इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३१ मे, २०२१

आजअखेर 93 हजार 542 जणांना डिस्चार्ज


 

   कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3295 प्राप्त अहवालापैकी 2488 अहवाल निगेटिव्ह तर 688 अहवाल पॉझिटिव्ह (119 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3229 प्राप्त अहवालापैकी 2794 अहवाल निगेटिव्ह तर 435 अहवाल पॉझिटिव्ह (241 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 3054 प्राप्त अहवालापैकी 2258  निगेटिव्ह तर 796 पॉझीटिव्ह  असे एकूण 1919 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकुण 40 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 13 हजार 269 पॉझीटिव्हपैकी 93 हजार 542 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 16 हजार 015 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1919 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-36, भुदरगड-68, चंदगड-63, गडहिंग्लज-86, गगनबावडा-13, हातकणंगले-189, कागल-53,  करवीर-303, पन्हाळा-146, राधानगरी-26, शाहूवाडी-29, शिरोळ-180, नगरपरिषद क्षेत्र-220, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 433, इतर जिल्हा व राज्यातील-74 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2477, भुदरगड- 3152, चंदगड- 2643, गडहिंग्लज- 4255, गगनबावडा- 497, हातकणंगले-11833, कागल-3671, करवीर-13964, पन्हाळा- 5005, राधानगरी-2288, शाहूवाडी-2808, शिरोळ- 7123, नगरपरिषद क्षेत्र-13930, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 32 हजार 662 असे एकूण  1 लाख 6 हजार 308 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 6 हजार 961 असे मिळून एकूण 1 लाख 13  हजार 269 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 13 हजार 269 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 93 हजार 542 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 712 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 16 हजार 015 इतकी आहे.

0000000


कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) जिल्ह्यात 15 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 15 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

दिनांक 14 एप्रिल 21 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वा. पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारित करणेत आले  होते. या आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 15 मे 21 रोजीच्या सकाळी 7 वाजल्या पासून ते दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.          

कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नूसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी नूसार जारी करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वा. पासून ते दिनांक 15 जून 2021 रोजीच्या सकाळी 7  वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

      दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या वाहतूकीवर निर्बंध नाहीत. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास सदर दुकान, कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच शासनाकडील दिनांक 12 मे 21 रोजीच्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेव भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000

शिरोळ नगरपरिषदेला सर्वोतोपरी सहाय्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : शिरोळ नगरपरिषद स्थापनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र या संस्थेच्या स्वत:च्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित तो लवकरच निकाली काढू. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला अपेक्षित असलेली जागा मोजणी करुन ती लवकरात लवकर हस्तांतरीत करावी, असे निर्देश मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

शिरोळ येथील जुने तहसिल कार्यालय शिरोळ नगरपरिषदसाठी हस्तातंरण करण्यासाठी आणि कल्लेश्वर तलाव सुशोभिकरणाच्या अनुषंगाने राजर्षी शाहूजी सभागृहात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. शिरोळ येथील गायरान जागा वगळून उर्वरित 20 टक्के क्षेत्रावर तलाव सुशोभिकरणासाठी परवानगी देण्यात येत असल्याचेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तैमूर मुलाणी आदी उपस्थित होते.

0000000

प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 





कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील नागणवाडी, आंबेओहळ सर्फनाला आणि धामणी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील राधानगरी, कागल तसेच आजरा विभागातील लघु-मध्यम प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, शासकीय यंत्रणेकडून प्रकल्पग्रस्तावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी त्याचबरोबर त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ती सर्व मदत करावी. जिल्ह्यातील या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक 2 महिन्यांच्या आत करण्यात यावी. मात्र हे करत असताना प्रकल्पग्रस्तांनीही यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रकल्पग्रस्तांच्या आर्थिक मोबदल्याचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर निकाली काढावा. या कामी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष द्यावे, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी या बैठकीत दिले तर प्रशासनाने जमीनीसह जे-जे अस्तित्वात आहे त्या सर्वांची मोजणी नियमाप्रमाणे करावे आणि त्याचा योग्य तो मोबदला ग्रामस्थांना मिळाला तर ग्रामस्थांचा (प्रकल्पग्रस्तांचा) मोजणीला विरोध नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी यावेळी बैठकीत स्पष्ट केले.

प्रकल्पबाधितासंदर्भातील आवश्यक ती मोजणी पावसाळ्यापूर्वी संपविण्यात येईल. त्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात येत्या बुधवारी करण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी दिली. यावेळी विजय देवणे, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.

