इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

पुरामुळे नुकसान होवू नये यासाठी ...आता कठोर निर्णयाची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 






मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री

 कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अन्य जिल्ह्यात पुराचे संकट

 राज्यात कोरोना, पूरस्थिती व पूरानंतर येणारी रोगराई हे तिहेरी संकट

पूरपरिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी ठाम पावले उचलणे गरजेचे

 ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन नुसार कडक अंमलबजावणी

शहरातील नदी, नाले, ओढ्यातील अतिक्रमणग्रस्त बांधकामे काढावी लागतील

महामार्गावर पाणी येणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे आवश्यक

रस्ते खचणे, दरड कोसळणाऱ्या गावांचे मोठ्या प्रमाणावर पुर्नवसन करावे लागेल

‘हे संकट पुन्हा येवू नये, पाऊस झाला तरी नागरिकांचे नुकसान होवू नये,’  

      -अंबाबाईच्या चरणी प्रार्थना

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर राज्य शासनाचा भर राहील, असे सांगून भविष्यात पूरपरिस्थितीत नागरिकांचे नुकसान होवू नये, यासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, शिरोळ, शाहूपुरी, पंचगंगा हॉस्पिटल, शिवाजी पूल आदी ठिकाणच्या पूरबाधित भागाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाहणी केली. यानंतर पूर परिस्थितीबाबत सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.

बैठकीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन मंडळाचे  कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, खासदार सर्वश्री संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, जयंत आसगावकर, प्रकाश आबीटकर यांच्यासह माजी आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, राज्यात कोल्हापूर, सांगलीसह अन्य काही जिल्ह्यांवर अतिवृष्टिमुळे पुराचे संकट ओढावले. नदी, नाले, ओढ्यांवर नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ही स्थिती उद्भवते आहे. यापुढे रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देवू नये, या भागात झालेली अतिक्रमणे काढावीत, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या. पुरामुळे झालेली हानी मी पाहतो आहे, मात्र तुम्ही कोल्हापूरकर भोगताय. यातून नक्कीच मार्ग काढण्यात येईल. स्थलांतर करून प्रशासनाने लाखो नागरिकांचे प्राण वाचविल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद. कोविड, पूर व पुराच्या अनुषंगाने झालेले नुकसान व पुरामुळे रोगराई रोखण्याचे राज्यापुढील प्रमुख आव्हान असून राज्य सरकार याचा धैर्याने मुकाबला करेल. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना आधार देण्याचं काम राज्य शासनाने केले आहे. पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेवून राज्य शासन पूरग्रस्तांना भरीव मदत करेल, यासाठी केंद्राकडेही आर्थिक मदत मागितली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील पशुधन जगविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या चार साखर कारखान्यांच्या कामाचे कौतुक करुन उर्वरित साखर कारखान्यांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर पुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उड्डाणपुलांचे नियोजन करावे लागेल. खरडून गेलेल्या शेतीचे व पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत, याकामी आवश्यक त्या ठिकाणी पंचनाम्यांसाठी ड्रोनचा वापर करावा. कोल्हापूर शहर सुधारणेच्या दृष्टीने महानगरपालिकेला आवश्यक निधी राज्य शासन देईल, मात्र त्याचा विनियोग योग्य पध्दतीने व्हावा, अशी सूचना त्यांनी केली. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने यावे. या भीषण पूरपरिस्थितीत केंद्राने राज्याला मदत करावी. आपत्तीत झालेल्या नुकसानासाठी  केंद्राकडे ज्यादा मदत मागण्यास सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पूरपरिस्थितीत मानवतेच्या भावनेतून कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे श्री. मुश्रीफ यांनी आभार मानले.

 ‘मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित शहर व ग्रामीण भागाची पाहणी करण्यासाठी वेळ दिला, याबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने आभार ! अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आभार मानले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तर महापालिका आयुक्त डॉ. बलकवडे यांनी शहरातील नुकसानीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

000000

 


पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

 








कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूर बाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूर बाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

पूरबाधित भाग पाहणी प्रसंगी पंचगंगा हॉस्पीटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

0000000

 

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

 







कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): नागरिकांनो !घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाहूपूरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित राहिवांशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते .

       आपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिल्याचे सांगून, २००५ व २०१९ पेक्षाही २०२१ साली आलेला पूर भयंकर असून शासनाने आम्हाला भरीव मदत करावी अशी अपेक्षा तेथील नागरिकांनी व्यक्त केली .

   याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , खा . संजय मंडलिक , खा . धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, आ. ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते .

