इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

जिल्ह्यात 8 लाख 44 हजार जणांनी घेतला पहिला डोस

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 44 हजार 305 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 40 हजार 191 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 20 हजार 302 जणांनी दुसरा डोस घेतला.  50 हजार 775 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 17 हजार 465 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 66 हजार 948 नागरिकांनी पहिला डोस तर 25 हजार 310 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 86 हजार 391 नागरिकांनी पहिला डोस तर 57 हजार 342 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 44 हजार 305 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 20 हजार 419 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

00000

 

 

 

आजअखेर 56 हजार 359 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2716 प्राप्त अहवालापैकी 2201 अहवाल निगेटिव्ह तर 417 अहवाल पॉझिटिव्ह (98 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1351 प्राप्त अहवालापैकी 1001 अहवाल निगेटिव्ह तर 350 अहवाल पॉझिटिव्ह (तर 138 आरटीपीसीआरला पाठवले). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1174 प्राप्त अहवालापैकी 691 निगेटिव्ह तर 483 पॉझीटिव्ह  असे एकूण 1250 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 39 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 67 हजार 975 पॉझीटिव्हपैकी 56 हजार 359 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9359 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1250 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-117, भुदरगड-31, चंदगड-16, गडहिंग्लज-112, गगनबावडा-6, हातकणंगले-66, कागल-21,  करवीर-164, पन्हाळा-70, राधानगरी-33, शाहूवाडी-5, शिरोळ-64, नगरपरिषद क्षेत्र-107 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 303, इतर जिल्हा व राज्यातील-135 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1409, भुदरगड- 1719, चंदगड- 1465, गडहिंग्लज- 2151, गगनबावडा- 244, हातकणंगले-6911, कागल-2055, करवीर-7749, पन्हाळा- 2557, राधानगरी- 1519, शाहूवाडी-1799, शिरोळ- 3450, नगरपरिषद क्षेत्र-9440, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 21 हजार 695 असे एकूण  64 हजार 163 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 3 हजार 812 असे मिळून एकूण 67  हजार 975  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 67 हजार 975 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 56 हजार 359 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 257 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9359 इतकी आहे.

0000000

 

 

 

जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे आज प्रायोगिकतत्वावर लसीकरण -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 



कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :   जिल्ह्यात  18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे प्रायोगिकतत्वावर पाच केंद्रावर लसीकरण उद्या 1 मे पासून सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

  कोवीड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या नुसार कोल्हापूर जिल्ह्यात प्रायोगिकतत्वावर ग्रामीण रुग्णालय शिरोळ, वसाहत रुग्णालय गांधीनगर,  ग्रामीण रुग्णालय, कागल, प्राथमिक आरोग्यकेंद्र भेडसगांव, ता. शाहुवाडी आणि भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर  या पाच केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

या केंद्रावर करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी मर्यादित स्वरुपाची       असून प्रति दिवस २०० लाभार्थी इतकी आहे. प्रायोगिक तत्वावरील लसीकरण केंद्र ७ मे २०२१ पर्यंत सुरु राहणार आहेत. 

लसीकरण केंद्रावर १८ ते  ४४ वयोगटातील नागरिकांनी येताना  केंद्र शासनाच्या cowin portal वर ऑनलाईन नोंदणी करुन ऑनालाईन भेट निश्चीत (तारीख व वेळ ) झाल्यावर निवडलेल्या लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे.  सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेवून यावे.  ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन भेट निश्चित नसलेल्या नागरिकांना या पाच केंद्रावर लस दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.  

00000

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे प्रायोगिक तत्वावरील लसीकरणास 1 मे पासून शुभारंभ

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने घोषित केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. 1 मे 2021 रोजी प्रायोगिक तत्वावर ग्रामीण रूग्णालय शिरोळ, वसाहत रूग्णालय गांधीनगर, ग्रामीण रूग्णालय कागल, प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव, ता. शाहूवाडी व भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर कोल्हापूर या पाच शासकीय संस्थेच्या ठिकाणी 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करून शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येताना केंद्र शासनाच्या cowin portal वर ऑनलाईन नोंदणी करून ऑनलाईन भेट निश्चित (तारीख व वेळ) झाल्यावर निवडलेल्या लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आहे. येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेवून यावे. ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन भेट निश्चित नसल्यास नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. ऑनलाईन नोंदणी करताना नागरिकांनी 18 ते 44 या वयोगटाची निवड करून नोंदणी करायची आहे. ऑनलाईन नोंदणी मर्यादित स्वरूपाची (200 लाभार्थी प्रति दिवस) आहे. ही प्रायोगिक तत्वावरिल लसीकरण केंद्र पुढील 7 दिवस (दि. 7 मे 2021 पर्यंत) वर नमुद केलेल्या 5 ठिकाणी सुरू राहणार आहे, अशी माहितीही जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