0000000

पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 






कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : धरणक्षेत्र वगळता कॅचमेंट भागात जास्त पाऊस पडतो त्यामुळे त्या पावसाचा फटका सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसतो. संभाव्य पूरस्थितीचा फटका बसू नये यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे व पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच पूरस्थितीत फ्रंटलाईन (आघाडी) वर कार्यरत रहावे असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची दूरदृष्यप्रणाली (व्ही. सी.) द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, पोलीस अधिकक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, या नैसर्गिक आपत्तीचा तिन्ही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसतो. तो बसू नये याची दक्षता आत्तापासूनच घ्यायला हवी. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून आगामी 4 महिन्यात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन सुरु असून पुढील काही दिवसात कर्नाटक राज्यातील जलसंपदा मंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचा विचार आहे. शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियाजन करुन उर्वरित पाणीसाठा कसा कमी करता येईल याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे जेणेकरुन पूर परिस्थिती उद्भवणार नाही.  तो धोका टाळता येईल जिवित आणि वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्याला अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे असेही श्री. पाटील म्हणाले.

चौकट

पूर स्थितीत अधिकाऱ्यांनी दक्ष असावे. आपले भ्रमणध्वनी 24 तास चालू ठेवावेत. मेसेज, (SMS) याकडे लक्ष द्यावे. कर्तव्यात कसूर करु नये यात कसूर करण्याऱ्यांची गय केली जाणार नाही.  – मंत्री जयंत पाटील

                  

          पूरस्थितीत एमएससीबी सह इतर आपत्कालीन यंत्रणांची बरीच धावपळ होते ती धावपळ होवू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आत्तापासूनच दक्ष रहावे असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले तर कराडच्या पूर रेषेसाठी वेगळा निकष नको. कोल्हापूर, सांगलीप्रमाणेच तो हवा तसेच सातारा जिल्ह्यातील धरणातून खाली किती पाणी सोडण्यात येणार याची कराड शहराला कल्पना देण्यात यावी जेणेकरुन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोक सावध राहतील असे सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.

          पूरबाधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांना मॅप रिडींग (नकाशा वाचन) बाबत ट्रेनिंग देण्यात यावे. तसेच आगामी काही दिवसात पूरस्थितीबाबत कराडला बैठक घेण्यात यावी अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली तर कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि वीजेचे योग्य नियोजन करण्यात यावे असे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. जिल्ह्यात धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे आवश्यक नियोजन करावे व अनावश्यक पाणी टप्याटप्याने सोडण्यात यावे. कारण पावसाळी स्थितीत जिल्ह्यातील धरणात 25 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक राहिल्यास कोल्हापूर जिल्ह्याला पूराचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

          प्रारंभी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणुमंत गुन्हाले यांनी झूम ॲपवर पूर परिस्थिती आणि धरण क्षेत्रातील स्थितीबाबत सादरीकरण केले.

          यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आपआपल्या जिल्ह्यात पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीचा उहापोह केला. या बैठकीसाठी महसूल, पोलीस, जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह, जलसंपदा विभागाचेही अधिकारी उपस्थित होते.

0000000

रविवार, ३० मे, २०२१


 

आजअखेर 92 हजार 245 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2562 प्राप्त अहवालापैकी 2149 अहवाल निगेटिव्ह तर 331 अहवाल पॉझिटिव्ह (82 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4445 प्राप्त अहवालापैकी 3873 अहवाल निगेटिव्ह तर 572 अहवाल पॉझिटिव्ह (463 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 3049 प्राप्त अहवालापैकी 2193  निगेटिव्ह तर 856 पॉझीटिव्ह  असे एकूण 1759 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकुण 37 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 11 हजार 350 पॉझीटिव्हपैकी 92 हजार 245 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 15 हजार 433 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1759 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-36, भुदरगड-55, चंदगड-37, गडहिंग्लज-56, गगनबावडा-5, हातकणंगले-203, कागल-62,  करवीर-336, पन्हाळा-147, राधानगरी-20, शाहूवाडी-22, शिरोळ-56, नगरपरिषद क्षेत्र-136, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 477, इतर जिल्हा व राज्यातील-111 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2441, भुदरगड- 3084, चंदगड- 2580, गडहिंग्लज- 4169, गगनबावडा- 484, हातकणंगले-11644, कागल-3618, करवीर-13661, पन्हाळा- 4859, राधानगरी-2262, शाहूवाडी-2789, शिरोळ- 6943, नगरपरिषद क्षेत्र-13710, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 32 हजार 229 असे एकूण  1 लाख 4 हजार 461 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 6 हजार 889 असे मिळून एकूण 1 लाख 11  हजार 350 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 11 हजार 350 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 92 हजार 245 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 672 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 15 हजार 433 इतकी आहे.

