इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १९ मे, २०१२

शिक्षण प्रगतीचा पाया - उद्योगमंत्री राणे


    कोल्हापूर दि.19: शिक्षण हा प्रगतीचा आणि विकासाचा पाया आहे. त्यामुळे नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे हे राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे, असे प्रतिपादन उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री नारायण राणे यांनी आज केले.
      कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विस्तारीत वास्तूचे उद्‌घाटन व नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम आज श्री. राणे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार वीरकुमार पाटील, छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश साळोखेआदी उपस्थित होते. सिध्दनेर्ली येथील शाळेच्या आवारात हा कार्यक्रम झाला.
      श्री. राणे म्हणाले, धविकास आणि समृध्दी आवश्यक असेल तर शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. आधुनिक समाजाची जडणघडण करण्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाची भूमिका बजावते. शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षकाची जबाबदारी अधिक आहे. कारण शिक्षक हा व्यवसाय नसून तो पेशा आहे.ध
      राज्यातील उद्योग क्षेत्रात गतीने विकास व्हावा यासाठी शासन पावले उचलीत आहे. उद्योगाचा विकास होण्यासाठी शिक्षण, कुशल मनुष्यबळ, मुलभूत, पायाभूत सुविधा यांचा विकास करण्यासाठी शासनाचा भर आहे. राज्याची उद्योगात प्रगती होत असताना राज्यातील लोकांचीही प्रगती होणे अपेक्षित असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.
      गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, शिक्षकांकडे उद्याचा समाज घडविण्याची जबाबदारी आहे कारण सध्याचा विद्यार्थी अतिशय हूशार आहे. तो चौकस आहे. अशा विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. केंद्ग सरकारने शिक्षणाचा अधिकार कायदा मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान आहे.
      यावेळी श्री. विक्रमसिंह घाटगे यांचेही भाषण झाले. प्रा. सुनिल मगदूम यांनी स्वागत केले. कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम यांनी प्रास्ताविक तर एन. के. मगदून यांनी आभार मानले.

बुधवार, ९ मे, २०१२

माजी सैनिकांना आवाहन


कोल्हापूर दि. 8 : सैन्य सेवेतून 31 डिसेंबर 1986 पूर्वी निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या पेंशन कागदोपत्री त्यांच्या वारस पत्नीचे नांव नोंदणीची कार्यवाही जिल्हा सैनिक कार्यालयाव्दारे सुरु आहे. करवीर तालुक्यातील काही माजी सैनिकांचे निवासी पत्ते न मिळाल्याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय त्यांचेशी संपर्क साधू शकले नाहीत अशा माजी सैनिकांची नावे व पत्ते खालीलप्रमाणे आहे. श्रीकांत बाबुराव धुमाळ, बँक ऑफ महाराष्ट्र, गंगावेश शाखा, गोपाळ पाटील, दिनकर पाटील, मारुती पाटील सर्व देना बॅंक, परिते शाखा, रामचंद्ग खेडकर, के. एन. सोलसे, जे. सी. सोळंखे, मधुकर बाळा मद्याळे सर्व बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा खरी कॉर्नर, नंदकुमार गुळवणी  बँक ऑफ इंडिया, शाहुपुरी शाखा, दिनकर पोवार, बँक ऑफ इंडिया, कसबा बावडा शाखा, बाळासाहेब शेळके, बँक ऑफ महाराष्ट्र,लक्ष्मीपुरी शाखा.
           वरील सर्व माजी सैनिकांनी त्यांचे डिसचार्ज पुस्तक, ओळखपत्र, वारस पत्नीसह 5 जॉइंट फोटो, एकमेव वारस पत्नी असल्याबाबत ग्रामसेवक, नगरसेवक, तलाठी यांच्याकडून फोटोवर सही शिक्यासह दाखला, बँकेचे पेंशन पुस्तक, सैन्य सेवेबाबतवी उपलब्ध सर्व कागदपत्रे घेऊन त्वरित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
     

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमानतळावर स्वागत


          कोल्हापूर दि. 8 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज अल्पकाळ कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत वने आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते.
           करवीरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता घोलप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास आदी अधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विमानतळावरुन उपमुख्यमंत्री पवार, वनेमंत्री कदम, ग्रामविकास मंत्री पाटील यांचे सांगली जिल्ह्यातील ढवळी येथीज कार्यक्रमासाठी प्रयाण झाले.

