इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

सीपीआर, आयजीएम आणि एस. डी. एच गडहिंग्लजचे ऑक्सीजन सिक्युरिटी ऑडीट करण्यासाठी समिती नियुक्त जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय):  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील ऑक्सीजन त्यात वाढ करण्यात येणाऱ्या पुरवठा यंत्रणेचे सुरक्षा ऑडीट करण्यासाठी (ऑक्सीजन सिक्युरिटी ऑडीट) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत.

       छत्रपती प्रमिलाराजे र्वोपचार रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे बॉयोमेडिकल इंजिनिअर डॉ. वैजनाथ कापरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्‍पीपाटील, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवींद्र शेटे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे, बॉयोमेडिकल इंजिनिअर डॉ. वैजनाथ कापरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयासाठी यांत्रिकी मंडळचे कार्यकारी अभियंता सुभाष बागीवडे, गडहिंग्लज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्‍पीपाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गठित समितीस रुग्णालयात बसविण्यात आलेल्या जुन्या व नविन ऑक्सीजन पुरवठा यंत्रणेची सुरक्षा तपासणी करणे, ऑक्सीजन पुरवठा करणारी यंत्रणा जसे की, गॅस पाईप लाईन, गॅस प्लँट, गॅस आऊटलेट यांची वेळेवेळी पहाणी, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयास सूचना देणे व रुग्णालय प्रमुखाकडून अमलबजावणी करुन घेणे. ऑडीट मध्ये ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक नियमावली निश्चित करणे व उपाय योजना सूचविणे आणि त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संबंधीत रुग्णालया प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्याकडून  त्रुटी पूर्तता करुन घेणे. आवश्यकतेप्रमाणे खासगी यंत्रणेकडून सल्ला व अंमलबजावणी करुन कामावर नियंत्रण ठेवणे.  

याबाबतचा अहवाल समितीने सात दिवसात सादर करावा. सुचविलेल्या उपाययोजनांबाबत अंमलबजावणीही करावी. समितीचे कामकाज व पत्रव्यवहार व इतर प्रशासकीय व तांत्रिक कामासाठी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जबाबदार राहतील. समिती मार्फत सुचविण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाय योजनांची कामे करणे, अंदाज पत्रके तयार करणे, निविदा मागविणे व काम करुन घेण्यासाठी समितीस अधिकार प्रदान करण्यात येत आहे. समितीच्या मान्यतेनंतर संबंधित समिती अध्यक्ष, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम व यांत्रिकी मंडळ यांना निविदा मागविणे व पुढील काम करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

ही रुग्णालये त्यांच प्रमाणे जिल्ह्यातील इतर सर्व कोव्हिड उपचारासाठी  विहित केलेल्या परंतु या आदेशाव्यतिरिक्त इतर सर्व रुग्णालयातील ऑक्सीजन पुरवठा यंत्रणेची तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची व निधी उपलब्ध करुन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या त्या रुग्णालयांचे जिल्हा प्रमुख यांची राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये व भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये कारवाईस पात्र राहील यांची नोंद घेण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशात म्हटले आहे.

0  00 0 0 0

आजअखेर 34 हजार 64 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 632 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 405 निगेटिव्ह तर 223 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (4 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 356 प्राप्त अहवालापैकी 317 निगेटिव्ह तर 39 पॉझीटिव्ह (86 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 459 प्राप्त अहवालापैकी 269 निगेटिव्ह तर 190 पॉझीटिव्ह  असे एकूण 452 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 44 हजार 434 पॉझीटिव्हपैकी 34 हजार 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 929 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 452 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-7, भुदरगड- 12, चंदगड-13, गडहिंग्लज-32, हातकणंगले- 44, कागल-18, करवीर-32, पन्हाळा- 25, राधानगरी-11, शाहूवाडी-16, शिरोळ-17, नगरपरिषद क्षेत्र- 81, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 111 व इतर शहरे व राज्य 33 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-792, भुदरगड- 1090, चंदगड- 1020, गडहिंग्लज- 1247, गगनबावडा- 128, हातकणंगले-4883, कागल-1539, करवीर-5141, पन्हाळा- 1729, राधानगरी-1159, शाहूवाडी-1186, शिरोळ- 2313, नगरपरिषद क्षेत्र-6818, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 485 असे एकूण  42 हजार 530 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 904 असे मिळून एकूण 44  हजार 434  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 44 हजार 434 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 34 हजार 64 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 441 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 929 इतकी आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 84684 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 17787 घरांचे आणि 84684 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

           ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा-176 घरांचे व 1652 नागरिकांचे. भुदरगड 58 घरांचे व 249 नागरिकांचे, चंदगड 2155 घरांचे व 10695 नागरिकांचे, गडहिंग्लज 584 घरांचे व 2456 नागरिकांचे, हातकणंगले 2948 घरांचे व 14070 नागरिकांचे, पन्हाळा 2218 घरांचे व 10724 नागरिकांचे, राधानगरी 487 घरांचे व 4024 नागरिकांचे, शाहूवाडी 884 घरांचे व 4670 नागरिकांचे, तर शिरोळ- 1408 घरांचे व 6466 नागरिकांचे असे एकूण 10918 घरांचे व 55006 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

          नगरपंचायत चंदगड 204 घरांचे व 982 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 737 घरांचे  व 2984 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 48 घरांचे व 289 नागरिकांचे, नगरपंचायत हुपरी 206 घरांचे व 853 नागरिकांचे,  नगरपंचायत कागल 481 घरांचे व 1945 नागरिकांचे, नगरपंचायत शिरोळ 336 घरांचे व 1475 तर नगरपंचायत जयसिंगपूर 233 घरांचे व 1024 नागरिकांचे, असे एकूण 2245 घरांचे व 9552 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील 4624 घरांचे तर 20126 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

 

 

 

आपले सरकार केंद् स्थापन करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत - उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे

 

  कोल्हापूर, दि. ३० (जिल्हा माहिती कार्यालय)- राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, नागरी सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्र यांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देवून सर्व कॉमन सर्व्हीस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयातील सेतूच्या ठिकाणी (करवीर तालुका वगळून) आपले सरकार केंद्र स्थापन करावयाचे आहे. यासाठी 1 ते 31 मार्च 2020 या कलावधीमध्ये अर्ज करण्यात आले होते. कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर या कामास दि. 27 मार्च रोजी स्थागिती देण्यात आली होती. ही कार्यवाही पुन्हा सुरु करण्यात येत असून 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये इच्छुक नागरिकांनी अर्ज करावे, असे आवाहन उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावरु अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन घ्यावा. अर्ज दिलेल्या मुदतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेळेत स्वीकारण्यात येतील.  यापूर्वी दि. 1 ते 31 मार्च या कालावधीमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांनी पुन्हा अर्ज करण्यची आवश्यकता नाही. सदर कालावधीतील अर्जांचा या प्रक्रीयेमध्ये समावेश करण्यात येईल, असेही श्री. गलांडे यांनी कळविले आहे.

 0 00 0 0 0

'मास्क नाही तर प्रवेश नाही' मुख्यमंत्र्यांनी गौरवलेली कोल्हापूरची मोहीम मुंबईत

 



 

        कोल्हापूर, दि. ३० (जिल्हा माहिती कार्यालय)- 'मास्क नाही तर प्रवेश नाही'  कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम 'बेस्ट' ने मुंबईत राबविण्यास सुरु केली आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी' मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरु केली. यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिल आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक  वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्यात येत आहेत.

    या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत.

0        0 0 0 0 0

कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती कार्यक्रम जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ

 




कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रमोद खंडागळे उपस्थित होते.        

            कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रातील लोकांचे प्रबोधन व्हावे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे आणि आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी या मोबाईल व्हॅनवरुन शाहिरी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या बरोबरच  मोबाईल व्हॅनवरुन ऑडिओ क्लिपद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.

