इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २३ जुलै, २०२२

5 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग

 


 

          कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 177.04 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी असे 5 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 177.04 दलघमी, तुळशी 73.50 दलघमी, वारणा 745.42 दलघमी, दूधगंगा 468.42 दलघमी, कासारी 54.92 दलघमी, कडवी 59.38 दलघमी, कुंभी 53.34 दलघमी, पाटगाव 75.31 दलघमी, चिकोत्रा 33.36 दलघमी, चित्री 46.26 दलघमी, जंगमहट्टी 33.61 दलघमी, घटप्रभा 42.02 दलघमी, जांबरे 23.23,आंबेआहोळ 30.98 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.10 फूट, सुर्वे 17.6 फूट, रुई 45.6 फूट, इचलकरंजी 43 फूट, तेरवाड 39 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 29.7 फूट, राजापूर 17.8 फूट तर नजीकच्या सांगली  9.0 फूट व अंकली 11.6 फूट अशी आहे.

00000

गगनबावडा येथे 11 मिमी पाऊस

 


            कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 11 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 0.3 मिमी, शिरोळ -1.2 मिमी, पन्हाळा- 0.5 मिमी, शाहूवाडी- 5.7 मिमी, राधानगरी- 3.5 मिमी, गगनबावडा- 11 मिमी, करवीर- 0.5 मिमी, कागल- 1.2 मिमी, गडहिंग्लज- 0.3 मिमी, भुदरगड- 4.6 मिमी, आजरा-0.8 मिमी, चंदगड- 1.3 मिमी, असा एकूण 1.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

गगनबावडा येथे काल 15.4 मिमी पाऊस

 

 

            कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 15.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 0.0 मिमी, शिरोळ -0.0 मिमी, पन्हाळा- 1 मिमी, शाहूवाडी- 4.3 मिमी, राधानगरी- 2.5 मिमी, गगनबावडा- 15.4 मिमी, करवीर- 1.2 मिमी, कागल- 0.4 मिमी, गडहिंग्लज- 0.8 मिमी, भुदरगड- 4.4 मिमी, आजरा-1.7 मिमी, चंदगड- 2.6 मिमी, असा एकूण 1.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

8 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग

 


 

          कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 177.17 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली असे 8 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 177.17 दलघमी, तुळशी 73.05 दलघमी, वारणा 745.42 दलघमी, दूधगंगा 466.75 दलघमी, कासारी 55.37 दलघमी, कडवी 59.38 दलघमी, कुंभी 53.34 दलघमी, पाटगाव 74.60 दलघमी, चिकोत्रा 33.04 दलघमी, चित्री 45.99 दलघमी, जंगमहट्टी 33.61 दलघमी, घटप्रभा 43.33 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18.7 फूट, सुर्वे 19 फूट, रुई 47.6 फूट, इचलकरंजी 46 फूट, तेरवाड 42.3 फूट, शिरोळ 34 फूट, नृसिंहवाडी 31.6 फूट, राजापूर 20.9 फूट तर नजीकच्या सांगली  9.9 फूट व अंकली 12.7 फूट अशी आहे.

00000

बुधवार, २० जुलै, २०२२

10 वी व 12 वी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात इलेक्ट्रानिक वस्तू वापरास बंदी

 

 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी प्र.अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात दि.21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 9 वाजल्यापासून ते सायं. 18.30 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. बंदी आदेश परीक्षेचे कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू नसतील.

00000

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेवून पशुपालकांनी आर्थिक उन्नती साधावी -संजयसिंह चव्हाण शेळी गट वाटप योजनेसाठी 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

 

 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अनुदानावर विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेवून पशुपालकांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

            जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषद सेसफंडामधून 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 2 शेळ्यांचे युनिट विधवा / परितक्त्या / दारिद्रय रेषेखालील महिला व निराधार महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी र.रु. 12 हजार 400 एवढी अनुदान मर्यादा निश्चित केलेली आहे.

जिल्हा परिषद सेसफंडामधून अनुदानावर कडबाकुट्टी मशिनचा पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी विहित मापदंडाच्या कडबाकुट्टी मशीन खुल्या बाजारातून खरेदी केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने 50 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असून लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येणार आहेत. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे.