0000000

 

 

माझा विद्यार्थी -माझी जबाबदारी ही मोहीम शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी -पालकमंत्री सतेज पाटील

 







कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. या लाटेचा मुकाबला प्रभावीपणे आणि एकत्रितपणे करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि इतर माध्यमातील शिक्षकांनी ‘माझा विद्यार्थी- माझी जबाबदारी’ ही मोहीम शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

            संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्यप्रणाली (व्ही.सी.) व्दारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्राथमिक स्तरावर सध्या 150 ओटू बेड तयार करण्यात आले असून 18 वर्षाखालील को-मॉर्बीड विद्यार्थी-विद्यार्थीनींची यादी संबंधित यंत्रणांनी आठ दिवसात तयार करावी. त्याचबरोबर मुले-मुलींच्या मनातील भीती कमी करण्यासाठी, ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांनी किमान एक तास समुपदेशनासाठी राखीव ठेवावा, अशी सूचना करून पालकांनी घाबरून जावू नये असे भावनिक आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी शिक्षक, पालक, आरोग्य यंत्रणा त्याचबरोबर इतर संबंधित घटकांनी एकत्रित यावे. पालकांनीही जबाबदारीने वागावे तसेच शिक्षकांनी स्वत:चीही काळजी घ्यावी. या लाटेत लहान मुलांची त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कशा पध्दतीने काळजी घेता येईल यासाठी येत्या चार दिवसात प्रोटोकॉल तयार केला जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

बालकांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. त्याचबरोबर बालकांना या लाटेपासून वाचविण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. येणाऱ्या लाटेच्या अनुषंगाने तालुकास्तरावर कमिट्या नेमण्यासाठी पालकमंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी केली तर कोरोनामुळे व्यक्तीमध्ये शारिरीक, मानसिक आणि भावनिक बदल होतात त्याचा विचार करून शिक्षकांनी मुलांचे प्रबोधन करावे. तसेच या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच संबंधित पालकांनी, शिक्षकांनी त्वरित उपचाराला प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले.

तत्पूर्वी सीपीआर रूग्णालयाच्या बालरोग विभागाच्या विभागप्रमुख तथा टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. संगीता कुंभोजकर यांनी  कोरोना आजारपणात बालकांना येणाऱ्या अडीअडचणी, उपचार पध्दती, समुपदेशन पध्दती या संदर्भात सविस्तर विवेचन करून या लाटेचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.

 

 

 

 

 

 

या बैठकीसाठी मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, टास्कफोर्सचे सदस्य सर्वश्री डॉ. व्यंकटेश तरकसबंद, डॉ. सरोदे, डॉ. अनिल कुरणे, डॉ. दशावतार बडे, डॉ. युवराज पाटोळे यांच्यासह ऑनलाईन प्रणालीव्दारे जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, माध्यमिक/प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच पालक उपस्थित होते.

00000

शनिवार, २९ मे, २०२१

आजअखेर 90 हजार 686 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 5499 प्राप्त अहवालापैकी 4457 अहवाल निगेटिव्ह तर 975 अहवाल पॉझिटिव्ह (67 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4365 प्राप्त अहवालापैकी 3835 अहवाल निगेटिव्ह तर 530 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1940 प्राप्त अहवालापैकी 1226  निगेटिव्ह तर 714 पॉझीटिव्ह  असे एकूण 2219 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकुण 40 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 9 हजार 591 पॉझीटिव्हपैकी 90 हजार 686 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 15 हजार 270 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 2219 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-32 भुदरगड-53 , चंदगड-39, गडहिंग्लज-93, गगनबावडा-5, हातकणंगले-374, कागल-60,  करवीर-298, पन्हाळा-139, राधानगरी-37, शाहूवाडी-56, शिरोळ-176, नगरपरिषद क्षेत्र-190, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 546, इतर जिल्हा व राज्यातील-121 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2405, भुदरगड- 3029, चंदगड- 2543, गडहिंग्लज- 4113, गगनबावडा- 479, हातकणंगले-11441, कागल-3556, करवीर-13325, पन्हाळा- 4712, राधानगरी-2242, शाहूवाडी-2757, शिरोळ- 6887, नगरपरिषद क्षेत्र-13574, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 31 हजार 752 असे एकूण  1 लाख 2 हजार 813 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 6 हजार 778 असे मिळून एकूण 1 लाख 9  हजार 591 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 9 हजार 591 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 90 हजार 686 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 635 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 15 हजार 270 इतकी आहे.