000000

सीपीआर, आयजीएम आणि एस. डी. एच गडहिंग्लजसाठी स्वतंत्र समिती नियुक्त आग प्रतिबंधात्मक व विद्युत पुरवठा यंत्रणेचे होणार ऑडीट जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय):  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील आग प्रतिबंधात्मक व विद्युत पुरवठा यंत्रणेचे ऑडीट करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत.

       छत्रपती प्रमिलाराजे र्वोपचार रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. चौगुले, महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी रणजित चिले, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे डॉ. उल्हास मिसाळ तर सदस्य सचिव म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. हजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. चौगुले, इचलकरंजी नगरपालिका विभागाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र मिरगे तर सदस्य सचिव म्हणून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविकुमार शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून गडहिंग्लजमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मांजरेकर, कोल्हापूरमधील सार्वजनिक बांधकामाच्या विद्युत उपविभागाचे उपअभियंता सी. बी. चाकोते, गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशम दलाचे रविनंदन जाधव तर सदस्य सचिव म्हणून गडहिंगलज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक आंबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गठित समितीस रुग्णालयामधील आगसंरक्षक यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही करणे, रुग्णालयातील आगसंरक्षक यंत्रणा सुस्थितीत असल्याचे ऑडीट करणे, रुग्णांलयातील इलेक्ट्रिकल फिटिंग सुस्थितीत असल्याचे ऑडीट करणे, ऑडीट मध्ये ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक नियमावली निश्चित करणे व उपाय योजना सूचविणे, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयास सूचना देणे आणि आवश्यकतेप्रमाणे खासगी यंत्रणेकडून सल्ला घेणे असे कामकाज करावयाचे आहे. याबाबतचा अहवाल समितीने सात दिवसात सादर करावा.

ही रुग्णालये त्यांच प्रमाणे जिल्ह्यातील इतर सर्व कोव्हिड उपचारासाठी  विहित केलेल्या परंतु या आदेशाव्यतिरिक्त इतर सर्व रुग्णालयातील आग प्रतिबंधक व विद्युत पुरवठा यांची तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची व निधी उपलब्ध करुन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या त्या रुग्णालयांचे जिल्हा प्रमुख यांची राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये व भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये कारवाईस पात्र राहील यांची नोंद घेण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशात म्हटले आहे.

आरटीपीसीआरचे सुधारित दर निश्चित

 


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :  कोविड-19 तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी शासनाने 7 सप्टेंबरच्या शासननिर्णयानुसार सुधारित दर निश्चित केले आहेत. 

       यापुर्वी 7 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासननिर्णयानुसार निश्चित केलेले दर अधिक्रमित करुन हे दर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित केलेले दर सर्व करासहित निश्चित केले असून कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही.

       नवीन दरानुसार संकलन ठिकाणावरुन नमुन्याची निवड करणे, नमुन्याची वाहतुक आणि अहवाल देणे /रिपोर्टींग करणे यासाठी 1200 रुपये, नमुना संग्रह ठिकाणाहून नमुना घेणे, कोविड केअर कलेक्शन सेंटर, हॉस्पिटल, दवाखाना, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा इत्यादी ठिकाणाहून नमुना घेणे यासाठी 1600 रुपये आणि रुग्णाच्या वास्तव्यापासून  रुग्णाचा नमुना घेणे, नमुन्याचे वहन, तपासणी आणि अहवाल यासाठी रुपये 2000 इतर दर निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये व्हीटीएम, पीपीई, आरएनए एक्सट्रॅक्शन किट,आरटीपीसीआर किट आदी बाबींचा समावेश आहे.

000000

स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा -सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

 





कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली.

        सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी आज सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, धोका टळला सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर लवकरात लवकर फायर ऑडीट करुन घ्यावे. आरोग्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा द्यावी.