00000

सोमवार, १८ जुलै, २०२२

माजी सैनिक, पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत

 

 

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप अर्ज सादर केला नसेल अशा माजी सैनिक/दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नी/माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना संपूर्ण/उर्वरित कालावधीकरीता शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता माजी सैनिक/दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नी यांनी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणासह उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात शिकत आहेत अशा तसेच सन 2018-19, 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात नमुद निकषानुसार उत्तीर्ण होऊन पुढील वर्षात शिकत आहेत अशांनी अर्ज सादर करावेत.  

30 सप्टेंबरपर्यंत प्राप्त अर्जांची छाननी प्राधान्याने करण्याचे नियोजित असून नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी मार्च 2023 मध्ये केली जाईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक  0231-2665812 वर संपर्क साधावा, असेही श्री. खेडेकर यांनी कळविले आहे.

000000

लेखापरिक्षित वार्षिक हिशेबपत्रके 25 जुलै पर्यंत ऑनलाईन दाखल करा - धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर

 

 

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : ज्या सार्वजनिक न्यासांनी अद्यापपर्यंत मागील प्रलंबित व दि. 31 मार्च 2021 पर्यंतच्या त्यांच्या अद्यावत वार्षिक हिशोबपत्रकांचे लेखापरीक्षण केलेले नाही, त्यांनी ते तात्काळ करुन घ्यावे व लेखापरिक्षित वार्षिक हिशेबपत्रके कोणत्याही परिस्थितीत दि. 25 जुलै पर्यंत संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन दाखल करावेत, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 32, 33 व 34 अन्वये अनेक नोंदणीकृत न्यासांची, त्यांच्या वार्षिक हिशोबपत्रकांचे अद्याप लेखापरिक्षण करुन घेऊन, संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केलेली नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर असून ती महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 66 व 67 अन्वये दंडनीय आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 मधील तरतुदीनुसार संस्थांनी वार्षिक हिशोब सादर न करणे हा दंडणीय अपराध असून नोंदणीकृत न्यासांनी तात्काळ वार्षिक हिशेबपत्रकांचे लेखापरीक्षण करुन ते धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करावेत.

                                                                           000000

गुरुवार, १४ जुलै, २०२२

58 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 

 

          कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 144.56 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव व तारळे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव, तारेवाडी व अडकूर, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व सुळंबी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील-  सुळे, पणुंद्रे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी असे 58 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 144.56 दलघमी, तुळशी 58.98 दलघमी, वारणा 609.98 दलघमी, दूधगंगा 368.73 दलघमी, कासारी 55.82 दलघमी, कडवी 46.82 दलघमी, कुंभी 46.32 दलघमी, पाटगाव 62.52 दलघमी, चिकोत्रा 26.70 दलघमी, चित्री 30.37 दलघमी, जंगमहट्टी 22.48 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 28.08 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 36.10 फूट, सुर्वे 35.1 फूट, रुई 65 फूट, इचलकरंजी 60.6 फूट, तेरवाड 55.3 फूट, शिरोळ 47.9 फूट, नृसिंहवाडी 47.6 फूट, राजापूर 35.9 फूट तर नजीकच्या सांगली 19.3 फूट व अंकली 24.2 फूट अशी आहे.

0000

 

गगनबावडा येथे काल 77.7 मिमी पाऊस

 


        कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 14.6 मिमी, शिरोळ -8.8 मिमी, पन्हाळा- 43.4 मिमी, शाहूवाडी- 48.4 मिमी, राधानगरी- 51.1 मिमी, गगनबावडा-77.7 मिमी, करवीर- 30.2 मिमी, कागल- 26.3 मिमी, गडहिंग्लज- 18.9 मिमी, भुदरगड- 48.3 मिमी, आजरा-39  मिमी, चंदगड- 72.7  मिमी, असा एकूण 35.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

 

बुधवार, १३ जुलै, २०२२

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

 


 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी  https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

            विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अद्यापही ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात-लवकर ऑनलाईन प्रणालीतुन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत.

00000

चंदगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश नोंदणी सुरु

 


कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदगड येथील वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती/जमाती, अनाथ, अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश नोंदणी सुरु असून वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसाईक पदवी, डिप्लोमा या प्रथम वर्गाकरिता ऑनलाईन नोंदणी www.apalesarkar.gov.in या संकेतस्थळावर व ऑफलाईन अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदगड येथे जमा करावेत, असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.

