इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

पल्स पोलिओ

 


पल्स पोलिओ


 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लस पाजून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 




 

            कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :- जिल्ह्यात आज 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते बालकांना  पोलिओचा डोस पाजून  करण्यात आला.

        छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात  जिल्हाधिकारी  श्री. देसाई  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन बालकांना पोलिओ लस पाजून लसीकरण मोहिमेस प्रारंभ  करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी - श्री संजयसिंह चव्हाण,  राज्य लसीकरण अधिकारी- डॉक्टर दिलीप पाटील,  जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. अनिल माळी,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. हर्षला वेदक. यांच्या हस्तेही बालकांना  पोलिओचा डोस पाजण्यात आला.

          लसीकरण शुभारंभ प्रसंगी अधिष्ठाता  डॉ.मोरे,  जिल्हा‌ माता बाल संगोपन अधिकारी  डॉ. फारुख देसाई,

 सीपीआर  रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती साळोखे,  परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य  श्रीमती महानंदा मांढरे, व सार्वजनिक आरोग्य परिचारक - मोजस भोसले आदी उपस्थित होते.

00000

आजअखेर 48 हजार 126 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1634 प्राप्त अहवालापैकी 1599 अहवाल निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझिटिव्ह (32 अहवाल नाकारण्यात आला). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 57 प्राप्त अहवालापैकी 57 अहवाल निगेटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 106 प्राप्त अहवालापैकी 94 निगेटिव्ह तर 12 पॉझीटिव्ह  असे एकूण 15 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 931 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 83 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 15 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, चंदगड-1, नगरपरिषद क्षेत्र 1, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 8 व इतर राज्य 3 असा समावेश आहे.

 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-880, भुदरगड- 1232, चंदगड- 1223, गडहिंग्लज- 1497, गगनबावडा- 150, हातकणंगले-5319, कागल-1679, करवीर-5714, पन्हाळा- 1869, राधानगरी-1252, शाहूवाडी-1358, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7498, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 322 असे एकूण  47 हजार 502 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 429 असे मिळून एकूण 49  हजार 931  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 49 हजार 931 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 126 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 722 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 83 इतकी आहे.

0000000

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

आजअखेर 48 हजार 120 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 827 प्राप्त अहवालापैकी 825 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह (1 अहवाल नाकारण्यात आला). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 123 प्राप्त अहवालापैकी 120 अहवाल निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझिटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 107 प्राप्त अहवालापैकी 104 निगेटिव्ह तर 3 पॉझीटिव्ह  असे एकूण 7 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 916 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 74 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 20 पॉझीटिव्ह अहवालापैकी हातकणंगले-1, करवीर-2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 4 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-878, भुदरगड- 1232, चंदगड- 1222, गडहिंग्लज- 1497, गगनबावडा- 150, हातकणंगले-5319, कागल-1679, करवीर-5714, पन्हाळा- 1869, राधानगरी-1252, शाहूवाडी-1358, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7497, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 314 असे एकूण  47 हजार 490 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 426 असे मिळून एकूण 49  हजार 916  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 49 हजार 916 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 120 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 722 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 74 इतकी आहे.

0000000

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

आजअखेर 48 हजार 113 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1152 प्राप्त अहवालापैकी 1121 अहवाल निगेटिव्ह तर 14 अहवाल पॉझिटिव्ह (17 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 82 प्राप्त अहवालापैकी 82 अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 107 प्राप्त अहवालापैकी 101 निगेटिव्ह तर 6 पॉझीटिव्ह  असे एकूण 20 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 909 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 113 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 74 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 20 पॉझीटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज-1, हातकणंगले-1, कागल-2, करवीर-4, नगरपरिषद क्षेत्र-1,  कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 9 व इतर जिल्हा व राज्यातील -2 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-878, भुदरगड- 1232, चंदगड- 1222, गडहिंग्लज- 1497, गगनबावडा- 150, हातकणंगले-5318, कागल-1679, करवीर-5712, पन्हाळा- 1869, राधानगरी-1252, शाहूवाडी-1358, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7497, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 310 असे एकूण  47 हजार 483 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 426 असे मिळून एकूण 49  हजार 909  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 49 हजार 909 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 113 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 722 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 74 इतकी आहे.