0000000

 

कोविड - १९ कर्तव्यात कसूर करणाऱ्या २० लॅबना जिल्हा परिषदेच्या नोटीसा

 


              कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : दिनांक २५ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत ICMR पोर्टलवरील कोविड-१९ RT PRCR चे १८७७ आणि RAT चे ३२२ कोविड रुग्णांच्या नोंदणी अहवालाच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा व राज्यातील इतर २० लॅबनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नोटीसा बजाविल्या आहेत.

                   यामध्ये RAT ( रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट ) - अंतर्गत अनुष्का डायग्नोस्टिक सेंटर (शिरोळ) ,केअर मल्टिस्पेशालिटी (हातकणंगले), निदान पॅथालॉजी (इचलकरंजी) ,जयसिंगपूरच्या अनुक्रमे पायोस हॉस्पिटल , श्री साई लॅब, कोल्हापूरचे शिवतेज लॅब , पार्थ लॅब , देसाई पॅथालॉजी, सृष्टी क्लिनिकल लॅबोरेटरी , मृण्मयी लॅब, हेल्थ व्हयू या ११ लॅबनी तर RT - PRCR अंतर्गंत कृष्णा डायग्नोस्टिक (पुणे) , डॉ . लाल पॅथालॉजी (विमान नगर - पुणे) , मेट्रो पोलीस हेल्थ केअर (मुंबई) , प्रिव्हेंन्टीन लाईफ केअर (नवी मुंबई) , थायरो केअर टेक्नॉलॉजी प्रा .लि. (नवी मुंबई) , इन्फेक्शन लॅबोरेटरीज (ठाणे) ,युडीसी सॅटेलाईट लॅबोरेटरी (नवी मुंबई), सब अर्बन डायग्नोस्टिक पुणे आणि सदाशिव पेठ (पुणे) येथील अपोलो हेल्थ लाईफ स्टाईल या ९ लॅबनी त्यांच्याकडील कोविड रूग्णांच्या चाचण्यांचा अहवाल (IDSP) एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षास वेळेत आणि विहीत नमुन्यात सादर न केल्याने जिल्ह्याच्या कोविड निर्देशांकामध्ये तफावत आल्यामुळे या नोटीसा देण्यात आल्या आहेत .

            आपत्ती कायदयातंर्गत व साथरोग कायदयान्वये या दोषी लॅबवर पुढील कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे .अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली .

पालकमंत्री आज ऑनलाईन संवाद साधणार

 


       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने लहान मुलांना होणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  0 ते 18 वर्षे वयोगटातील  बालकांच्या/विद्यार्थ्यांच्या  शिक्षकांचे व  पालकांचे   https://youtu.be/BY20UBRIHPY  या युट्यूब लिंकद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे आमदार जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व सी.पी.आर. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख आदी मान्यवर रविवार दि. ३० मे रोजी सकाळी १० वा. संवाद साधणार आहेत . या मार्गदर्शन सत्रासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासकीय व खासगी  शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका व बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर नमुद केलेल्या लिंकद्वारे online उपस्थित राहावे असे. आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