00000

सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा -सहायक आयुक्त संजय माळी

 


कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या महास्वंयम पोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ज्या उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्डला आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्डमध्ये आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर याची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे.

            माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून युजर आयडी पासवर्ड वापरुन Login व्हावे आधार नंबर या ठिकाणी आधार नंबर नमूद करुन कॅप्च्या (Captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून माहिती अद्यावत होईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा

00000000

गगनबावडा येथे काल 86.3 मिमी पाऊस

 


        कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 86.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 10.3 मिमी, शिरोळ -5.7 मिमी, पन्हाळा- 29.4 मिमी, शाहूवाडी- 33.9 मिमी, राधानगरी- 65.7 मिमी, गगनबावडा-86.3 मिमी, करवीर- 23.9 मिमी, कागल- 29.8 मिमी, गडहिंग्लज- 17.8 मिमी, भुदरगड- 51.5 मिमी, आजरा-36.5  मिमी, चंदगड- 52.5  मिमी, असा एकूण 31.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

मंगळवार, १२ जुलै, २०२२

15 ते 18 जुलै या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 



कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जागतिक युवा कौशल्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त खासगी आस्थापनांच्या रिक्त पदांसाठी दिनांक 15 ते 18 जुलै या कालावधीत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्या’चे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.

          हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपला युझर आयडी व पासवर्डच्या आधारे जिल्हा कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

             इच्छुक युवक- युवतींनी दि. 18 जुलै पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांकावर 0231-2545677 संपर्क साधावा.

000000

थेट अभिकर्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्ता पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासह 23 जुलैपूर्वी कोल्हापूर डाकघर येथे आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजाच्या सत्यप्रतीसह उपस्थित रहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षकांनी केले आहे.

टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्त्यांसाठी उमेदवारांचे वय  कमीत-कमी 18 वर्षे व जास्तीत-जास्त 50 वर्षे असावे. मान्यताप्राप्त केंद्रीय/राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थांमधून 10 वी उत्तीर्ण, आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन कुशलता असणे आवश्यक, बेरोजगार/स्वयं रोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार / कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहाय्यता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा अभिकर्तासाठी आवेदन करू शकतात.

जो उमेदवार थेट अभिकर्तासाठी निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. थेट मुलाखतीव्दारे टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमाचे उमेदवार नियुक्त केले जातील. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर रहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल.

नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरिता आणि परवाना परीक्षेसाठी वेळोवळी निर्धारित केलेली रक्कम, फी. फी म्हणून जमा करावे लागतील. निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रू. 5 हजार टपाल बचत बँक खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्र /‍ किसान विकास पत्रमध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील.

00000

सद्यस्थितीत वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 12(जिमाका):  गेले दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

सद्यस्थितीत भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  जिल्ह्यातील धबधबे व अन्य वर्षा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील बऱ्याच संघटना पन्हाळा ते पावनखिंड -विशाळगड अशा मार्गावर जंगल सफर आणि ट्रेकिंगच्या मोहिमा आयोजित करत आहेत. अशा स्वरुपाच्या मोहिमा, ट्रेकिंग मध्ये सहभाग घेत असताना अतिवृष्टीमुळे या मार्गावर भूस्खलन, दरड कोसळणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात.

यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की अतिवृष्टी कालावधीत अशा स्वरूपाच्या मोहिमा आयोजित करू नयेत. जिल्ह्यातील नागरिकांनीही अशा स्वरूपाच्या मोहिमांमध्ये सद्यस्थितीत सहभाग नोंदवू नये.

000000000

45 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 130.24 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची व मांगले सावर्डे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील-  सुळे असे 45 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 130.24 दलघमी, तुळशी 52.90 दलघमी, वारणा 534.12 दलघमी, दूधगंगा 329.60 दलघमी, कासारी 51.98 दलघमी, कडवी 41.15 दलघमी, कुंभी 43.56 दलघमी, पाटगाव 57.75 दलघमी, चिकोत्रा 23.65 दलघमी, चित्री 25.91 दलघमी, जंगमहट्टी 19.66 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 23.72 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 33.07 फूट, सुर्वे 32 फूट, रुई 61.09 फूट, इचलकरंजी 58 फूट, तेरवाड 52 फूट, शिरोळ 44 फूट, नृसिंहवाडी 42 फूट, राजापूर 31.09 फूट तर नजीकच्या सांगली 17.06 फूट व अंकली 21.09 फूट अशी आहे.