0000000

 

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील व्यक्तींनी पक्क्या घरासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : अनुसूचित जाती नवबौध्द प्रवर्गातील ज्या व्यक्तींना अद्यापही स्वत:चे पक्के घर उपलब्ध झाले नाही अशा व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

 ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत संबंधीत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, शहरी भागासाठी संबंधित नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी तसेच महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह तत्काळ अर्ज सादर करावेत.

00000

 

 

 

 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2020 प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 


 

कोल्हापूर दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

0000

कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये सुरू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. साठी कोव्हिड-19 संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह पर्यटक / नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

या ठिकाणी आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या व शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणालींचा अवलंब करणे बंधनकारक राहील तसेच या ठिकाणी आवश्यक शारिरिक अंतर बाळगणे, मास्क वापरणे व वेळोवेळी हात निर्जंतुकीकरण करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

000000

 

 

लॉकडाऊमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.):  जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत दि. 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

       यापूर्वी प्रतिबंधीत/बंद क्षेत्र व सुट/वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी/क्षेत्र पुर्ववत सुरु राहतील.

            आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

00000

 

सोमवारी लोकशाही दिन

 


कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी दिली.

सोमवार 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच शासनाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2012 रोजीच्या शासनपरिपत्रकान्वये तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व , अपिल्स, सेवाविषयक ,आस्थापना विषयक बाबी, अंतिम उत्तर दिलेले आहे , देण्यात येणार आहे. अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकृत करण्यात येणार नाहीत, याची सर्व नोंद घ्यावी, असेही श्री. गलांडे यांनी स्पष्ट केले.

000000

31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2416 केंद्राद्वारे 3 लाख 23 हजारावर बालकांना लसीकरण -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): येत्या 31 जानेवारी रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून 0 ते 5 वयोगटातील 3 लाख 23 हजार 546 बालकांना 2 हजार 416  पोलिओ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून पोलिओची लस पाजण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

देशामध्ये दिनांक  16 जानेवारी  पासून कोव्हिड लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दि. 17 जानेवारी   रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार पल्स पोलिओची मोहीम रविवार दि. 31 जानेवारी  रोजी राबविण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये कोव्हिड -19 विषयक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून यावर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्क व ग्लोव्हज वापर करणे व सॅनिटायझर वापरणे या त्रिसूत्रीनुसार मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये ग्रामीण, शहरी तसेच महानगरपालिका विभागांतर्गत एकुण 2 हजार 416 बुथची निर्मिती करण्यात आलेली असून त्याअंतर्गत एकूण  6 हजार 447 कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्ह्यासाठी एकूण 4 लाख 46  हजार 300 पोलिओ डोस प्राप्त झालेले आहेत.

जिल्ह्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील अंदाजित 3 लाख 23 हजार 546 बालकांना या दिवशी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. अगदी बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी पोलिओ डोस द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारहाट, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बस स्थानके व रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी सुध्दा ट्रान्झीट व मोबाईल  टीमद्वारे पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांचे मार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आपणाकडे येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

00000

 

 

दुधगंगा नदीवरील बाचणी-वडकशिवाले पुलामुळे बाचणी व परिसरातील लोकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 






 

कोल्हापूर दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :- बाचणी-वडकशिवाले येथे दुधगंगा नदीवर होणाऱ्या नवीन पुलामुळे बाचणीसह या परिसरातील जनतेला दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बाचणी व परिसरातील गावांना विकास कामांसाठी आवश्यक निधी शासनस्तरावरुन उपलब्ध केला जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी  केले.