शुक्रवार, २८ मे, २०२१

आजअखेर 89 हजार 027 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2854 प्राप्त अहवालापैकी 2377 अहवाल निगेटिव्ह तर 343 अहवाल पॉझिटिव्ह (434 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4054 प्राप्त अहवालापैकी 3442 अहवाल निगेटिव्ह तर 612 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 4440 प्राप्त अहवालापैकी3264 निगेटिव्ह तर 1176 पॉझीटिव्ह  असे एकूण 2131 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकुण 56 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 1 लाख 7 हजार 372 पॉझीटिव्हपैकी 89 हजार 027 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 14750 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 2131 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-41 भुदरगड-85, चंदगड-58, गडहिंग्लज-64, गगनबावडा-35, हातकणंगले-193, कागल-24,  करवीर-399, पन्हाळा-173, राधानगरी-39, शाहूवाडी-20, शिरोळ-120, नगरपरिषद क्षेत्र-153, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 639, इतर जिल्हा व राज्यातील-88 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2373, भुदरगड- 2976, चंदगड- 2504, गडहिंग्लज- 4020, गगनबावडा- 474, हातकणंगले-11067, कागल-3496, करवीर-13027, पन्हाळा- 4573, राधानगरी-2205, शाहूवाडी-2701, शिरोळ- 6711, नगरपरिषद क्षेत्र-13424, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 31 हजार 206 असे एकूण  1 लाख 717 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 6 हजार 655 असे मिळून एकूण 1 लाख 7  हजार 372 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 7 हजार 372 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 89 हजार 027 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 595 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 14750 इतकी आहे.

0000000

 

 


तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ◆1500 बेड वाढविणार ◆

 




कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :   कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे त्याचबरोबर लहान बालकांसाठी राखीव बेड, पुरेसा औषधसाठा आदी वैद्यकीय सेवा-सुविधा वाढवाव्यात अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने  1 हजार 500 बेड वाढवावेत असे आदेश देऊन जिल्ह्यातील म्युकर मायकोसिसच्या रुग्णांकरीता सुमारे 340 इंजेक्शन उपलब्ध झाले असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णांलयात 100 ऐवजी 200, मुरगुड ग्रामीण रुग्णांलयात 25 ऐवजी 50 तर कोडोली ग्रामीण रुग्णांलयात 100 बेड निर्माण करण्यात येणार असून इचलकरंजीतील आयजीएम रुग्णांलयातही बेड वाढविण्यात येणार असून सिटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड मुळे झालेल्या मृत्यूदराचे ऑडीट करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात यावी तसेच ज्या रुग्णांलयानी जास्त बिले घेतली आहेत अशांची तपासणी करण्यात यावी त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी डॅश बोर्ड तयार करण्यात यावा अशी सूचना करुन मे महिन्याअखेर कोरोना आजाराचा ग्राफ (आलेख) खाली येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यासाठी लवकरच ग्रामविकास विभागाच्या वतीने यंत्रसामुग्रीने युक्त अशी कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात येईल त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये यादृष्टीने शासकीय रुग्णालयांतून सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना एक वर्ष मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरु असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कोविड व म्युकर मायकोसिसच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, बेड व्यवस्थापन, लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा, औषध पुरवठा, लसीकरणाची सद्यस्थिती, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील सोयी-सुविधा आदी बाबींचा आढावा घेतला.

तर जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये अधिकाधिक रुग्ण हे ज्येष्ठ अथवा सहव्याधीग्रस्त असल्याचे दिसून येते. कोरोना प्रतिबंधक लस ही जिल्ह्यातील 60 वर्षांवरील नागरिकांना तसेच सहव्याधीग्रस्त नागरिकांना उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल, जेणेकरून मृत्युदर नियंत्रणात येवू शकेल. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लहान बालकांसाठी सीपीआर मध्ये नवीन 15 व्हेंटिलेटरची सोय करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बालकांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत.

तत्पूर्वी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

000000

महाआयुष सर्व्हेच्या नियंत्रण व समन्वयासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 

 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागातील (महानगरपालिका क्षेत्र वगळून) प्रत्येक मतदान केंद्रावर आशा वर्कस, अंगणवाडी सेविका, शिक्षक, लिपीक, शिक्षण सेवक व इतर कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचारी वर्गाकडून प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार यादीनुसार नागरिकाची महा आयुष सर्व्हे ॲपव्दारे आरोग्य विषयक सर्व बाबींची तपासणी व लसीकरणाबाबत माहिती संकलन केली जाणार आहे. महाआयुष सर्व्हे ॲपव्दारे माहितीचे संकलन, त्याचप्रमाणे सर्व्हेक्षणात आवश्यक असणाऱ्या नागरिकांची कोव्हीड-19 तपासणी व संस्थात्मक / गृह अलगीकरण करून औषधोपचार त्वरीत सुरू करण्याबाबतची कार्यवाही या पथकांव्दारे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. नियुक्त कर्मचारी यांच्याशी समन्वय व नियंत्रण ठेवण्याकरिता खालील समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

 

.क्र.

