इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

लाळ खुरकत लसीकरण मोहिम आजपासून

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय): राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत पहिली लाळ खुरकत लसीकरणाची पहिली फेरी उद्या मंगळवार 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोहिम स्वरूपात राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व पशुधनाला बिल्ले मारून त्याची ऑनलाईन इनाफ प्रणालीवर नोंद करून मगच पशुधनास लसीकरण करण्यात येणार आहे. साखर कारखाने/पशु बाजारांच्या ठिकाणी प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. लाळ खुरकत लसीकरणाशिवाय पशुबाजारांमध्ये यापुढे पशु खरेदी विक्री करता येणार नाही, असेही श्री. पठाण यांनी कळविले आहे.

00000

प्रमुख जिल्हा मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण मार्गे वाहतूक सुरू.

00000

 

7 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400; अलमट्टीतून 26922 क्युसेक विसर्ग सुरू


 

            कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 231.35 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400, कोयनेतून 2056 तर अलमट्टी धरणातून 26922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ असे एकूण 7 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 101.58 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.10 दलघमी, वारणा 944.05 दलघमी, दूधगंगा 712 दलघमी, कासारी 78.04 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 72.70 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.08 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  44.170  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 19.3 फूट, सुर्वे 19.6 फूट, रुई 46.6 फूट, इचलकरंजी 43 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 28.6 फूट, राजापूर 18.9 फूट तर नजीकच्या सांगली 9  फूट व अंकली 11.10 फूट अशी आहे.

0000000


गगनबावडा तालुक्यात 28 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 28 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 0.75 (472), शिरोळ- निरंक (370.71), पन्हाळा- 13.14 (1462.14), शाहूवाडी- 7.50 (1788.83), राधानगरी- 5.17 (1882), गगनबावडा- 28 (4802), करवीर- 4.64 (1018.55), कागल- 1.14 (1192.57), गडहिंग्लज- 7.14 (855.14), भुदरगड- 6 (1445.40), आजरा- 10.50 (2095.50), चंदगड- 20.33 (2094.50) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

आजअखेर 14 हजार 347 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 731 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 228 निगेटिव्ह तर 391 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (4 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, 96 अहवाल प्रलंबित आहेत तर 12 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 355 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 257 तर 98 पॉझीटिव्ह (44 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 47 पॉझीटिव्ह आले असे एकूण 536 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 23 हजार 42 पॉझीटिव्हपैकी 14 हजार 347 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 996 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 536 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-5, चंदगड-28, गगनबावडा-2, हातकणंगले- 68, कागल-52, करवीर-47, पन्हाळा- 19, राधानगरी- 10, शाहूवाडी-16,  शिरोळ- 46, नगरपरिषद क्षेत्र- 69, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 165 व इतर शहरे व राज्य 6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-343, भुदरगड- 485, चंदगड- 543, गडहिंग्लज- 510, गगनबावडा- 47, हातकणंगले-2711, कागल- 607, करवीर-2540, पन्हाळा- 773, राधानगरी- 608, शाहूवाडी- 506, शिरोळ- 1210, नगरपरिषद क्षेत्र-4222, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 7329 असे एकूण  22 हजार 434 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 608 असे मिळून एकूण 23 हजार 42 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 23 हजार 42  पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 14 हजार 347 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 699 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 996 इतकी आहे.

00000

300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजनेटेड बेडचा प्रस्ताव शासनाकडे - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 



 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील वाढता संसर्ग आणि उपलब्ध खाटांची व्यवस्था लक्षात घेवून यापैकी काही खाटांचे आयसीयू बेडमध्ये रुपांतर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजनेटेड नवीन बेड तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

यामध्ये सीपीआर, आयजीएम इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, संजय घोडावत विद्यापीठ, इएसआयएसएच, ग्रामीण रुग्णालय पारगाव किंवा एमजीएम हे खासगी रुग्णालय याठिकाणी हे आयसीयू बेड तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुविधा आणि मनुष्यबळासाठी खासगी संस्थेकडून निविदा मागविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालय निहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात  तीन अधीक्षक अभियंता, वन विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सुविधा येत्या दहा ते बारा दिवसात पूर्ण होतील, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. अनिता सैबन्नावर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, पाटबंधारे विभागाचे महेश सुर्वे, महावितरणचे सागर मारुलकर, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.