सार्वजनिक बांधकाम  विभागामार्फत  दुधगंगा नदीवर बाचणी-वडकशिवाले  येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य, मनोज फराकटे, कागल पंचायत समितच्या उपसभापती अंजना सुतार, बाचणीचे सरपंच इक्कबाल नायकवडी, उपसरपंच जे.डी. पाटील, माजी सरपंच  एम.एस. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता एस.डी. सोनवणे यांच्यासह बाचणी व वडकशिवाले  आणि  परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पावसाळ्यात दुधगंगा नदीला येणाऱ्या पुरामुळे या भागातील लोकांना कागलमार्गे कोल्हापूरला जावे लागत होते. यासाठी बाचणी-वडकशिवाले येथे दुधगंगा नदीवर पूल व्हावा अशी मागणी या परिसरातील जनतेची होती.  या पुलाचे काम सुरु झाल्याने परिसरातील जनतेची मागणी पूर्ण होत आहे.  या पुलामुळे  मागील बाजूच्या गावांना पुराचा कोणताही धोका उद्भवणार नाही. यासाठी  तज्ज्ञांची मते घेतली असून तज्ज्ञांच्या मागदर्शनानुसार पुलाचे काम होणार आहे, असेही  ग्रामविकास मंत्री यावेळी म्हणाले.

पुलासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला असून पुलाचे काम दर्जेदार,गुणवत्तापूर्ण आणि मुदतीत पूर्ण करुन दळणवळणासाठी पूल लवकरात लकवर खुला होईल, असे कामाचे नियोजन करावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            कोरोना संकटामुळे राज्याच्या महसुलात घट झाली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचे राज्य शासनाने ठरवून कर्जमाफी जाहीर  केली. त्याचा  लाभ शेतकऱ्यांचा दिला.  लवकरच 2 लाखावरील  कर्ज आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले. ग्रामविकास विभागामार्फत  पाणंद रस्त्यांची कामे घेण्यात येत असून राज्यात नवनवीन योजना आणुन गावाचा विकास करण्यावर भर असल्याचे ते म्हणाले.  बाचणी येथील रिंगरोड, नवीन पाणी योजना, गावातील अंतर्गत गटारे, नदी घाट या कामांचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

            आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे ग्रामविकास खात्याचे कर्णधार  आहेत. ग्रामविकास विभागामार्फत विकासाचे अनेक निर्णय घेतले जात आहेत.  या परिसरातील विकास कामांना शासनस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.

            कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे यांनी पूल उभारणीबाबतची माहिती दिली. पुलाच्या बांधकाम व जोड रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असून पुलाचे काम दर्जेदार करण्यात येईल, असे ते म्हणाले.

             एम.एस. पाटील यांनी  नदी घाट, स्मशान भूमी आणि  गावातील विकास कामांना निधी मिळावा, अशी मागणी यावेळी केली.

            प्रारंभी सरपंच इक्कबाल नायकवडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  पिटर डिसोझा यांनी आभार मानले.

000000

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

गॅस कंपन्यांनी गॅस वितरण वाहनावर दैनंदिन दर फलक लावावेत -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : गॅस कंपन्यांनी सर्व गॅस सिंलेडर वितरण वाहनांवर दैनंदिन दर फलक लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

दि. 27 जानेवारी रोजी झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील ग्राहक संरक्षण बैठकीमध्ये प्राप्त झालेल्या 17 तक्रार अर्जाबाबत चर्चा करुन निपटारा करण्यात आला. पोलीस विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, सहाय नियंत्रण वैधमापन शास्त्र, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ या विभागांबाबतच्या अर्जाबाबत चर्चा करुन निराकरण करण्यात आले.

बैठकीत नवीन 10 अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांबाबतचे निराकरण पुढील बैठकीत केले जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य अरुण यादव यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी लाभार्थी संस्था/ वैयक्तिक लाभार्थी यांनी आपले प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या पशुधन अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्यामार्फत दि. 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

गायरान जमिनीचा विकास करून त्यामधील गवताची गुणवत्ता व उत्पादकता वाढवून राज्यातील गाई-म्हशीतील उत्पादकता वाढविणे. वनक्षेत्र नसलेल्या नापिक/गायरान/गवती कुरणाचे क्षेत्र व पडीक जमिनीतून वैरण उत्पादन करणे. जमिनीची धूप थांबविणे व वैरणीचे उत्पादन करणे. उत्पादित वैरण पशुधन पोषणासाठी वापरून आहारातील वैरणीची तुट कमी करणे. वैयक्तिक शेतकऱ्याकडील वैरण उत्पादकता वाढविणे तसेच अतिरिक्त उत्पादित वैरण चारा संचयनीसाठी उपयोगात आणणे ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