0000

गगनबावडा येथे काल 111.9 मिमी पाऊस

 

 

            कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 111.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 15.1 मिमी, शिरोळ -8.7 मिमी, पन्हाळा- 38.2 मिमी, शाहूवाडी- 81.9 मिमी, राधानगरी- 63.4 मिमी, गगनबावडा-111.9 मिमी, करवीर- 33.5 मिमी, कागल- 33.2 मिमी, गडहिंग्लज- 18.4 मिमी, भुदरगड- 48.5 मिमी, आजरा-43  मिमी, चंदगड- 72.9  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

                             

 

सोमवार, ११ जुलै, २०२२

4 PM 42 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग

 


 

          कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 127.14 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव व खोची, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे असे 42 बंधारे पाण्याखाली आहेत.

00000

 

 

 

39 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग

 


 

          कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 124.72 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव व खोची, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड व ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड असे 39 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 50.37 दलघमी, वारणा 498.44 दलघमी, दूधगंगा 311.80 दलघमी, कासारी 47.84 दलघमी, कडवी 37.85 दलघमी, कुंभी 42.40 दलघमी, पाटगाव 55.91 दलघमी, चिकोत्रा 22.93 दलघमी, चित्री 23.99 दलघमी, जंगमहट्टी 18.50 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 22.25, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.08 फूट, सुर्वे 31.07 फूट, रुई 61.06 फूट, इचलकरंजी 58 फूट, तेरवाड 51.06 फूट, शिरोळ 42 फूट, नृसिंहवाडी 40 फूट, राजापूर 29.03 फूट तर नजीकच्या सांगली 12 फूट व अंकली 17.05 फूट अशी आहे.

00000

गगनबावडा येथे काल 82.2 मिमी पाऊस

 


 

            कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 82.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 4.2 मिमी, शिरोळ -1.4 मिमी, पन्हाळा- 18.5 मिमी, शाहूवाडी- 46.8 मिमी, राधानगरी- 54.8 मिमी, गगनबावडा-82.2 मिमी, करवीर- 20.8 मिमी, कागल- 17 मिमी, गडहिंग्लज- 11.8 मिमी, भुदरगड- 41.1 मिमी, आजरा-30.1  मिमी, चंदगड- 52.6  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

                             

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

सेवा रुग्णालय येथे श्रवणदोष तपासणी सेवा उपलब्ध

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे कार्यान्वित झाला आहे.

यासाठी डॉ. जयंत वाटवे, डॉ. दिलिप वाडकर (कान, नाक, घसा तज्ञ) ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक असिस्टंट व हिअरिंग इन्स्ट्रक्टर आदी मनुष्यबळ उपलब्ध झाले आहेत. तसेच श्रवणदोष तपासणीच्या ऑडिओमीटर, इम्पेडिन्स ऑडिओमीटर, ओ.ए.ई., बेरा (नवजात शिशुंची श्रवण तपासणी यंत्र) आदी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झालेल्या आहेत. वरील सुविधा राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत उपलब्ध आहेत. तरी याचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.

00000

गवताच्या विक्रीकरिता दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमिनीतील गवताची सन 2022 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी करुन दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह दि. 10 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. अधिकúü माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक  0231-2666185 वर संपर्क साधावा.

0000000

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज सादर करण्यास 31 जुलै अखेर मुदतवाढ

 

 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्य शासनाच्या वतीने महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र ज्यांनी अद्याप आपले अर्ज पोर्टलवर सादर केलेले नाहीत. अशा दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नव्याने अर्ज सादर करण्यासाठी दि. 31 जुलै अखेर मुदतवाढ देण्यात आली असून जास्तीत- जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

ज्या महाविद्यालयातून दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या स्तरावरुन अवगत करुन याबाबत जनजागृती करण्यात यावी. तसेच या शिष्यवृत्ती योजनेपासून दिव्यांग विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी, असेही श्री. घाटे यांनी कळविले आहे.

000000

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह पांचगाव येथे मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, पाचगांव, कोल्हापूर येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये इ. 8 वी पासून पुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणा-या विद्यार्थी (अनुसूचित जाती/अनसुचित जमाती / विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या मागास विशेष मागास प्रवर्ग/अपंग/अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कार्यालयीन वेळेत मोफत प्रवेश अर्ज वाटप सुरू आहे, अशी माहिती वसतिगृहाचे अधीक्षक विवेक चेचर यांनी दिली.