      

00000

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी रेमडीसीव्हीर व इतर औषधांची खरेदी करावी -जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 


कोल्हापूर, दि. २९ (जिल्हा माहिती कार्यालय)- जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांनी दाखल रुग्णांच्या उपचारासाठी रेमडीसीव्हीर आणि इतर औषधांची खरेदी बाजारातून करुन साठा ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खासगी रुग्णालयांना आज दिले.

     कोव्हीड-१९ बाधित रुग्णांसाठी रेमडीसीव्हीरचा वापर करण्यात येत आहे. या इंजेक्शनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने सद्यस्थितीत जिल्हा परिषदेकडे उपलब्ध होणाऱ्या साठ्यामधून गठित समितीच्या शिफारशीनुसार संदर्भीय पत्राद्वारे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी इंजेक्शन देण्यात येत आहेत. 

          ही इंजेक्शन बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करावा.  

रेमडीसीव्हीर (सिप्ला) अमीर अली ९५७५१२२७८६, विश्वासराज अहुजा ९८२०२७३५६७, वितरक कश्यप मोदी ९८२०२१४५५८, आशिष मिश्रा ९९६५४९११, तारकेश ९९०२४९८५९६, राकेश सिंग ९८६७९२२३५५, वितरक करण ९८२०६६८८०९, टॅब फॅव्हीपीरावीर (ग्लेनमार्क) ए जी प्रसाद ९८२०८५२९७७, वितरक स्वप्नील हर्णे ९३२६०२३९३०, यासाठी शासनाच्या समितीने दर निश्चिती केली आहे, ती अशी-रेमडीसीव्हीर १०० एम जी १ वाईल ३ हजार ३९२.४८ पै टॅब फॅव्हीपिरावीर २०० एम जी १ हजार ९९९.२० पै प्रती ३४ टॅब

     भविष्यातील रुग्ण संख्येतील वाढ विचारात घेवून आणि  जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी या इंजेक्शनची खरेदी करुन साठा ठेवावा. आवश्यकतेनुसार ही इंजेक्शन रुग्णांसाठी वापरावीत. खासगी रुग्णालयांनी केलेल्या या औषध खरेदीची तपासणी रुग्णालयांवरील नियुक्त नोडल अधिकारी करतील आणि तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला देतील. ज्या रुग्णांना शक्य असेल त्यांनीही ही औषधे थेट खरेदी करुन रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्यास हरकत नाही. 

      या औषधांच्या खरेदीमुळे जिल्ह्यात तुटवडा भासणार नाही. रुग्णांवरील उपचारासाठी ही औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे औषधं मागणीसाठी होणारी गर्दी कमी होवून, औषधं मिळणार की नाहीत, ही रुग्णांना वाटणारी धास्तीही कमी होईल. 

    याबाबत इंडीयन मेडीकल असोशिएशन आणि इंडीयन असोशिएशन ऑफ पिडियाट्रीक्स यांना पत्र पाठवून सर्व रुग्णालयांना कळविण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सूचना दिली आहे

0000

आजअखेर 13 हजार 660 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


 

   कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 560 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 984 निगेटिव्ह तर 481 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, 62 अहवाल प्रलंबित आहेत तर 32 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 423 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 331 तर 92 पॉझीटिव्ह (60 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 210 पॉझीटिव्ह आले असे एकूण 783 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 22 हजार 506 पॉझीटिव्हपैकी 13 हजार 660 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 175 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 783 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-9, भुदरगड-28, चंदगड-13, गडहिंग्लज-13, गगनबावडा-1, हातकणंगले- 98, कागल-35, करवीर-69, पन्हाळा- 27, राधानगरी- 15, शाहूवाडी-2,  शिरोळ- 41, नगरपरिषद क्षेत्र- 63, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 343 व इतर शहरे व राज्य 26 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-340, भुदरगड- 480, चंदगड- 515, गडहिंग्लज- 510, गगनबावडा- 45, हातकणंगले-2643, कागल- 555, करवीर-2493, पन्हाळा- 754, राधानगरी- 598, शाहूवाडी- 490, शिरोळ- 1164, नगरपरिषद क्षेत्र-4153, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 7164 असे एकूण  21  हजार 904 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 602 असे मिळून एकूण 22 हजार 506 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 22 हजार 506  पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 13 हजार 660 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 671 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 175 इतकी आहे.