00000

जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी 17 कोटी 94 लाखाचा निधी मंजूर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 363 आरोग्य उपकेंद्रांसाठी जवळपास 17 कोटी 94 लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आरोग्य सेवेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी या उपकेंद्रांची डागडूजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटी सही मजबूत करणे यासाठी हा निधी प्राप्त झाला असल्याचे आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाचा मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील सर्व घटकांनी जबाबदारीने काम केले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे यांनी सक्षमपणे आपली भूमिका आणि जबाबदारी सांभाळली होती आणि ती आजही सांभाळत आहेत. या उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याबरोबरच आरोग्याबाबतच्या सर्वेक्षणाचे कामसुध्दा जबाबदारीने पार पाडले गेले आहे. एकुणच आरोग्य उपकेंद्रे यांची गरज कोरोना महामारीच्या काळात प्रभावीपणे जाणवली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणखीन मजबूत करणे गरजेचे आहे, असेही शेवटी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी सांगितले.

000000

 

 

 

 

 

 

सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतक-यांना आवाहन

 


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): खरीप हंगामामध्ये सोयाबीण पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरात येते.  शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल.  मागील दोन वर्षात शेतक-यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

 प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्कयांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी ७ फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्‍यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ कलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे.७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे .पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.

000000

अटल वयो अभ्युदय योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): ज्येष्ठ नागरिकांसाठी सन 2021-22 अंतर्गत केंद्र पुरस्कृत अटल वयो अभ्युदय योजनेसाठी ई-अनुदान पोर्टलव्दारे खुली अधिसूचना आणि ई-अनुदान पोर्टलव्दारे अर्ज मागविले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारतर्फे 30 मे पर्यंत अर्जासाठी ई-अनुदान प्रणाली सुरू होणार आहे. इच्छुक संस्थांनी वृध्दाश्रम स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाच्या https://grants-msje.gov.in/ngo-login (ई-अनुदान प्रणाली)Scheme-atalVayoAbhyudayYojna (AVYAY) या प्रणालीवर आपले परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

25 लाभार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वृध्दाश्रमांची देखभाल. 50 लाभार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वृध्दाश्रमांची देखभाल, 50 वृध्द महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वृध्दाश्रमांची देखभाल. अल्झाईमर रोग/डिमेंशियाग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी संलग्न केअर होम आणि वृध्दाश्रमांची देखभाल, प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्राची देखभाल, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईल मेडिकेअर युनिटची देखभाल (फक्त चालू प्रकल्प) व ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी क्लिनिक (केवळ चालू प्रकल्प) या प्रकल्पांतर्गत या योजना अंमलात येणार आहेत.

00000

सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना 15 मे पर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


 

 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात देण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 मे 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पासून ते दिनांक 15 मे 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

            सदर आदेशाचा अंमल तात्काळ करणेचा आहे. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

00000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द - निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत दि. 3 मे रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी दिली.

जिल्हास्तरीय लोकशाही दिन दरमहा पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. सद्या कोरोना संसर्ग अधिक वाढल्याने राज्य शासनाच्यावतीने कोरोना विषाणू (कोविड-19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

0000

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 20 ते 28 एप्रिल या कालावधीत 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