0000000

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 






 

- नृसिंहवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

- पद्माराजे हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राची केली पाहणी

कोल्हापूर, दि 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावर, मनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,  माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

नृसिंहवाडी तिर्थ क्षेत्र येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन बाधित नागरिकांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी सन 2019 चा पूर , सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

000000

गगनबावडा येथे 25.8 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 12 च्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.8 मिमी, शिरोळ- 0.7 मिमी, पन्हाळा- 10.4 मिमी, शाहूवाडी- 13.6, राधानगरी -11.9, गगनबावडा- 25.8 मिमी, करवीर- 5 मिमी, कागल- 3.2 मिमी, गडहिंग्लज- 1.2 मिमी, भुदरगड- 11.9 मिमी,  आजरा-7.4 मिमी    चंदगड- 10.9  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन

 








 

        कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.

            यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव,  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया उपस्थित होते.  

            कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोल्हापूर येथे आले आहेत. या दौऱ्यामध्ये ते शिरोळ परिसर, कोल्हापूर येथील शाहूपुरी 6 वी गल्ली, गंगावेश, शिवाजी पूल आदी भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे प्रशासकीय यंत्रणेसोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आढावा बैठक घेणार आहेत.

0000000

 

गुरुवार, २९ जुलै, २०२१

जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.24 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे. तुळशी नदी- बीड, आरे व बाचणी. कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे व पुनाळ-तिरपन. कुंभी नदी- कळे व वेतवडे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी व दत्तवाड. वेदगंगा नदी- कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 37 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -89.38  दलघमी, वारणा -887.40, दूधगंगा - 606.84, कासारी- 64, कडवी - 71.24, कुंभी-64.88, पाटगाव- 95.88, चिकोत्रा- 40.60, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.02, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 40.9 फूट, सुर्वे 42.6, रुई 74.6, इचलकरंजी 71.6, तेरवाड 68, शिरोळ 70.4 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 70.4 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

 

 

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळमार्फत थेट कर्ज योजना, 20 टक्के बिजभांडवल योजना आणि व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. ऑफलान योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज मिळण्यासाठी संबधितांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. ऑनलान योजनेअंतर्गत www.msobcfdc.org या संकेतस्थळावर व्याज परतावा योजना हा पर्याय निवडून अर्ज, संबधित कागदपत्रे पोर्टलवरुन सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.   

2021-22 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेत संपूर्ण कर्ज महामंडळाचे राहील. 20 टक्के बीज भांडवल योजनेत 75 टक्के कर्ज बँकेचे, 20 टक्के कर्ज महामंडळाचे  व 5 टक्के लाभार्थी सहभाग राहील. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील. लाभार्थीने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल 12 टक्क्यापर्यंत व्याज महामंडळ लाभार्थीच्या बैंक खात्यावर जमा करेल. थेट कर्ज योजना आणि 20 टक्के बिजभांडवल योजना ऑफलान असून व्याज परतावा योजना ऑनलाइन स्वरुपाची आहे.

अधिक माहितीसाठी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब अंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, ताराराणी चौक, कोल्हापूर फोन क्र. 0231-2653512 येथे संपर्क साधावा.

000000

 

                    

 

शुक्रवारी ऑनलाईन सत्राचे आयोजन

 


       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयमार्फत दि. 30 जुलै रोजी  दु. 3 ते 5 या वेळेत कौशल्यातून रोजगाराकडे (आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्रामध्ये दुपारी ३:०० ते ३:२५ वा. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे कौशल्य अभियान अधिकारी नितीन जाधव,  दु. 3.25 ते 3.50 वा.  आस्थापना ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी, ओ. पी. सी. प्रा. लि. पुण्याचे  फाऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीपाद दिगंबर आमले,  दु. ३:५० ते ४:१५ वा. अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. श्यामसुंदर निकम यांचे तर दु. ४:१५ - ४:४० वा. लातूरचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शन होणार आहे. दु.  ४:४० – ५ वा. प्रश्नोत्तरांचा तास होणार आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी  झूम मिटींगवर  

लिंकhttps://zoom.us/j/91076243815?pwd=ZUNxaVhvSDJUZk1uTStVZUhHMFRuQT09

 ऑनलाईन सत्रासाठी  Meeting ID: 910 7624 3815

                              Passcode: 300721

फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युट्युब -  https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A 

या सत्रात सर्व युवक-युवतींनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय माळी यांनी केले आहे. 

 

 

000000000

 

राधानगरी येथे 12.2 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 12.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 च्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.6 मिमी, शिरोळ- 0.2 मिमी, पन्हाळा- 6.3 मिमी, शाहूवाडी- 5.8, राधानगरी -12.2, करवीर- 2.5 मिमी, कागल- 2.3 मिमी, गडहिंग्लज- 2.3 मिमी, भुदरगड- 10 मिमी,  आजरा-10.7 मिमी    चंदगड- 10.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर  गगनबावडा तालुक्याची आकडेवारी अप्राप्त आहे.