शनिवार, ५ मे, २०१२

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचामे महिन्यातील जिल्हा दौरा कार्यक्रम


   कोल्हापूर दि. 5 : कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कल्याण व पुनर्वसनाच्यादृष्टीने योजना व सवलतींची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी मे 2012 मध्ये जिल्हा दौरा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कालावधीत ते विविध तालुक्यांना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यास भेट देऊन सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्नही जाणून घेणार आहेत. दौर्‍यातील कार्यक्रमानुसार माजी सैनिक/विधवा/अवलंबितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या तालुकानिहाय दौर्‍याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असून आपल्या दौर्‍यात ते बहुतांश ठिकाणी तहसिलदार कार्यालयात संबंधितांची भेट घेतील. या व्यतिरिक्त स्थानांचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला आहे. दि. 8 मे 2012 रोजी चंदगड, 9 मे 2012 रोजी गडर्हिलज, 15 मे 2012  रोजी हातकणंगले, 16 मे 2012 रोजी भुदरगड, 17 मे 2012 रोजी शाहुवाडी, 18 मे 2012 रोजी आजरा, तसेच 18 19 मे 2012 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्ग,  22 मे 2012 रोजी राधानगरी व 25 मे 2012 रोजी शिरोळ, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे. सर्व दौर्‍यांची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 अशी असून सदर दिवशी शासकीय किंवा इतर सुट्टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.
                       





क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


  कोल्हापूर दि. 5:  राज्य शासनामार्फत सन 2009-102010-2011 या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, कार्यकर्ते किंवा संघटक तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेचा ठराव व शिफारशीसह दि. 31 मे 2012 पर्यत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे या पत्यावर मागविण्यात येत आहेत. खेळाडू किंवा मार्गदर्शकांस विहित नमुन्यातील अर्ज वैयक्तिकरित्याही परस्पर संचालनालयाकडे सादर करता येतील. क्रीडा संघटक किंवा कार्यकर्ते यांनी विहित नमुन्यातील अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर यांच्या कार्यालयकडे विहित मुदतीत सादर करावेत.वरील सर्व क्रीडा पुरस्काराबाबत अधिक माहिती व नमुना अर्ज क्रीडा विभागाच्या ... या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांनी प्रसिध्दी यांनी कळविले आहे.

शासनाच्या कृषी योजनांत लोकसहभाग वाढला पाहिजे --- कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

   कोल्हापूर दि. 4: राज्य शासनाच्या कृषी योजनांत लोकसहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशा सूचना कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या.
       कृषी व पणन विभागाची आढावा बैठक आज कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. येथील रेसिडेन्सी क्लब येथील सभागृहात ही बैठक      झाली.
       यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयसिंह मंडलिक, माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे आदि उपस्थित होते.
       श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, 'पुढील वर्षापासून शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याचा विचार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा कृषी आराखडा तयार करण्यात येत आहे. खताचे वितरण व्यवस्थित होईल. रेक पाँईटवरुन थेट बांधावर खत पुरवठा होईल याची तयारी करण्यात आली आहे.'
       राज्यात सर्वत्र खरीपांच्या पूर्व तयारीसाठी बैठक घेण्यात आली आहे. त्यामध्ये अतिशय काटेकोरपणे नियोजन करण्यात आल्याचेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी, शेतकर्‍यांनी शेती आणि शेतीमालाच्या विपणन विषयक आपल्या समस्या व मते मांडली.