समन्वय अधिकारी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचे नाव,पदनाम व कार्यालयाचे नाव

सहाय्यक कर्मचारी, पदनाम व कार्यालयाचे नाव

नेमून दिलेले तालुका / न.पा.

तालुक्यातील समन्वय अधिकारी /कर्मचारी पदनाम व कार्यालयाचे नाव

सर्वेक्षण व लसीकरणासाठी तालुकस्तरीय संपर्क अधिकारी

 

ग्रामीण क्षेत्र

1.

श्री. सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास प्रकल्प अधिकारी) जिल्हा परिषद कोल्हापूर

सहाय्यक

1. श्री.शंकर टिपुगडे, लिपीक, ए.बा.वि.से.सो.कार्या.जि.प.कोल्हापूर

2. श्री.सुशांत शिरसोडे, लिपीक, ए.बा.वि.से.सो.कार्या.जि.प.कोल्हापूर

 श्रीमती.शिल्पा देसाई, अ.का.कार्या-10 निवडणूक

करवीर

 

 

1. डॉ. जे. डी. नलवडे, तालुका आरोगय अधिकारी, करवीर 9822420765

2. श्री.सुहास बुधवले, CDPO करवीर

3. श्री अमर गवळी, व.सहा. पं.स. करवीर

श्री वैभव नावाडकर, उ. वि.अ. करवीर

8308637322

श्रीमती.माया कुंभार, मह.सहा.कार्या-14 लेखा

गगनबावडा

1. डॉ. विशाल चोकाककर, तालुका आरोग्य अधिकारी, गगनबावडा 9545797979

2. श्रीमती.ए.एशिंदे,सहा.निंबधक, गगनबावडा 7719795445 

3. श्री आर.डी. गवळी, व. सहा. पं. स. गगनबावडा

श्री दिपक घाटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, कोल्हापूर

7977442399

श्रीमती.प्रमिला दाते, मह.सहा.कार्या-19

पन्हाळा

1. डॉ. अनिल कवठेकर, तालुका आरोग्य अधिकारी, पन्हाळा 9922939525

2. श्री.एन.ए.परजणे, सहा.निंबधक,

पन्हाळा ,8600099009

3. श्री  राहूल कांबळे, क. सहा. पं. स. पन्हाळा

श्री अमित माळी,उ. वि. अ. पन्हाळा

9860951642

श्रीमती.सिमा शिंदे, मह.सहा.कार्या-19 पुरवठा

शाहूवाडी

1. डॉ. हिरा निरंकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शाहुवाडी 9423277265

2. श्रीमती.स्नेहल माने, CDPO शाहूवाडी

3. श्री निवास कांबळे, व. सहा. पं.स. शाहूवाडी

श्री अरूण जाधव, उ.मु. कार्य. अधि. ग्रापं

9156859199

श्रीमती.योगिता शिंदे, मह.सहा.कार्या-19 पुरवठा

हातकणंगले

1. डॉ. सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी, हातकणंगले 9422626602

2. डॉ.प्रगती बागल, उप.निंबधक, हातकणंगले,9850641213

3. श्री संतोष कोळी, क. सहा.,

पं. स. हातकणंगले

श्री विकास खरात, उ. वि. अ. इचलकरंजी

8830333748

श्रीमती.वैशाली दिवसे, मह.सहा.कार्या-19 पुरवठा

शिरोळ

1. डॉ. पी. एस. दातार, तालुका आरोग्य अधिकारी, शिरोळ 9823120617

2. श्री.पी आर राठोड, सहा. निबंधक, शिरोळ 8275287479

3.  श्रीमती राजश्री घंटे, व. सहा. पं. स. शिरोळ

श्री किरण लोहार, शि. अ. माध्य. कोल्हापूर

9225805640

2

श्री.अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर

9860610727

 

सहाय्यक कर्मचारी

1.        श्री.शंकर गुरव, अ.का. अलेपप

2.        श्री.सुनिल दळवी, मह.सहा. कार्या-12 ग्रा.प

श्रीमती.स्नेहल जाधव मह.सहा. कार्या-4 गावठाण

राधानगरी

1. डॉ. राजेंद्रकुमार शेटे, तालुका आरोग्य अधिकारी 9881253272

2. श्री हजारे, सहा निबंधक, राधानगरी, 9028095050

3. श्री आनंदा लोकरे, क. सहा. पं. स. राधानगरी

श्री प्रसन्नजीत प्रधान, उ. वि. अ. राधानगरी

8600679965

श्रीमती.वैशाली शिरसाठ, अ.का. कार्या-6 ब ना.ऑ

कागल

1. डॉ. अभिजीत शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी कागल 7038751501

2. श्री ए ए चोपडे, सहा निबंधक कागल 9960723290

3. श्रीमती मनिषा जाधव, क. सहा.

