इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ३० जून, २०१९

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ५५.१२ दलघमी पाणीसाठा


कोल्हापूर,दि.३०,(जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर ५५.१२ दलघमी पाणीसाठा आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इ भोगावती नदीवरील खडक कोगे हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
            आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी २९.०५ दलघमी, वारणा २३८.६० दलघमी, दूधगंगा ६०.२९ दलघमी, कासारी १६.९६ दलघमी, कडवी २७.७२दलघमी, कुंभी २१.२०दलघमी, पाटगाव २७.६६ दलघमी, चिकोत्रा १२.०९ दलघमी, चित्री ७.८७ दलघमी, जंगमहट्टी ४.३८ दलघमी, घटप्रभा  ३१.७६ दलघमी, जांबरे २.२७ दलघमी, कोदे (ल पा) १.६४ दलघमी असा आहे.
  तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम २०.६ फूट, सुर्वे १९ फूट, रुई ४६.६ फूट, इचलकरंजी ४३.६ फूट, तेरवाड ३६.६ फूट, शिरोळ २८ फूट, नृसिंहवाडी २० फूट, राजापूर १७ फूट तर नजीकच्या सांगली ७ फूट आणि अंकली ७.७ फूट अशी आहे.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५९.५० तर शिरोळमध्ये सर्वात कमी २८.७१ मिमी पाऊस

कोल्हापूर, दि.३०(जिमाका) जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५९.५० मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी २८.७१ मिमी पावसाची नोंद झाली.
  आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- ६४ मिमी एकूण १०४ मिमी, शिरोळ- २८.७१मिमी एकूण ९०.२९ मिमी, पन्हाळा- ५४.१४ एकूण १७८.५७, शाहूवाडी- ७५.८३ मिमी एकूण २९४.६७, राधानगरी- १००.१७ मिमी एकूण २७१.१७ मिमी, गगनबावडा- १५९.५० मिमी एकूण ७२२ मिमी, करवीर- ७२.४५ मिमी एकूण १८२.७३ मिमी, कागल- ९०.४३मिमी एकूण २२१.४३मिमी, गडहिंग्लज- ५७.२९मिमी एकूण १६१.२९मिमी, भुदरगड- ८५.४० मिमी एकूण २८५.२०मिमी, आजरा- ९६.७५मिमी एकूण २४६.७५ मिमी, चंदगड- ९०.३३ मिमी एकूण २९५.६७ मिमी

शनिवार, २९ जून, २०१९

कृषी विभागाच्या नवीन लोगोसाठी 25 हजारचे पारितोषिक



कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : कृषी विभागाचा लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येतो. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान यांचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करुन नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे. उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा फर्म्स यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल.
             या लोगोमध्ये सुधारण करुन डी.टी.पी. डिझाईन चे सॉफ्ट व हार्ड रंगीत कॉफी कृषी विभाग कृषी भवन, 2 रा मजला शिवाजीनगर पुणे येथे समक्ष व ddinfor@gmail.com  या सकेतस्थळावर दि. 31 जुलै पर्यंत पाठविण्यात यावे. त्याचबरोबर ब्रिदवाक्यही सुचविण्यात यावे.
              तसेच अधिक माहितीसाठी रामकृष्ण जगताप कृषी उपसंचालक (माहिती), कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथील 020-25537865 किंवा 9823356835 या दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.
0000

1 कोटी 13 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाकडून 23 लाख 95 हजार खड्डे पूर्ण ----उपवनसंरक्षक



        कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : राज्यातील  33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 1 कोटी 13 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी वनविभागाकडून 23 लाख 95 हजार खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत अशी माहिती उपवनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांनी दिली.
            सन 2019 च्या पावसाळ्यात राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने आखलेला आहे. यामध्ये जिल्ह्यास 1 कोटी 13 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडून संयुक्त वनव्यवस्थापन  समिती मार्फत किंवा निविदा राबवून ठेकेदामार्फत 23 लाख 95 हजार खड्डे खुदाईची कामे करण्यात आली आहेत.
            या कामांची छायाचित्रे आणि चित्रिकरण या विषयीची माहिती www.mahaforest.nic.in  या संकेतस्थळावर पहायला उपलब्ध आहे. सामाजिक वनीकरण व इतर शासकीय यंत्रणा यांना दिलेल्या उद्दिष्टांच्या  अनुषंगाने ऑनलाईन संकेतस्थळावर भरण्यात आलेली माहिती ही संबंधित यंत्रणेने भरलेली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आढावा घेतला आहे. झालेल्या कामांचे छायाचित्रणदेखील अपलोड करण्यात आले आहे.
                        33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हा शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम असून 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
00000