0000000

 

बुधवार, २८ जुलै, २०२१

कोरोना दैनंदिन अहवाल 28/7/2021


 

जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 

 


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.07 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदी- कळे व वेतवडे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड व सुळंबी. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 47 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -93.40  दलघमी, वारणा -888.55, दूधगंगा - 606.84, कासारी- 63.06, कडवी - 71.24, कुंभी-64.98, पाटगाव- 95.61, चिकोत्रा- 40.35, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.02, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 43.3 फूट, सुर्वे 43.4, रुई 75.6, इचलकरंजी 73.9, तेरवाड 71, शिरोळ 72.3 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 72.3 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

 

"आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र ” लोगोसाठी 10 ऑगस्टपर्यंत लोगो पाठविण्याचे आवाहन

 


 

            कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ  महाराष्ट्र स्थापन केले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (लोगो) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह तयार करुन १० ऑगस्टपर्यंत  सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत साखरे यांनी केले आहे.

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्याकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन, नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हा राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे.

          या स्पर्धेत भारतातील नागरिकही भाग घेऊ शकतात. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना  ५० हजार, ३० हजार २० हजार रु. पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.

00000

आजरा येथे 33.6 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात आजरा तालुक्यात सर्वाधिक 33.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11.16 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 5 मिमी, शिरोळ- 2.5 मिमी, पन्हाळा- 16.1 मिमी, शाहूवाडी- 15.6, राधानगरी -18.3, गगनबावडा- निरंक, करवीर- 11.5 मिमी, कागल- 2.7 मिमी, गडहिंग्लज- 7.9 मिमी, भुदरगड- 14.9 मिमी,  आजरा-33.6 मिमी    चंदगड- 14.2  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

 

 

 

मंगळवार, २७ जुलै, २०२१

कोरोना दैनंदिन अहवाल 27/7/2021

 


आजअखेर 1 लाख 79 हजार 170 जणांना डिस्चार्ज

 


कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2243 प्राप्त अहवालापैकी 2105 अहवाल निगेटिव्ह तर 138 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 2311 प्राप्त अहवालापैकी 2096 अहवाल निगेटिव्ह तर 215 अहवाल पॉझिटिव्ह (279 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 380 प्राप्त अहवालापैकी 266 निगेटिव्ह तर 114 पॉझीटिव्ह असे एकूण 467 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 15 रूग्णांचा मृत्यू झाला आहे

           जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 94 हजार 299 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 79 हजार 170 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 762 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

           आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 467 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-16, भुदरगड-5, चंदगड-2, गडहिंग्लज-5, गगनबावडा-1, हातकणंगले-51, कागल-37, करवीर-72, पन्हाळा-6, राधानगरी-17, शाहूवाडी-1, शिरोळ-29, नगरपरिषद क्षेत्र-30, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-186, इतर जिल्हा व राज्यातील-9 असा समावेश आहे.

           आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5240, भुदरगड- 5056, चंदगड- 3796, गडहिंग्लज- 7053, गगनबावडा- 710, हातकणंगले-21783, कागल-7508, करवीर-29880, पन्हाळा-10168, राधानगरी-4889, शाहूवाडी-4570, शिरोळ- 12457, नगरपरिषद क्षेत्र-20823, कोल्हापूर महापालिका 51 हजार 529 असे एकूण 1 लाख 85 हजार 511 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 788 असे मिळून एकूण 1 लाख 94 हजार 299 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

             जिल्ह्यातील एकूण 1 लाख 94 हजार 299 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 79 हजार 170 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 367 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 762  इतकी आहे.

000000

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत येथील राजर्षी शाहू सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक


 

जिल्ह्यातील 64 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.54 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 5 खुला आहे.

  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदी- शेनवडे, कळे, वेतवडे व मांडूकली. धामणी नदी- पनोरे, सुळे व आंबर्डे, वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड व सुळंबी. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली. हिरण्यकेशी नदी- ऐणापूर, निलजी, गिजवणे व खाणदळ. ताम्रपर्णी नदी- चंदगड, कुर्तनवाडी व हल्लारवाडी, असे एकूण 64 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी – 93.86  दलघमी, वारणा -887.39, दूधगंगा – 600.84, कासारी- 63.51  , कडवी - 71.24, कुंभी - 66, पाटगाव- 95.48 , चिकोत्रा- 49.84 , चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी - 33.20, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 45.6 फूट, सुर्वे 43.7 , रुई 76, इचलकरंजी 75, तेरवाड 72.11, शिरोळ 73.11 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 73.11 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000