पं. स. कागल

श्री प्रसन्नजीत प्रधान, उ. वि. अ. राधानगरी

8600679965

श्री.माधव इगावे, मह.सहा. कार्या-12 ग्राप

आजरा

1. डॉ. यशवंत सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी आजरा 9422657993

2. श्री एस व्ही पाटील, सहा निबंधक, आजरा 9421214341

3. श्री अजित कांबळे, क. सहा. पं. स. आजरा

श्री सोमनाथ रसाळ, उप. मु, कार्य. अधि. म. व बा. वि. जि. प कोल्हापूर

9175044909

2

श्री.अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर

9860610727

 

सहाय्यक कर्मचारी

1.        श्री.शंकर गुरव, अ.का. अलेपप

2.        श्रीमती. मनिषा नाईक, अ.का कार्या-4 गावठाण

 

श्री.श्रीहरी खिरेकर, मह.सहा. कार्या-6 स्वा.सै

भुदरगड

1.  डॉ. सचिन ऐतनाळकर, तालुका आरोग्य अधिकारी, भुदरगड 8888279259

2. श्रीमती.नयना इंगोले, CDPO भुदरगड

3. श्री सुशांत शिंदे, व. सहा. पं. स. भुदरगड

डॉ. संपत खिलारी, उ. वि. अ. भुदरगड

9011027027

श्री.निलेश पाटील, मह.सहा. कार्या-8

गडहिंग्लज

1. डॉ. अथणी, तालुका आरोग्य अधिकारी, गडहिंग्लज 9421603692

2. श्री व्ही जी जाधव, सहा निबंधक गडहिंग्लज  9881547671

3. श्री महादेव माने, व. सहा. पं.स. गडहिंग्लज

श्रीमती विजय पांगारकर,

उ.वि. अ. गडहिंग्लज

8600015796

श्री.रोहिणी भोसले, मह.सहा.कार्या-12/6

चंदगड

1. डॉ. रमेश खोत, तालुका आरोग्य अधिकारी चंदगड 9421036393

2. श्री.राजेश गजलवाड, CDPO चंदगड

3. श्री कपील बिरंजे, क. सहा. पं. स. चंदगड

श्रीमती विजय पांगारकर,

उ.वि. अ. गडहिंग्लज

8600015796

नगरपालिका क्षेत्र

3

श्रीमती. मैनुनिस्सा संदे, तहसिलदार (संगायो शहर) कोल्हापूर

 

श्री अनंत गुरव, ना. तह. गृह जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

 

सहाय्यक कर्मचारी

 

1.        श्री. महादेव मुत्नाळे, अ.का. कार्या.3 जि. का. कोल्हापूर

2.        श्री.सुनिल दळवी, मह.सहा. कार्या-12 ग्रा.प.

श्री.प्रितम हिंगमिरे, मह.सहा.(संगायो शहर)

पन्हाळा

मलकापूर

श्री.स्वरुप खारगे, मुख्याधिकारी पन्हाळा व मलकापूर 8087340794

 

श्री.गणेश जाधव, महा.सहा (रोहयो)

इचलकंरजी

हुपरी

डॉ.श्री.प्रदीप केंगल, मुख्याधिकारी इचलकरंजी, 9422879557

श्रीमती-स्नेहलता कुंभार, मुख्याधिकारी, हातकणंगले, 8805716871

श्रीमती.अश्विनी किल्लेदार मह.सहा. (यूएलसी)

हातकणंगले

वडगांव

श्रीमती-स्नेहलता कुंभार, मुख्याधिकारी, हातकणंगले, 8805716871

श्री.मनोज देसाई, मुख्याधिकारी वडगांव 8275256999

श्री.पुजा दासरे, मह.सहा. कार्या-11 नपा

जयसिंगपूर

आजरा

श्रीमती-टीना गवळी, मुख्याधिकारी,जयसिंगपूर 9145732834

श्री.विजयकुमार मुळीक कर सहायक, न.पा. आजरा, 7349630112

श्री.गुरुप्रसाद जाधव, मह.सहा. कार्या 11 न.पा

शिरोळ

कुरुंदवाड

श्री.तैमुर मुल्लाणी, मुख्याधिकारी शिरोळ,7276737278

श्री.निखील जाधव, मुख्याधिकारी कुरुंदवाड-8887906950

श्रीमती. सुवर्णा रजपूत मह.सहा.कार्या-19 पुरवठा

कागल

मुरगुड

श्री.पंडीत पाटील,मुख्याधिकारी कागल व मुरगुड 9850704021

 