दिनांक 20 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे - श्री हॉस्पीटल-4, सचिन सुपर स्पेशालिटी क्लिनिक-12, सनराईज हॉस्पीटल-8, मेट्रो हॉस्पीटल-6, जानकी नर्सिंग होम-6, स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-8, पल्स हॉस्पीटल-4, मगदूम हॉस्पीटल-6, अंतरग हॉस्पीटल-6, अलायन्स हॉस्पीटल-20, कुडाळकर हॉस्पीटल-6, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-20, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, डी. वाय. पाटील हॉस्पीटल-15, ॲस्टर आधार हॉस्पीटल-20, सिध्दीविनायक हॉस्पीटल-10, नारायणी हॉस्पीटल-6, गंगा प्रकाश हॉस्पीटल-8, गोलपे हॉस्पीटल-4, सिध्दनाथ हॉस्पीटल-4, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-3, अनिश कोव्हिड हॉस्पीटल-4, संजिवनी हॉस्पीटल-6, दत्त साई हॉस्पीटल-6, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-8, माने केअर हॉस्पीटल-4, टुलिप हॉस्पीटल-4, नार्थ स्टार हॉस्पीटल-4, महालक्ष्मी हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-4, महालक्ष्मी हॉस्पीटल-4, श्री सेवा क्लिनिक-4, शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल-6, रत्ना मेडीकेअर सेंटर-6, मंगलमुर्ती हॉस्पीटल-8, संजिवनी हॉस्पीटल-6, सरस्वती मेडीसिटी हॉस्पीटल-6, कर्निक हॉस्पीटल-2, कानडे हॉस्पीटल-4, अशोका हॉस्पीटल-2, मेट्रो हॉस्पीटल-3 असे एकूण 279 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

दिनांक 22 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे – गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी-6, शरंन्या हार्ट केअर नर्सिंग होम-8, जानकी नर्सिंग होम-8, के.पी.सी. हॉस्पीटल-8, सिटी हॉस्पीटल-6, महालक्ष्मी हॉस्पीटल-8, मुधळे नर्सिंग होम-6, विजय हॉस्पीटल-4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-8, सिध्दीविनायक हॉस्पीटल-4, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-6, ॲस्टर आधार हॉस्पीटल-6, सिध्दनाथ हॉस्पीटल-6, कर्निक हॉस्पीटल-4, अॅपेक्स हॉस्पीटल-6, श्री दत्त  हॉस्पीटल-6, सरस्वती हॉस्पीटल-6, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, स्वास्तिक हॉस्पीटल-6, नारायणी हॉस्पीटल-6, मोरया मल्टीसिटी हॉस्पीटल-4, आश्विनी हॉस्पीटल-4, आशिर्वाद क्लिनिक-2, अंलायन्स हॉस्पीटल-16, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-8, माने केअर हॉस्पीटल-6, संजिवनी हॉस्पीटल-4, शतायु  हॉस्पीटल-6, कुडाळकर हॉस्पीटल-4, जे.जे.मगदूम हॉस्पीटल-4, मोरया नर्सिंग होम-4, सिध्दीविनायक हॉस्पीटल-10, विन्स हॉस्पीटल-2, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, प्रकाश फार्मसी-6, हृदय हॉस्पीटल-5, गोलपे हॉस्पीटल-5, दत्त साई हॉस्पीटल-6, स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-5, नार्थ स्टार हॉस्पीटल-3, रत्ना मेडीकेअर सेंटर-4, लाईफलाईन फार्मा-6, ऑरेंट मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, सनराईज हॉस्पीटल-8, डी.वाय. पाटील हॉस्पीटल-8, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-4, सरस्वती मिडीया सिटी हॉस्पीटल-6, टुलिप हॉस्पीटल-4, अथायु हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-2, ॲपेक्स हॉस्पीटल-4, देसाई हॉस्पीटल-6, कामटे हॉस्पीटल-2 हॅटीग्रे हॉस्पीटल-4, हंजी मेडीकेअर-2 असे एकूण 310 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

दिनांक 26 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे –अॅस्टर आधार हॉस्पीटल-20, सिटी हॉस्पीटल-8, डी. वाय. पाटील हॉस्पीटल-14, जानकी नर्सिंग होम -10, अथायू हॉस्पीटल- 14, टुलीप हॉस्पीटल-4, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-12, सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-8, साई कॅड्रिक सेंटर-12, ॲपल सरस्वती हॉस्पीटल- 24, गोलपे हॉस्पीटल-6, गंगा प्रकाश हॉस्पीटल-8, केसरकर हॉस्पीटल-6, श्रावस्ती हॉस्पीटल-12, दत्त साई हॉस्पीटल-8, आनंद नर्सिंग होम-4, सरस्वती मेडी सिटी हॉस्पीटल- 8, आस्था हॉस्पीटल- 8, हृदय हॉस्पीटल-8, संजिवनी हॉस्पीटल-8, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 8, देसाई हॉस्पीटल-6, श्री हॉस्पीटल-2, कुडाळकर हॉस्पीटल-2, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-10, कानडे हॉस्पीटल-4, सनराईज हॉस्पीटल-8, श्री व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-6, अंतरंग हॉस्पीटल-2, सिध्दीगिरी हॉस्पीटल-6, पूर्व पुण्यायी हॉस्पीटल-2, दत्त सहकारी साखर कारखाना-8, मगदूम हॉस्पीटल- 6, सिमंदर जैन मंदिर कोव्हिड केअर सेंटर-8, सिंध्दनाथ हॉस्पीटल-8, महालक्ष्मी हॉस्पीटल- 8, योगी दत्त हॉस्पीटल-6, नारायणी हॉस्पीटल-10, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-8, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-8, मोरया नर्सिंग होम-4, श्री सिध्दी नर्सिंग होम-2, यशवंत धर्मरथ रुग्णालय-2, सुर्या हॉस्पीटल-12, विजय हॉस्पीटल-6, दत्तकृपा हॉस्पीटल-2, मुदळे नर्सिंग होम-6, सिध्दीविनायक हॉस्पीटल-12, मेट्रो हॉस्पीटल-10, विन्स हॉस्पीटल-4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-10 असे एकूण 408 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