बुधवार, २६ जून, २०१९

राजर्षी शाहू महाराजांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन






जिल्ह्यातील धामणी, उचंगी यासह सहा
रखडलेले पाणी प्रकल्प तातडीने मार्गी लावणार
                              - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

        कोल्हापूर, दि. 26 : जिल्ह्यातील धामणी, उचंगी यासह सहा रखडलेले पाणी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.     
            राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 145 व्या  जयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देवून शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महापौर सरीता मोरे, आमदार सतेज पाटील, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी  दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन गिरी, ज्येष्ठ विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
            राजर्षी शाहू महाराजांच्या अनेक गोष्टी समाजाला दिशादर्शक आहेत. त्यातील महाराजांच्या पाणी धोरणानुसार कमी पाणी व जास्त पिकांचे उत्पादन करण्यासाठी येत्या काळात भर दिला जाणार आहे. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, राजर्षी शाहूंचा पाणी साठे वाढविण्यावर भर होता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी प्रकल्पांची कामे सुरु आहेत. त्यातील सहा प्रकल्प सद्यस्थितीत रखडलेले आहेत. या प्रकल्पात सर्वात मोठा धामणी प्रकल्प गतीने पूर्ण  करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. उंचगी व अन्य प्रकल्पांचे कामही येत्या काळात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   
            पालकमंत्री म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये शिक्षण या मुलभूत गोष्टीवर प्राथम्याने भर दिला होता. त्याच धर्तीवर राज्य शासन शिक्षणावर भर देत आहे. राज्यातील मुलींचे 12 वी पर्यंतचे सर्व शिक्षण मोफत आहे. तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. खासगी शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून या 25 टक्क्यांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची 25 टक्के शुल्क राज्य शासनाकडुन भरले जाते. राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी शासनाने आजपर्यंत 608 कोटी रुपये भरलेले आहेत असे शेवटी सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व महाराष्ट्राच्या जनतेला राजर्षी शाहू जयंती निमित्त त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी शाहू जन्मस्थळावर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.    
दसरा चौक शाहू चरित्रमय
            दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महापौर सरिता मोरे, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी  दौलत देसाई, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, प्रांताधिकारी सचिन इथापे, समाज कल्याण निरीक्षक संजय पवार, यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. 
                 
             सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हलगी व लेझीम पथक, शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्षवेधी चित्ररथासह शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी उत्सव समितीचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
00000


सोमवार, २४ जून, २०१९

जिल्हा वार्षिक योजना 271 कोटी अर्थसंकल्पित तरतुदीपैकी 90 कोटी प्राप्त निधी 100 टक्के खर्च करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश



                    
कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 2019-20 साठी 271 कोटींची अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी 90 कोटी प्राप्त झाले आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 113 कोटी 41 लाखाची तरतूद असून त्यापैकी 37 कोटी 23 लाख, तर ओटीएसपीसाठी 1 कोटी 97 लाख 77 हजार तरतुदीपैकी 65 लाख 91 हजार प्राप्त झाले आहेत.  हा निधी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश   महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 
           जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार हसन मुश्रिफ,  जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.
           सन 2018-19 साठीचा जिल्हा वार्षिक योजनेतील अर्थसंकल्पित तरतूद मार्च 2019 अखेर 100 टक्के खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठीचा 76.35 टक्के तसेच ओटीएसपी साठीचा 58.65 टक्के खर्च झाल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यासाठी आलेला निधी वेळच्यावेळी खर्च झाला पाहिजे. त्यासाठी सर्व यंत्रणेने आवश्यक तो पाठपुरावा केला पाहिजे. दर पंधरा दिवसांनी खाते प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीस याबाबतचा आढावा घेण्यात येईल. प्रत्येक वाडी, वस्ती विजेशिवाय राहणार नाही असा संकल्प जसा केला आहे, त्याचप्रमाणे रस्ते आणि पाणी यांची सोय करण्यात येईल. धनगर वाड्यावर कोण-कोणते रस्ते तयार केले याची यादी तयार करावी. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा योजनेबाबतही यादी करुन त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. कोल्हापुरात येत्या सहा महिन्यात प्रत्येक घरात पाईपलाईनने गॅस पोहचेल असे आश्वासने त्यांनी यावेळी दिले. 
उपलब्ध निधी 100 टक्के खर्च करा-पालकमंत्री
             जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्व साधारण योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी सन 2019-20 यासाठी जिल्ह्यास उपलब्ध झालेला निधी  त्या त्या योजनांवर  100 टक्के खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व कार्यान्वित यंत्रणांना दिले.
जिल्ह्यातील 19 क वर्ग यात्रा स्थळांना मान्यता-पालकमंत्री
             जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थ क्षेत्राच्या विकासावर अधिक भर दिला असून जिल्ह्यातील 28 क वर्ग यात्रा स्थळांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामध्ये भुदरगड तालुक्यातील हनबरवाडीमधील श्री विठ्ठलाई मंदिर, नाधवडे आणि शेणगावमधील श्री. ज्योतिर्लिंग मंदिर, वासनोलीमधील बाटममंदिर, पाचवडेमधील श्री त्रिपुरेश्वर मंदिर, मडूरमधील ज्योतिर्लिंग मंदिर, गडहिंग्लज तालुक्यातील हिटणीमधील श्री बसवेश्वर मंदिर, कौलगेमधील श्री कल्लेश्वर मंदिर, कडगावमधील श्री हनुमान मंदिर, करंबळीमधील श्री नारायण मंदिर, हातकणंगले तालुक्यातील हेरलेमधील श्री क्षेत्र सिद्धोबा देवालय, कोरोचीमधील श्री हनुमान मंदिर,
          करवीर तालुक्यातील निगवे दु. मधील श्री विठ्ठल मंदिर व श्री मारुती मंदिर, कागल तालुक्यातील करनूरमधील श्री मरीआई बिरदेव मंदिर, वाळवेमधील श्री हनुमान मंदिर, पिराचीवाडीमधील श्री महादेव मंदिर व श्री हनुमान मंदिर, चिमगावमधील श्री चिमकाईदेवी मंदिर, करंजीवनेमधील भावेश्वरी मंदिर, हळदीमधील श्री चौंडेश्वरी मंदिर, बाणगेमधील श्री अंबाबाई मंदिर, द. वडगावमधील नागनाथ मंदिर, पन्हाळा तालुक्यातील घरपण येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर, राधानगरी तालुक्यातील बुजवडेमधील श्री खुळोबा देवालय, आम.व्हरवडेमधील श्री अंबाबाई मंदिर, राशिवडे बु. मधील नागेश्वर देवालय, आजरा तालुक्यातील होन्याळीमधील भैरवनाथ मंदिर आणि आजरा नरपंचायतमधील श्री रवळनाथ मंदिर यांचा समावेश असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
             या बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, ऊर्जा, रस्ते, आरोग्य आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.  प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य, सदस्या उपस्थित होते.
00000
                                       

मयत ग्रामसेवक संदिप तेली यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 लाखाचा धनादेश




कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कर्तव्यावर असताना अपघातात मयत झालेल्या ग्रामसेवक संदिप तेली यांच्या पत्नी श्रीमती मेघा तेली यांना महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज 15 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
          शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील ग्रामसेवक संदिप सातलिंगा तेली हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कामकाजासाठी वडणगे व पाडळी बु. येथे कार्यरत होते. 18 एप्रिल 2019 रोजी रात्री 11.15 वाजता मोटरसायकलवरुन कोल्हापूरकडे येत असताना शिवाजी पुलावर त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
          सानुग्रह अनुदान म्हणून 15 लाख रुपयांचा धनादेश त्यांची वारस श्रीमती मेघा संदिप तेली यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते.
00000

सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग आवश्यक --- जिल्हाधिकारी दौलत देसाई


                                                                               




आंतरराष्ट्रीय योग दिन


कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : शरीर आणि मन निरोगी, शुद्ध ठेवण्यासाठी हजारो वर्षापासून भारत देशाने दिलेली योग संस्कृती पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करुया असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
         जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
          प्रशिक्षक नामदेव पाटील यांनी सुरुवातीला प्रात्यक्षिकं दाखवून उपस्थितांकडून विविध योगासने करवून घेतली. त्यानंतर प्रशिक्षक निलेश कागिनकर यांनी राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण पदक प्राप्त, प्रज्ञा गायकवाड, माही घोरपडे, ओंकार दाभोळे, स्टीव्हन डिसूझा या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकं सादर केलीत. ‘योग जीवन’ अर्थात योगाभ्यासाने  हे डॉ. रणजित चिकोडे लिखित पुस्तके या विद्यार्थ्यांना भेट देवून जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी त्यांचा गौरव केला.
         हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने हे पुस्तक जगत आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, हजारो वर्षाच्या भारताच्या योग परंपरेला जागतिक स्तरावर आज मान्यता मिळाली आहे. योगामुळे मानसिक, शारीरिक आरोग्याला कोणताही धोका पोहचणार नाही. योगाभ्यासाला कोणत्याही वयाचं बंधन नाही. शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग परंपरा पुढे चालू ठेवा.
         याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, फादर जेन्स थोरात आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कसा पहाल Q R कोड
क्यु आर कोड स्कॅनर प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा. वरील क्यु आर कोड स्कॅन करा, मोबाईलवर दिसणारी लिंक क्लिक केल्यास सोबतच्या वृत्ताची क्लीप आपल्याला पाहता येईल.
00000