00000

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 12 हजार 948 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


 

   कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 473 प्राप्त अहवालापैकी 994 निगेटिव्ह तर 368 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, 95 अहवाल प्रलंबित आहेत तर 15 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 678 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 605 तर 73 पॉझीटिव्ह (73 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 199 पॉझीटिव्ह आले असे एकूण 640 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 21 हजार 723 पॉझीटिव्हपैकी 12 हजार 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 121 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 640 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, चंदगड-6, गडहिंग्लज-11, गगनबावडा-1, हातकणंगले- 94, कागल-24, करवीर-69, पन्हाळा- 36, राधानगरी- 21, शाहूवाडी-11,  शिरोळ- 38, नगरपरिषद क्षेत्र- 99, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 207 व इतर शहरे व राज्य 21 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-331, भुदरगड- 452, चंदगड- 502, गडहिंग्लज- 497, गगनबावडा- 44, हातकणंगले-2545, कागल- 520, करवीर-2424, पन्हाळा- 727, राधानगरी- 583, शाहूवाडी- 488, शिरोळ- 1123, नगरपरिषद क्षेत्र-4090, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 6821 असे एकूण  21  हजार 147 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 576 असे मिळून एकूण 21 हजार 723 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 21 हजार 723  पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 12 हजार 948 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 654 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 121 इतकी आहे.

0000000

सीपीआरमध्ये बेडची क्षमता वाढवा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत साधला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क

 



कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड केअर सेंटरमध्ये गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण अत्यवस्थ झाल्यास, अशा रुग्णांना सीपीआरमध्ये बेड उपलबध होणे गरजेचे आहे. यासाठी सीपीआरमध्ये बेडची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नॉन कोव्हिड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील  वाढती कोरोना रुग्ण संख्या, उपलब्ध बेड,  खासगी हॉस्पिटल आणि करण्यात येत असलेले उपचार या बाबतचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे उपस्थित होते.

            ग्रामविकास मंत्री म्हणाले, गेले पाच महिने शासन व प्रशासन कोरोना साथीशी लढा देत आहे. कोरोना रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी कोव्हिड केअर सेंटर प्रत्येक तालुक्यात सुरु केले आहे. कोव्हिड केअर सेंटरवर उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य असतात. या सेंटरवरील कोरोना रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अशा रुग्णास सीपीआरकडे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. अशा रुग्णास बेड उपलब्ध व्हावा यासाठी सीपीआरमध्ये बेडची संख्या वाढविण्यास प्राधान्य द्यावे.

            श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याने नॉन कोव्हिड रुगणांची गैरसोय होत आहे. यासाठी प्रशासनाने नॉन कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी पर्यायी व्यवस्था करावी. कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेची बाब असली तरी कोरोना साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासन चांगले काम  करत आहे.  प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन ते शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतले जातील. वाढती रुग्ण संख्या विचारात घेता लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावीत. रेमडिसीव्हीर आणि पीपीई कीट याबाबतचा आढावाही ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतला.

            ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ऑक्सिजन पुरवठादारांशी चर्चा करुन पुरवठा सुरळीत ठेवावा. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बेड वाढविण्याबरोबर खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी सूचना देण्यात यावी, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयामध्ये यापूर्वी असलेले बेड व नंतर वाढविण्यात आलेले बेड याबाबतचा आढावा घ्यावा.

            जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या, उपचार घेत असलेले रुग्ण, डिस्चार्ज झालेले रुग्ण, जिल्ह्यातील उपलब्ध बेड, खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेड याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी सीपीआरमध्ये आणि इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात बेड वाढविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यास दररोज किमान 10 केएल ऑक्सिजनचा पुरवठा पुणे येथून व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

10 केएल ऑक्सिजनच्या पुरवठ्याबात ग्रामविकास मंत्र्यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन

   कोल्हापूर जिल्ह्यासाठी  दररोज 10 केएल ऑक्सिजनचा पुरवठा पुणे येथून व्हावा, या मागणीसाठी  ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बैठकीतूनच फोन लावला. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी 10 केएल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत आयुक्तांना सूचना दिल्या. त्याबरोबरच एसडीआरएफ आणि एनएचएम मधून निधी तात्काळ मिळण्याबाबत आरोग्य सचिवांनाही फोनवरुन सूचना दिली. नियोजनचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनाही फोनवरुन संपर्क साधून जिल्हा नियोजन निधीबाबत चर्चा केली.

0000000

 

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 12 रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 



 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली.

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 10 ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आज झाला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, खासदार, आमदार अनेकजण होतात. प्रत्येकाला वारसा, परंपरा असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची परंपरा खासदार संजय मंडलिक पुढे चालवित आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. दररोज केवळ आरोग्यावरच आपले काम सुरु आहे. विकासाचे मार्गक्रमण करत आहोत. जिल्ह्यासाठी सदृढ आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या सेवा ग्रामीण भागात करायच्या आहेत.

आजही आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून आपण दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु कक्षात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. याचा उपयोग कायम स्वरुपी यंत्रणा उभी करताना करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्गम भागात सेकंड ओपिनिएन हवे असेल, तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल तर मुंबई पुण्याचाच नाही तर जगभरातील तज्‌ज्ञांची सेवा टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येईल.  पुढील महिन्यात चेस द व्हायरसचा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 55 वर्षावरील सर्व नागरिकांची यात तपासणी करण्यात येणार असून ज्यांना ह्दयरोग, किडनीचे किंवा इतर आजार आहेत त्यांच्यावर या अंतर्गत उपचार करण्यात येईल.

महाराष्ट्र हा लढवय्या आहेच. मनाने आणि विचारांनी सदृढ आहे. या महाराष्ट्राला आपण सर्वजण मिळून आरोग्याच्या दृष्टिने सदृढ महाराष्ट्र घडवूया, स्वयंशिस्तीने एकमेकांची काळजी घेऊन, परस्पर सहकार्याने काम करुन कोरोनाला नक्की हरवू या असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ग्रामीण भागातील वंचित घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. तिच परंपरा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पुढे जोपासली आहे. चंदगडमध्ये ट्रॉमा सेंटर मंजूर केले आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तो मार्गी लावावा. एनएचएम मधून प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी निधी मिळावा आणि फिजीशिएनना कायमस्वरुपी सेवेत घेणेबाबत मार्ग काढवा अशी मागणी त्यांनी केली.

आमदार प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती दिनानिमित्त सदाशिवराव मंडलिक इरिगेशन डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन मार्फत देण्यात येणारा स्मृती गौरव पुरस्कार रद्द करुन पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्थानिक विकास निधी आणि मित्र परिवार व विविध औद्योगिक संस्थानी केलेली मदत अशा निधीतून ग्रामीण भागातील रुग्णालयांना सुविधा देत सक्षम केले आहे. याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

आमदार राजेश पाटील म्हणाले, दुर्गम, डोंगराळ भागात असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तिन्हीसाठी गडहिंग्लज येथील उप जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढवावी. ट्रामा केअर सेंटरच्या जागेचा प्रश्नही मार्गी लावावा. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील कागल, मुरगुड, राधानगरी, गारगोटी, सोळांकूर, आजरा, चंदगड, नेसरी, गगनबावडा व खुपिरे ही दहा ग्रामीण रुग्णालये आणि गडहिंग्लज व वळीवडे या दोन उप जिल्हा रुग्णालयांचा कायापालट करण्याचे काम फौंडेशनने केले आहे. याचा लाभ या भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी होणार आहे.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून नागरिक आले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली.  जिल्ह्यात 45 कोव्हिड काळजी केंद्र आणि 2 समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 कोटीचा निधी खर्च केला आहे. यात प्रामुख्याने  सर्वात आधी लॅब उभी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. प्रारंभी सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांर्गत 12 रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांबाबतची चित्रफित दाखविण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, रामहरी भोसले उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी आभार मानले.