प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, जेवण, राहण्याची सोय असून सुसज्ज ग्रंथालय, सभागृह संगणक कक्ष, मनोरंजन कक्ष, जिम व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, गणवेश भत्ता, सहलभत्ता, स्टेशनरी भत्ता इत्यादी सोयीसुविधा देण्यात येतात.

            प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, पाचगांव येथे अधीक्षक शंकर चेचर, भ्रमणध्वनी -९०४९२१२००४ दूरध्वनी क्र.  ०२३१-२६३८७७९ व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा.  

 

000000

 

बकरी ईद निमित्त पशुधवगृहामध्ये वाहतूक प्रमाणपत्र व कत्तलपूर्व तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : रविवार दि. 10 जुलै रोजी बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल/कुर्बानी देण्यात येते. बकरी ईद निमित्त प्रशासनाने दि. 9 ते 13 जुलै  अखेर पोलिस तपासणी नाके व पशुधवगृहामध्ये अनुक्रमे वाहतूक प्रमाणपत्र व कत्तलपूर्व तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके तसेच संनियंत्रण अधिकारी यांच्या नेमणुका केल्या आहेत. यासाठी काही अडचण उद्भवल्यास किंवा अतिरिक्त पशुवैद्यकीय सक्षम प्राधिकाऱ्यांची आवश्यकता असल्यास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले.

राज्यात दि. 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा 1995 लागू करण्यात आला असून, या सुधारीत अधिनियमान्वये व बैलांची कत्तल करण्यास मनाई आहे. स्थानिक प्रशासनास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने गरजेप्रमाणे शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये तात्पुरत्या स्वरुपामध्ये बकरी ईदसाठी कत्तलखान्याची उभारणी करण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडे संपर्क साधावा. कत्तलखान्यामध्ये केवळ महिषवर्गीय जनावरांची सखोल तपासणी करून नंतरच कत्तलयोग्य प्रमाणपत्रे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिली जातील. तसेच पोलीस तपासणी नाक्यावर नियमानुसार महिषवर्गीय जनावरे वाहतुकीस योग्य असल्याबाबत प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जनावरांची वाहतूक करीत असताना त्यासोबत जनावरांची वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम क्र. ९६ प्रमाणे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ अन्वये वाहतूक होणाऱ्या जनावरांची वाहतुकीपूर्वी स्वास्थ्य तपासणी करून अहवाल देण्यासाठी संनियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अधिनस्त परिवहन निरीक्षकामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ. पठाण यांनी कळविले आहे.

0000000

 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिसूचनेत बदल हरकती सूचना 3 ऑगस्ट पर्यंत सादर कराव्यात

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे) या अधिसूचनेची मुदत 8 मार्च रोजी संपली आहे. या अधिसूचनेस महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे) नियम २०२२ असा बदल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी  कळविले आहे

            हा मसूदा महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दि. 5 जुलै 2022 मध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे. अधिसूचना बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली असून अधिसुचनेमध्ये नमुद मसूदा 4 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे.

            या अधिसुचनेच्या मसुद्या संबंधात कोणत्याही व्यक्तीच्या प्राप्त होणा-या हरकती किंवा सूचना अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई 400 032 यांच्याकडे दि.3 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असे आवाहन तहसिलदार (महसुल)  सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.

00000

 

27 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

 

 

          कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 100 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 44.98 दलघमी, वारणा 414.18 दलघमी, दूधगंगा 255.21 दलघमी, कासारी 40.18 दलघमी, कडवी 29.86 दलघमी, कुंभी 38.95 दलघमी, पाटगाव 48.09 दलघमी, चिकोत्रा 20.50 दलघमी, चित्री 20.38 दलघमी, जंगमहट्टी 18.27 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 20.85, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 31.8 फूट, सुर्वे 30.2 फूट, रुई 60.6 फूट, इचलकरंजी 56.6 फूट, तेरवाड 49.9 फूट, शिरोळ 39 फूट, नृसिंहवाडी 35.3 फूट, राजापूर 25.4 फूट तर नजीकच्या सांगली 8.3 फूट व अंकली 12.7  फूट अशी आहे.

00000