गुरुवार, १३ जून, २०१९








स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कार्यातून
शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन
                  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
            कोल्हापूर, दि. 13 : राजर्षि शाहू महाराजांनी बहुजन हिताय बहुजन सुखायचा मार्ग दाखविला. शेवटच्या माणसाच्या विकासाचा, सर्व सामान्य माणासाच्या उत्थानाचा मार्ग त्यांनी दाखविला.  यातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परंपरेचे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे पाईक होते. तळागाळातील सर्व सामान्य माणूस, शेतकरी यांच्या विकासाचे, परिवर्तनाचे ध्येय घेवूनच त्यांनी जीवनभर सामाजिक कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या विविध संस्थामुळे कागल परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            कागल येथील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त श्रीमंत जयसिंगराव घाटगे पटांगणात आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, पुणे  म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खा. श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सुरेश हळवणकर,उल्हास पाटील,प्रकाश आबिटकर,अमल महाडिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुहास वारके,जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त  मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल, जिल्हा पेालीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राजे प्रविणसिंह घाटगे, श्रीमंत राजे  मृगेंद्रसिंह घाटगे,सुहासिनी घाटगे, पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके,  गोकुळचे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, आपण सर्वसामान्य जनतेचे  उत्तरदायी आहोत. या भावनेतून स्व. विक्रमसिंह राजे घाटगे यांनी मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांची उभारणी केली. त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. सहकार, क्रिडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी संस्था उभारल्या. कर्णबधिर मुलांकरीता शाळा, अनाथ मुलांसाठी विविध सुविधा याबाबी त्यांच्यातील संवेदनशीलता अधोरेखित करतात. कोणत्याही परिस्थितीत धैर्य न सोडता काम केल्यास संपूर्ण समाज पाठिशी राहतो त्यामुळे विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या मार्गाचाच अवलंब करीत रहा, असेही त्यांनी राजे समरजितसिंह यांना सांगितले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऊस, साखर कारखानदारी यांच्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. गतवर्षी  99.95 टक्के एफआरपी दिली तर यावर्षी आतापर्यंत 96 टक्के एफआरपी दिली आहे.  उर्वरीतही लवकरच देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत देता यावी यासाठी किमान विक्रीमूल्य (minimum selling price) देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतल्यामुळे अडचणीत असलेली साखर कारखानदारी सावरली आहे, असे सांगितले.
            बाजारपेठेत साखरेची मागणी कमी झाल्यामुळे साखरेचे उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. त्याकरीता सहउत्पादनांच्या पॅकेजच्या योजना तयार केल्या आहेत. इथेनॉलच्या उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. यापुढे साखर कारखान्याचे साखर हे बायप्रोडक्ट होईल व उप उत्पादने प्रमुख होतील व त्यातून साखर कारखानदारी अधिक सक्षम होईल व त्यातून शेतकऱ्यांचे कल्याण होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

            पाण्याचा उचित वापर करून अनिर्बंध पाणी वापराला आळा घालणे व त्याचवेळी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चालू असलेले प्रयत्न, महिला शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज  हे उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
             श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी विक्रमसिंहराजे यांनी अनंत अडचणीचा सामना करत श्री छत्रपती शाहू साखर कारखाना उभारला. त्यातून या परिसराचा विकास झाला. या कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना चांगला दर दिला असून या परिसराच्या विकासाचे  श्रेय विक्रमसिंहराजे यांना जाते असे सांगितले. यावेळी त्यांनी नुतन खासदारांनी भरीव काम करून जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
            यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कागल परिसराच्या सर्वांगीण विकासात विक्रमसिंह राजे घाटगे यांचे अत्यंत महत्वाचे योगदान असून त्यांनी पाणीपुरवठा,शैक्षणिक,सामाजिक संस्था उभ्या केल्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कागलच्या तळागाळातील जनतेच्या विकासाचे ध्येय ठेवले. लोकशाहीमध्ये समाजाच्या हिताचे काम करण्याची प्रेरणा घेऊन समरजितसिंह घाटगे काम करीत आहेत, असे सांगून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
            म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीन विकास हेच राजे विक्रमसिंह घाटगे यांचे ध्येय होते, असे सांगून यासाठी त्यांनी 16 पाणी पुरवठा संस्था सुरू केल्या. शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे  यासाठी कागल को-ऑपरेटीव्ह बँकेचा विकास केला, मुलांसाठी शाळा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम त्यांना राबविले. आज कारखान्याने 5 हजार 232 हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणल्याचे सांगितले.  यावेळी त्यांनी आंबेओहोळ प्रकल्पाला निधी मंजूर करून अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल आणि गडहिंग्लजच्या हद्दवाढीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.  मेक इन  गडहिंग्लज  संकल्पना राबवून गडहिंग्लज, उत्तूर परिसरात एमआयडीसी सुरू करावी व त्यातून रोजगार निर्मिती करावी. कागल हे विकासाच्या मुद्यावर पुढे नेऊन विक्रमसिंह घाटगे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी साथ द्यावी,असे आवाहन केले.
            या कार्यक्रमात नव्याने निवडूण आलेले खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुतळ्याचे आर्किटेक्चर अमर चौगले व पुतळाकार  किशोर पुरेकर यांचाही सत्कार करण्यात आला. कारखान्याच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपुर्त करण्यात आला. यामेळाव्याला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           
000000


