेदी करून साठा ठेवावा. कोरोनाचे संक्रमण वाढू देऊ नका त्याबाबत दक्षता घ्या, असेही ते म्हणाले.
          लवकरच 8 हजार पोलीस भरतीला गती देणार असल्याचे सांगून गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, मागणीप्रमाणे गृहरक्षक दल पुरविण्यात आले असून यापुढेही देण्याची तयारी आहे.  चंदगड तालुक्यात नव्याने पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव पाठवा. सद्याची दुकानांच्या 5 वाजेपर्यंत असणाऱ्या वेळेत वाढ करण्याबाबत जिल्ह्यातील तीनही मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
          आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुक्यात पोलीस ठाणे देण्याबाबत तसेच पोलीसांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली. आमदार प्रकाश आबीटकर यांनी जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई सारखे सक्त नियम न लावता थोडी शिथिलता असायला हवी, अशी मागणी केली. आमदार ऋतुराज पाटील यांनी दुकानाची वेळ 2 तासांनी वाढविण्याबाबत तसेच पोलीस आयुक्तालय होण्याबाबत मागणी केली. आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार पी.एन.पाटील यांनीही यावेळी जिल्ह्यात येणाऱ्यांचे स्वॅब घेण्याबाबत सांगितले. अतिरिक्त पोलीस तिरूपती काकडे यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रभारी अधिष्ठाता आरती घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे-भामरे उपस्थित होते.  
         
          सोबत : फोटो जोडला आहे.
0 0 0 0 0 0

1 बंधारा पाण्याखाली कोयनेतून 2111 क्युसेक विसर्ग सुरू



          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.52 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घटप्रभा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 32.32 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 65.439 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 42.38 दलघमी, वारणा 401.30 दलघमी, दूधगंगा 278.50 दलघमी, कासारी 30.46 दलघमी, कडवी 26.67 दलघमी, कुंभी 31.16 दलघमी, पाटगाव 37 दलघमी, चिकोत्रा 16.83 दलघमी, चित्री 14.94 दलघमी, जंगमहट्टी 8.70 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 14.09 दलघमी, कोदे (ल पा) 5.36 दलघमी असा आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.7 फूट, सुर्वे 12.11 फूट, रुई 39.6 फूट, इचलकरंजी 35 फूट, तेरवाड 34.9 फूट, शिरोळ 28 फूट, नृसिंहवाडी 21 फूट, राजापूर 11.6 फूट तर नजीकच्या सांगली 6.3 फूट व अंकली 5.11 फूट अशी आहे.
00000


गगनबावडा तालुक्यात काल 34 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 34 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- निरंक एकूण 113.38 मिमी, शिरोळ- 1 एकूण 88.14 मिमी, पन्हाळा- निरंक एकूण 358.14 मिमी, शाहूवाडी- 1.17 मिमी एकूण 484, राधानगरी- 1.50 एकूण 464.50 मिमी, गगनबावडा-34 मिमी एकूण 1126.50 मिमी, करवीर- निरंक एकूण 314.91 मिमी, कागल- 2.43 एकूण 351.71 मिमी, गडहिंग्लज- 6.43 एकूण 217.29 मिमी, भुदरगड- 0.40 एकूण 387.20 मिमी, आजरा- 2 एकूण 450.25 मिमी, चंदगड- 0.33 मिमी एकूण 484 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000



शनिवार, २७ जून, २०२०

आजअखेर 713 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 177 प्राप्त अहवालापैकी 173 निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. 2 अहवाल नाकारण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 800 पॉझीटिव्हपैकी 713 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 77 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 3 पॉझीटिव्ह अहवालामध्ये चंदगड- 1, इतर  राज्यातील -2  असा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 78, भुदरगड- 74, चंदगड- 82, गडहिंग्लज- 100, गगनबावडा- 6, हातकणंगले- 14, कागल- 57, करवीर- 25, पन्हाळा- 28, राधानगरी- 68, शाहूवाडी- 184, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 26, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-37 असे एकूण 787 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-4 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 13 असे मिळून एकूण 800 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 800 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 713 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 77  इतकी आहे.
0 0 0 0 0 0