            जिल्ह्यातील बाधितांची संख्या, मुक्त झालेल्यांची संख्या, मृत्यूदर, उपचार घेत असणारे रुग्ण, रेमडेसिवीरची उपलब्धता, इतर अनुषंगिक औषधांची उपलब्धता, आरोग्य साधनांची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती श्री. यड्रावकर यांनी घेतली.

            यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे, डॉ. बी. वाय. माळी उपस्थित होते.

00000

प्रमुख जिल्हा मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण मार्गे वाहतूक सुरू आहे.

00000

अलमट्टीतून 38922 क्युसेक विसर्ग सुरू

 


          कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 231.67 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार कोयनेतून 1050 तर अलमट्टी धरणातून 38922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी असा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 105.15टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.56 दलघमी, पाटगाव 104.63 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा  43.373 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 13.6, सुर्वे 15.8 फूट, रुई 42 फूट, इचलकरंजी 38 फूट, तेरवाड 37.6 फूट, शिरोळ 30.6 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 16.6 फूट तर नजीकच्या सांगली 8.6 फूट व अंकली  8.10 फूट अशी आहे.

000000

 

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

आजअखेर 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 894 प्राप्त अहवालापैकी 753 निगेटिव्ह तर 141 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 341 प्राप्त अहवालापैकी 297 निगेटिव्ह तर 44 पॉझीटिव्ह (94 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 151 प्राप्त अहवालापैकी 131 निगेटिव्ह तर 20 पॉझीटिव्ह  असे एकूण 205 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्हपैकी 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 262 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 205 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड- 17, चंदगड-15, गडहिंग्लज-4, हातकणंगले- 28, करवीर-27, पन्हाळा- 3, राधानगरी-2, शाहूवाडी-16, शिरोळ-12, नगरपरिषद क्षेत्र- 29, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 46 व इतर शहरे व राज्य 3 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-785, भुदरगड- 1078, चंदगड- 1007, गडहिंग्लज- 1215, गगनबावडा- 128, हातकणंगले-4839, कागल-1521, करवीर-5109, पन्हाळा- 1704, राधानगरी-1148, शाहूवाडी-1170, शिरोळ- 2296, नगरपरिषद क्षेत्र-6737, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 374 असे एकूण  42 हजार 111 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 871 असे मिळून एकूण 43  हजार 982  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 33 हजार 297 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 423 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 262 इतकी आहे.

0000000

अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या 50 टक्के अनुदान योजनेसाठी 40 टक्के आणि बीज भांडवल योजनेसाठी 16 टक्के उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सन 2020-21 मध्ये या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या चर्मकार, ढोर, होलार व मोची समाजातील गरजू व आर्थिकदुष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांनी केले आहे.

00000

कृषी यांत्रिकीकरण अनुदानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

 


 

कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :  कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

          शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती बाबतची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’ या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व कृषी अवजारे निवडीसाठी उपलब्ध राहतील. ट्रॅक्टरसाठी दिनांक 14 जुलै 2020 चे शासन निर्णयानुसार अनु.जाती, अनु.जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकरी यांना किमतीच्या 50 टक्के किंवा रु. 1.25 लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40 टक्के किंवा रक्कम रुपये 1 लाख यापैकी कमी असेल  ते याप्रमाणे अनुदान मर्यादा राहील.

          केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी केलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर व अवजारांची यादी farmech.dac.gov.in या पोर्टलवर वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. या  यादीमध्ये समाविष्ठ असलेली किंवा ट्रॅक्टर, पॉवर टिलर वगळता इतर अवजारांच्या बाबतीत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या अवजारांनाच अनुदान अनुज्ञेय आहे.

          कार्यक्रमाचे लक्षांक ऑनलाईन पध्दतीने शासनाच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

 

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेशपात्रता परीक्षा आवेदनपत्रे जमा करण्यास 15 नोव्हेंबर पर्यत मुदत वाढ

 

 

कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षेची आवेदनपत्रे जमा करण्याची मुदत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमि‍क शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.