कृषि विभागाची सर्व कार्यालये एकाच इमारतीत येणार - कृषिमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरात शेतकरी सन्मान भवनाचे भूमीपूजन




                                
            कोल्हापूर, दि. 13 :    कृषि विभागाची विविध खाती विविध इमारतीमध्ये असतात. त्यामुळे शेतीच्या कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांची अनेकदा ओढातान होते.  हे टाळण्यासाठी कृषिची विविध कार्यालये एकाच इमारतीत करण्याचा अनेक दिवस प्रयत्न सुरु होता. या प्रशासकीय इमारतीसाठी कृषि महाविद्यालयाने तीन एकर जागा दिल्याने शेतकरी सन्मान भवन उभारता येत आहे. वर्ष-दिड वर्षात या ठिकाणी काही कार्यालयचे सुरु होतील. या इमारतीत शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल. राहुरी कृषि विद्यापीठाप्रमाणेच याठिकाणी एक असे सेंटर असेल ज्यामध्ये नव नवीन बियाणांचे संशोधन, खते, बियाणे यांची माहिती मिळेल व विक्रीही होईल. वर्षभरात 600 शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करुन त्यांना त्यांचे उत्पादन विक्रीची संधी देता येईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकरी सन्मान भवन अत्यंत उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            कोल्हापूर मुख्यालयी उभारण्यात येत असलेल्या कृषि विभागाच्या शेतकरी सन्मान भवन या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.  कोल्हापूर जिल्हा हा शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी अत्यंत प्रगत जिल्हा असून कृषि विभागाच्या विविध योजना परिणामकारमपणे राबविण्यासाठी व शेतकऱ्यांना अद्यावत कृषि तंत्रज्ञान व सुविधा एकत्र उपलब्ध होण्यासाठी शहरातील कृषि विभागाची सर्व कार्यालये एकत्र आणण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकत्र उपलब्ध होण्यासाठी सदरचे शेतकरी सन्मान भवन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. हे भवन उभारण्यासाठी 29 कोटी 80 लाख रुपये शासन मान्यता प्राप्त झालेली आहे.
             
 00 0 0 0 0



मंगळवार, ११ जून, २०१९

कोल्हापूरच्या वैविध्यपूर्ण सौंदर्यात केएसबीपी ट्रॅफिक पार्कमुळे आणखी भर - पालकमंत्री चंद्रकांत पाटील









            कोल्हापूर, दि. 10 : ट्रॅफिक पार्कची संकल्पना अभिनव असून केएसबीपी ट्रॅफिक पार्कमुळे कोल्हापूरच्या वैविध्यात आणखी एका युनिक बाबीची भर पडली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            कोल्हापूर येथील पोलीस उद्यानाजवळ केएसबीपी ट्रॅफिक पार्क साकारण्यात आला असून याचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
            उद्योग शेती, विकास बरोबरच कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात केएसबीपी ट्रॅफिक पार्कमुळे अधिक भर पडली आहे. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, लहानपणापासूनच ट्रॅफिकचे नियमांबाबत जाणीव जागृती झाली तर रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होईल त्यादृष्टीने हे पार्क अधिक महत्वपूर्ण ठरेल. यावेळी त्यांनी आपल्या वाढदिनानिमित्त दुष्काळग्रस्त 28 हजार गावांमधून मुलींच्या शिक्षणासाठी निधी संकलित करण्याचा संकल्प करुन 50 हजार महाविद्यालयीन मुलींना कपडे, नऊ महीन्यासाठी बसचा पास, बूट देण्याचे उदिदष्ट असल्याचे सांगितले.
           
0000000