000000

 

गगनबावडा तालुक्यात 11.50 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 11.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- निरंक (468.25), शिरोळ- निरंक (369), पन्हाळा- 3.43 (1423), शाहूवाडी- 5.83 (1761.50), राधानगरी- 2.83 (1853.50), गगनबावडा- 11.50 (4675.50), करवीर- 0.45 (998.36), कागल- निरंक (1188.71), गडहिंग्लज- 1.43 (842.71), भुदरगड- 1.60 (1417.80), आजरा- 8 (2054.75), चंदगड- 6 (2040.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.

पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.

        कागल तालुक्यातील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी मार्गे वाहतूक सुरु.

00000

6 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400; अलमट्टीतून 49422 क्युसेक विसर्ग सुरू

 


 

            कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 230.27 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 तर अलमट्टी धरणातून 49422 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 6 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 98.25 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 122.308 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 96.79 दलघमी, वारणा 930.63 दलघमी, दूधगंगा 705.21 दलघमी, कासारी 76.99 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 72.22 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 42.63 दलघमी, चित्री 53.385 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  42.222  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.9 फूट, सुर्वे 18 फूट, रुई 45 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 41.6 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 32.3 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 9  फूट व अंकली 12.9 फूट अशी आहे.

0000000

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 12 हजार 277 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 

   कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 223 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 730 निगेटिव्ह तर 376 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (3 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, 100 अहवाल प्रलंबित आहेत तर 14 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 540 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 466 तर 74 पॉझीटिव्ह (73 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 285 पॉझीटिव्ह आले असे एकूण 735 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 21 हजार 83 पॉझीटिव्हपैकी 12 हजार 277 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 172 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 735 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-14, चंदगड-4, गडहिंग्लज-20, गगनबावडा-3, हातकणंगले- 153, कागल-49, करवीर-81, पन्हाळा- 39, राधानगरी- 24,  शिरोळ- 38, नगरपरिषद क्षेत्र- 73, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 216 व इतर शहरे व राज्य 18 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-329, भुदरगड- 452, चंदगड- 496, गडहिंग्लज- 486, गगनबावडा- 43, हातकणंगले-2451, कागल- 496, करवीर-2355, पन्हाळा- 691, राधानगरी- 562, शाहूवाडी- 477, शिरोळ- 1085, नगरपरिषद क्षेत्र-3991, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 6614 असे एकूण 20 हजार 528 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 555 असे मिळून एकूण 21 हजार 83 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 21 हजार 83 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 12 हजार 277 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 634 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 172 इतकी आहे.

0000000

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 11 हजार 904 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 

   कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 703 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 285 निगेटिव्ह तर 402 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (16 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 505 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 445 तर 60 पॉझीटिव्ह (87निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 335 पॉझीटिव्ह आले असे एकूण 797 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 20 हजार 348 पॉझीटिव्हपैकी 11 हजार 904 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7 हजार 839 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 797 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-24, चंदगड-9, गडहिंग्लज-15, गगनबावडा-1, हातकणंगले- 79, कागल-36, करवीर-82, पन्हाळा- 32, राधानगरी- 48, शाहूवाडी-19, शिरोळ- 35, नगरपरिषद क्षेत्र- 100, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 277 व इतर शहरे व राज्य 37 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-326, भुदरगड- 438, चंदगड- 492, गडहिंग्लज- 466, गगनबावडा- 40, हातकणंगले-2298, कागल- 447, करवीर-2274, पन्हाळा- 652, राधानगरी- 538, शाहूवाडी- 477, शिरोळ- 1047, नगरपरिषद क्षेत्र-3918, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 6398 असे एकूण 19 हजार 811 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 537 असे मिळून एकूण 20 हजार 348 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 20 हजार 348 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 11 हजार 904 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 605 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 7 हजार 839 इतकी आहे.

0000000

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.

पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.

        कागल तालुक्यातील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी मार्गे वाहतूक सुरु.