दिनांक 1 व 2 डिसेंबर रोजी होणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे पुढे ढकलण्यात आल्याने आवेदनपत्र जमा करण्याबाबत दिनांक 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

         

000000

खुल्या स्वरुपातील मिठाईसाठी बेस्ट बिफोर तारीख दुकानात लावणे बंधनकारक

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : स्थानिक बाजारातील मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या प्रत्येक मिठाईसाठी वापरण्यायोग्य कालावधी  (बेस्ट बिफोर तारीख) दुकानाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी कळविले आहे.

          सहायक आयुक्त श्री. शिंगाडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, स्थानिक बाजारातील मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या खाण्या-पिण्याच्या अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणण्यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे.

       आत्तापर्यंत केवळ पॅकबंद अन्न पदार्थाच्या पाकिटावरील लेबल वर्णनामध्ये या पदार्थाची उत्पादन तिथी आणि वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर तारीख) छापणे बंधनकारक होते. तथापि अलीकडच्या कालावधीमध्ये मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या मिठाईमुळे अन्न विषबाधा होत असल्याची प्रकरणे निदर्शनास येत असल्याने खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या मिठाईवर बेस्ट बिफोर तारीख असणे बंधनकारक केले आहे.

          या नियमाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व मिठाई दुकानदारांनी यापुढे त्यांच्या दुकानामध्ये मिळणारी मिठाई वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर तारीख) दर्शविणारा फलक दर्शनी भागामध्ये लावावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी केले आहे.

00000

एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

 


 

कोल्हापूर दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय):-  राज्य शासनाने एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित केले असून त्यानुसार १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी  ३ हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत.

            कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी एच.आर.सी.टी.चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने राज्यातील विविध खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून हे दर निश्चिती केली आहे. यामध्ये सी.टी.स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्म,पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जी.एस.टी. चा समावेश आहे.

            एच.आर.सी.टी नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे दर लागू राहणार असून शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी जर कोणत्याही रुग्णालय/तपासणी केंद्राचे एच.आर.सी.टी तपासणी दर नवीन दरापेक्षा कमी असल्यास, कमी असलेले दर तपासणीसाठी लागू राहतील.एच.आर.सी.टी तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सी.टी. मशिन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल.

            डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय एच.आर.सी.टी करण्याची मागणी नागरीकांडून करण्यात येते. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जन द्वारे तपासणी असल्याने जोखीम असते यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय ही तपासणी करु नये.  एच.आर.सी.टी तपासणी करणाऱ्या रेडीओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखादया रुग्णालयाने किंवा कार्पोरेट /खाजगी आस्थापनेने जर एच.आर.सी.टी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत,

सर्व रुग्णालये/ तपासणी केंद्र यांनी एच.आर.सी.टी तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिन च्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावणे तसेच, निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पीटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील.  तपासणीसाठी निशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी व जिल्हा स्तरावर (महानगरपालिका क्षेत्र वगळून) संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित महानगरपालिका क्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी राहतील. ही दर आकारणी साथरोग कायदयांची अंमलबजावणी असेपर्यंत चालू राहतील.      

000000

प्रमुख जिल्हा मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण मार्गे वाहतूक सुरू आहे.

00000

राधानगरीतून 1000; अलमट्टीतून 38922 क्युसेक विसर्ग सुरू

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 231.46 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1000, कोयनेतून 2000 तर अलमट्टी धरणातून 38922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील रूई व इचलकरंजी असे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 105.15टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 70.97 दलघमी, कुंभी 76.43 दलघमी, पाटगाव 105.17 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा  44.050 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 14.9, सुर्वे 16.8 फूट, रुई 42.6 फूट, इचलकरंजी 39 फूट, तेरवाड 38.3 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 17.6 फूट तर नजीकच्या सांगली 9  फूट व अंकली  9.9 फूट अशी आहे.