या योजनेसाठी केंद्र हिस्सा 60 व राज्य हिस्सा 40 टक्के जमिनीच्या प्रकारानुसार प्रति हेक्टरसाठी अनुदान अनुज्ञेय आहे. गोचर/पडीक जमिनीला मशागतीची आवश्यकता आहे अशा सामाईक वरकस जमिनीसाठी 1 लाख रूपये.गोचर पडीक जमिनीला मशागतीची आवश्यकता नाही अशा सामाईक वरकस जमिनीसाठी 0.85 लाख रूपये. शासकीय जमीन, गोशाळा, पांजरपोळ यांच्याकडील जमीन 0.65 लाख रूपये. वनक्षेत्र राखीव व चाराऊ क्षेत्र यांच्याकडील जमीन 0.50 लाख रूपये व वैयक्तिक शेतकरी- (बहुवार्षिक चारा पिके घेण्याकरिता) पशुधनाचा सांभाळ करणाऱ्या संस्थेस 1 युनिटसाठी 205 हेक्टर व वैयक्तिक लाभार्थीस 1 युनिटसाठी 1 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या संस्थेस /लाभार्थीस राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

लाभार्थी संस्था/वैयक्तिक लाभार्थीकडे नापिक/गायरान/गवती कुरण क्षेत्र पडिक स्वत:च्या मालकी हक्काची (7/12 चा उतारा) जमीन असावी. लाभार्थी संस्थेकडे कमीत-कमी 50 व वैयक्तिक शेतकऱ्याकडे 5 ते 10 पर्यंत पशुधन असावे. लाभार्थी संस्था गोशाळा, पांजरपोळ संस्था असेल तर त्यांची धर्मादाय विभागाकडे नोंदणी झालेली असावी. वैयक्तिक शेतकऱ्याने 3 वर्षापर्यंत वैरणीचे पीक घेण्याकरिता पशुसंवर्धन विभागाकडे करारनामा करून देणे बंधनकारक आहे.

संस्थांनी विहित नमुन्यामधील प्रस्ताव इंग्रजीत सादर करावेत. जमिनीचा 7/12 उतारा व 8-अ चा दाखला, संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, संस्थेचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचा ठराव संचालक मंडळाची यादी, घटनेतील उद्देशाची प्रत, मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल व संस्थेकडे असलेल्या पशुधनाबाबतचे प.वि.अ. यांचे प्रमाणपत्र सादर करावे.

लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, जमिनीचा 7/12 चा उतारा व 8-अ चा दाखला व लाभार्थींकडे पशुान असल्याबाबतचे नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील प.वि.अ. यांचे प्रमाणपत्र सादर करावे.

अधिक माहितीसाठी अर्जाचा नमुना kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

000000

पल्स पोलीओ लसीकरण मोहीम रविवारी

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम रविवार दि. 31 जानेवारी रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

000000

आंतरराष्ट्रीय चालक परवाना नियमात बदल

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): केंद्र शासनाने 7 जानेवारी 2021 च्या अधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 14 (2) नियम 32 व नमुना 4 ए मध्ये सुधारणा केली आहे. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय चालक परवाना जारी करण्याकरिता अर्जाचा नमुना, शुल्क रचना व नियमात बदल करण्यात आला असून ही सुधारणा दि. 15 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

भारतीय नागरिक विदेशामध्ये असताना त्यांचा आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना मुदतबाह्य झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना भारतीय दुतावासामार्फत नुतनीकरण करण्यासाठी अर्ज करता येईल त्यासाठी त्यांना 2 हजार रूपये इतके शुल्क आकारले जाईल.

000000

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहण

 



     कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी  रामहरी भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास प्रशासकीय इमातीमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 



     कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्मते ध्वजारोहण करण्यात आले.

                   ध्वजारोहणाच्या समारंभास अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000