00000

 

18 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400; अलमट्टीतून 164422 क्युसेक विसर्ग सुरू

 

 

            कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 232.91 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 तर अलमट्टी धरणातून 164422 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कासारी नदीवरील- पुनाळ-तिरपण,  ठाणे आवळे व यवलूज, वारणा नदीवरील-चिंचोली, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, असे एकूण 18 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 96.87 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 122.262 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 95.91 दलघमी, वारणा 923 दलघमी, दूधगंगा 702.16 दलघमी, कासारी 76.99 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 72.92 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 42.39 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  44.170  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 23 फूट, सुर्वे 22.10 फूट, रुई 53.9 फूट, इचलकरंजी 51.6 फूट, तेरवाड 51 फूट, शिरोळ 45 फूट, नृसिंहवाडी 46.6 फूट, राजापूर 33.6 फूट तर नजीकच्या सांगली 13.6  फूट व अंकली 18.5 फूट अशी आहे.

0000000


शाहूवाडी तालुक्यात 6.67 मिमी पाऊस

 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात 6.67 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 0.13 (468.13), शिरोळ- 0.00 (369), पन्हाळा- 2 (1418.29), शाहूवाडी- 6.67 (1752.83), राधानगरी- 1.17 (1850.33), गगनबावडा- 5 (4656), करवीर- 0.00 (997.91), कागल- 0.29 (1188.71), गडहिंग्लज- 0.71 (840.86), भुदरगड-0.40 (1416.20), आजरा- 3.75 (2046.75), चंदगड- 1 (2034.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

खासगी रुग्णालयात बेडची क्षमता वाढवा जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा आदेश

 

 



कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय)- शहर परिसरातील खासगी रुग्णालयांनी बेडची क्षमता वाढवावी, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज संयुक्तपणे दिला आहे. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांनाही याचप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

   जिल्हाधिकारी श्री देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने दिलेल्या आदेशात म्हटले आहे, शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील ८०% बेड कोव्हीड-१९ आणि सर्वसाधारण रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आणि महामारी रोग अधिनियम, १८९७ मधील तरतुदीनुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सोबतच्या सर्व खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी आपली क्षमता व्हेंटीलेटर, एन आय व्ही, अतिरिक्त ऑक्सीजनेट बेड आणि अतिदक्षता विभाग वैद्यकीय साधनसामग्रीसह आठवड्याभरात वाढवावी.  रुग्णालयात कोविड उपचार सुविधा काटेकोरपणे देण्यास निर्देशित करण्यात येत आहे.

 सोबत परिशिष्ट अ मधील स्तंभ ३ ते ७ मध्ये नमूद केलेल्या विद्यमान क्षमतेपेक्षा अधिक क्षमता वाढवावी. या आदेशानुसार रुग्णालयांनी अतिरिक्त कोविड उपचार सुविधा निर्माण करण्यासाठी स्वत: च्या निधीचा वापर करावा. उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ (१८६० च्या ४५) नुसार रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल. तसेच नर्सिंग कायद्यांतर्गत रुग्णालयांची नोंदणीही  रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी परिशिष्ट अ मधील स्तंभ १२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना कारवाईचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

000000

आजअखेर 11 हजार 207 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 

   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 823 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 259 निगेटिव्ह तर 369 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (190 अहवाल प्रलंबित, 5 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 623 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 522 तर 101 पॉझीटिव्ह (69 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), असे एकूण 470 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 19 हजार 551 पॉझीटिव्हपैकी 11 हजार 207 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7 हजार 755 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 470 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-6, भुदरगड-12, चंदगड-2, गडहिंग्लज-9, हातकणंगले-103, कागल-33, करवीर-62, पन्हाळा- 7, राधानगरी- 11, शाहूवाडी-4, शिरोळ- 62, नगरपरिषद क्षेत्र- 40, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 110 व इतर शहरे व राज्य 9 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-323, भुदरगड- 414, चंदगड- 483, गडहिंग्लज- 451, गगनबावडा- 39, हातकणंगले-2219, कागल- 411, करवीर-2192, पन्हाळा- 620, राधानगरी- 490, शाहूवाडी- 458, शिरोळ- 1012, नगरपरिषद क्षेत्र-3818, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 6121 असे एकूण 19 हजार 51 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 500 असे मिळून एकूण 19 हजार 551 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 19 हजार 551 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 11 हजार 207 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 589 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 7 हजार 755 इतकी आहे.

0000000