000000

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

आजअखेर 32 हजार 749 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 309 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 86 निगेटिव्ह तर 216 अहवाल पॉझीटिव्ह आहेत (7 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 366 प्राप्त अहवालापैकी 326 निगेटिव्ह तर 40 पॉझीटिव्ह (136 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 375 प्राप्त अहवालापैकी 297 निगेटिव्ह तर 78 पॉझीटिव्ह  असे एकूण 334 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 हजार 777 पॉझीटिव्हपैकी 32 हजार 749 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 630 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 334 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-21, भुदरगड- 9, चंदगड-19, गडहिंग्लज-21, हातकणंगले- 32, कागल-20, करवीर-35, पन्हाळा- 18, राधानगरी-8, शाहूवाडी-11, शिरोळ-22, नगरपरिषद क्षेत्र- 53, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 59 व इतर शहरे व राज्य 6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-782, भुदरगड- 1061, चंदगड- 992, गडहिंग्लज- 1211, गगनबावडा- 128, हातकणंगले-4811, कागल-1521, करवीर-5082, पन्हाळा- 1701, राधानगरी-1146, शाहूवाडी-1154, शिरोळ- 2284, नगरपरिषद क्षेत्र-6708, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 328 असे एकूण  41 हजार 909 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 868 असे मिळून एकूण 43  हजार 777  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 43 हजार 777 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 32 हजार 749 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 398 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 630 इतकी आहे.

0000000

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 171235 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 49789 घरांचे आणि 171235 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

           ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा-1408 घरांचे  व 5642 नागरिकांचे. भुदरगड 87 घरांचे व 446 नागरिकांचे, चंदगड 1791 घरांचे व 7777 नागरिकांचे, गडहिंग्लज 924 घरांचे व 3247 नागरिकांचे, गगनबावडा 150 घरांचे व 732 नागरिकांचे, हातकणंगले 5345 घरांचे व 24169 नागरिकांचे, कागल 2498 घरांचे व 10312 नागरिकांचे,  पन्हाळा 4564 घरांचे व 16819 नागरिकांचे, राधानगरी 2209 घरांचे व 11184 नागरिकांचे, शाहूवाडी 3255 घरांचे व 11449 नागरिकांचे, तर शिरोळ- 3936 घरांचे व 17777 नागरिकांचे असे एकूण 26167 घरांचे व 109554 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

          नगरपंचायत चंदगड 168 घरांचे व 767 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 3938 घरांचे  व 23637 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 27 घरांचे व 216 नागरिकांचे, नगरपंचायत हुपरी 643 घरांचे व 1608 नागरिकांचे,  नगरपंचायत मुरगुड 30 घरांचे व 134 नागरिकांचे, नगरपंचायत शिरोळ 303 घरांचे व 1423 तर नगरपंचायत जयसिंगपूर 566 घरांचे व 2386 नागरिकांचे, असे एकूण 5675 घरांचे व 30171 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील 17947 घरांचे तर 31510 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

 

सीपीआर घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय.माळी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांची माहिती

 


 

       कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : येथील सीपीआरमधील ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांनी आज दिली.

       डॉ. बडे यांनी दिलेलय प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,       ट्रॉमा आयसीयूमध्ये एकूण 15 रुग्ण दाखल होते. त्यापैकी आगीची घटना घडलेल्या कक्षात चार रुग्ण होते. सेवेवर असलेले डॉक्टर्स, नर्सेस, वर्ग चार कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखून कोरोनाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून धाडसाने अत्यंत थोड्या वेळात येथील एकूण सर्व 15 रुग्ण अन्य कक्षामध्ये स्थलांतरित केले. या दरम्यान कोणत्याही रुग्णास कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा जिवीत हानी झाली नाही.