श्रीमती. नफिसा मुजावर, मह.सहा.कार्या-19 पुरवठा

चंदगड

गडहिंग्लज

श्री.अभिजीत जगताप मुख्याधिकारी चंदगड,9421934354

श्री.नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी गडहिंग्ल्ज, 9130555892

 

त्या अनुषंगाने महाआयुष्‍ सर्व्हेचे संपूर्ण कामकाज प्रभावीपणे पूर्ण करुन घेणे व व्यवस्थापन करणाऱ्यांनी खालीलप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. 

1.      महा आयुष ॲपचे सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना (सर्व्हेक्षणासाठी मतदान केंद्रनिहाय नेमलेले कर्मचारी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य सेवक/ सेविका) प्रशिक्षण देवून 50 वर्षांवरील सर्व नागरीकांचे मतदान केंद्रनिहाय कोव्हीड-19 व लसीकरणाबाबत सर्व्हेक्षण करणे.

2.      कोल्हापूर जिल्हायातील ग्रामीण व नगरपालिका/नगरपरिषद/नगपंचायत ( कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) या क्षेत्रा मधील प्रत्येक मतदान केंद्रानुसार 50 वर्षावरील Co-Morbid व 60 वर्षावरील सर्व नागरिकाचे प्राधान्याने लसीकरणाची प्रक्रिया पुर्ण करुन घेणे.

3.      महाआयुष सर्व्हे मध्ये लक्षणे आढळून आलेल्या सर्व नागरिकाची तात्काळ आरटीपीसीआर/ॲटीजन टेस्ट करुन घेणेबाबत संबंधिताना सूचना देणे व त्याबाबतचा दैंनदिन आढावा घेणे.

4.      महाआयुष सर्व्हे मध्ये लक्षणे आढळून आलेल्या सर्व नागरिकाची तात्काळ आरटीपीसीआर/ॲटीजन टेस्ट केलेनंतर सदर नागरिकाचे तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करणेबाबत संबं‍धिताना सूचना देणे व त्याबाबतचा दैंनदिन आढावा घेणे.

5.      महाआयुष सर्व्हे ॲप मध्ये दैनदिन झालेल्या सर्व्हेचा तालुकानिहाय आढावा घेउुन त्यांचा दैनदिंन अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे.

6.      कोल्हापूर जिल्हयातील 271 ते 280 या विधानसभा मतदारसंघातील ( कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) सर्व मतदान केंद्रावर आशा वर्कस, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य सेवक/ सेविका, शिक्षण सेवक, लिपीक व इतर कर्मचारी यांची केंद्र निहाय नियुक्ती केलेची खात्री करणे..

7.      प्रत्येक मतदान केंद्रावरील नियुक्ती कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक बरोबर असलेचे  व ॲन्ड्राईड मोबाईल असलेची माहिती संकलित करणे. केंद्रनिहाय नेमलेल्या कर्मचाऱ्यांना महा आयुष ॲप डाऊनलोड करणेस सुचना देणे.

8.      सर्व मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचारी यांचे नाव व संपर्क क्रमांक यांची संकलित माहिती महा आयुष ॲप करिता संगणक प्रणालीसाठी श्री.शांताराम सुर्वे, सुर्वे इन्फोटेक प्रा.लि.कोल्हापूर मो.नं.-9371102706 यांना डाटा पुरविणे.

9.      कोल्हापूर जिल्हायातील ग्रामीण व नगरपालिका/नगरपरिषद/नगपंचायत ( कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) या क्षेत्रा मधील प्रत्येक मतदान केंद्रानुसार 50 वर्षावरील सर्व नागरिकाच्या आरोगयाचा सर्व्हे केलेबाबतची दैंनदिन माहिती संकलित करणे व त्याबाबतचा संबंधितांचा आढावा घेणे.

       आदेशाचे उल्लंघन करणारे अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या कामात कसूर केल्यास ते

       आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 महाराष्ट्र

       कोव्हीड उपाययोजना नियम 2020 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील. अशी माहिती

       जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

 

000000