          ट्रॉमा आयसीयूमधील तीन कक्षामध्ये एकूण 15 रुग्णांपैकी 9 रुग्ण हे एन.आय.व्ही.वर होते.  उर्वरित रुग्णांना मास्कद्वारे ऑक्सिजन पुरविण्यात येत होता. रुग्ण स्थलांतर दरम्यान योग्य काळजी घेवून इतर आयसीयूमध्ये स्थलांतरित केले. स्थलांतरित केलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये योग्य उपचार तातडीने दिले. उपचार सुरु असताना काही काळानंतर जे रुग्ण अती गंभिर होते त्यापैकी तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये ट्रॉमा आयसीयूमधील घटना घडलेल्या कक्षातील एक व इतर कक्षातील दोन असे एकूण तीन अतिगंभीर रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण दाखल झाल्यापासून अतिगंभीर होते व त्याबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना वेळोवेळी कल्पना देण्यात आली होती.

          मृत्यू झालेल्या तीनही रुग्णांच्या फुफूसामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग असल्याचे दिसून आले होते. तसेच एन.आय.व्ही. असताना सुध्दा त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी राहत होते. त्यांना इतर व्याधीग्रस्त जसे उच्च रक्तदाब अशा प्रकारचे आजार होते. उर्वरित रुग्णांचे उपचार आयसीयूकक्षामध्ये सुरु असून रुग्ण स्थिर आहेत.

          या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता डॉ. बी.वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

0 0  0 0 0 0

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडून चांगल्या कामाबद्दल यंत्रणेचे कौतुक ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरा घरात सर्वेक्षण करा -पालकमंत्री सतेज पाटील

 




 

       कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत दक्ष राहून घरा घरात जावून सर्वेक्षण करा. सर्वेक्षणातून कोणीही सुटता कामा नये. त्याचबरोबर मास्क नाही तर प्रवेश नाही, हा उपक्रमही घरा घरात पोहचवा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.

       जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री श्री. पाटील यांनी तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. उषादेवी कुंभार उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, इथून पुढे अजूनही दक्ष राहून काम करा. कुणीही सर्वेक्षणातून सुटणार नाही याची काळजी घ्या. एकाद्या गावात रुग्ण सापडल्यास यापूर्वी त्या घराचे सर्वेक्षण झाले होते का ? याबाबत चुक सुधारण्यासाठी आपणच आपले परिक्षण करा. गेले सात महिने सर्व यंत्रणा कोव्हिड-19 च्या उपाय योजनेत कार्यरत आहे. आरोग्य यंत्रणेने इथून पुढे सक्षमपणे काम करण्याबाबत नियोजन करावे. जिल्ह्यामध्ये तुमच्या सर्वांकडून चांगलं काम सुरु आहे. असे सांगून सर्व यंत्रणेचे त्यांनी अभिनंदन केले.

          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनीही यावेळी सर्व यंत्रणेचे कौतुक करुन अभिनंदन केले. ते म्हणाले, सर्व यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती, लोक शिक्षण चांगल्या पध्दतीने सुरु आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही याचे फलक लावायला सुरुवात झाली आहे. याची पाहणी काही ठिकाणी भेट देवून केली आहे.  सर्वच नगरपालिका  सक्रीय झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी फलक लागले पाहिजेत आणि त्याचे पालनही व्हायला हवे. त्यासाठी कार्यवाही करावी. ग्रामस्थांनी सवय म्हणून मास्क, सामाजिक अंतर अंगिकारले पाहिजे.  ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन होईल ते दुकान दोन दिवस, आठ दिवस बंद करावे आणि त्याची प्रसिध्दी करावी.

          किरकोळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फेरवाले यांच्याकडूनही या उपक्रमाचे पालन व्हायला हवे. त्यासाठी एनएसएस, एनसीसी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, समाज सेवक यांचा सहभाग घ्यावा. ज्या ठिकाणी सत्काराचे, अभिष्टचिंतनाचे फलक लागतात त्या ठिकाणी या मोहिमेचे फलक लावा. मृत्यूदर 1 टक्याच्यावर जाता कामा नये. याबाबत नियोजन करावे, असे म्हणाले.       

0 0  0 0 0 0