दिनांक 27 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे –अशोका हॉस्पीटल-2, कुकरेजा नर्सिंग होम-2, सिध्दनाथ हॉस्पीटल-3, कर्निक हॉस्पीटल-3, के. पी. सी. हॉस्पीटल-4, आशिर्वाद हॉस्पीटल-2, सावित्री सुपर स्पेशालिटी  क्लिनिक-2, अशोक काजवे हॉस्पीटल-5, एस.एम.डी. हॉस्पीटल-2, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-5, केअर हॉस्पीटल-2, चौधरी हॉस्पीटल-4, महात्मा गांधी हॉस्पीटल-4, हेडगेवार रुग्णालय-2, योगी दत्ता हॉस्पीटल-2, आशिर्वाद हॉस्पीटल-2, सिध्दीविनायक हॉस्पीटल-2, घाटगे हॉस्पीटल-4, बर्नले हॉस्पीटल-2, काटकर हॉस्पीटल-4, सरस्वती हॉस्पीटल-2 स्वास्तीक हॉस्पीटल-4, मेट्रो हॉस्पीटल- 3, विन्स हॉस्पीटल-1, ऑरेंज मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, सिटी हॉस्पीटल- 3, विजय हॉस्पीटल-3, कृष्णा हॉस्पीटल-3, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-3, पूर्व पुण्यायी हॉस्पीटल-1, संजिवनी हॉस्पीटल-2, महालक्ष्मी हॉस्पीटल-2, ॲस्टर आधार हॉस्पीटल-4, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 2, गुरुप्रसाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 2, हिरेमठ हॉस्पीटल-2, अथायु हॉस्पीटल-6,  शतयु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, अलांयन्स हॉस्पीटल-12, हृदय हॉस्पीटल-4, घाटगे हॉस्पीटल-2 असे एकूण 125 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

दिनांक 28 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे –अथायु हॉस्पीटल-4, डी.वाय.पाटील हॉस्पीटल-8, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-5, जानकी नर्सिंग होम-5, स्वास्तिक हॉस्पीटल- 6, साई कॉड्रीक हॉस्पीटल-4, ॲस्टर आधार हॉस्पीटल-10, सिटी हॉस्पीटल- 4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, सरस्वती मेडीसिटी हॉस्पीटल-6, सिध्दीविनायक हॉस्पीटल-2, श्री गणेश कोव्हिड हॉस्पीटल-2, हिरेमठ हॉस्पीटल-4, दत्त सहकारी साखर कारखाना-4, संजीवन हॉस्पीटल-5, एस.एम.डी. हॉस्पीटल-2, चौधरी हॉस्पीटल-4, शतायु हॉस्पीटल-4, माने केअर हॉस्पीटल-5, आशिर्वाद क्लिनिक-4, केअर हॉस्पीटल-2, सार्थिकी कोव्हिड सेंटर-2, आशिर्वाद हॉस्पीटल-2, अशोक काजवे हॉस्पीटल-3, जे. जे. मगदूम हॉस्पीटल-4, कुंभार हॉस्पीटल-2, अनीश हॉस्पीटल-2, सरस्वती हॉस्पीटल-2, सुशिल डिस्ट्युबिटर्स-2,  मुदळे नर्सिंग होम-2, व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-2, श्री व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-2, रत्ना मेडिकेअर सेंटर-2, शरंन्या हार्ट केअर नर्सिंग होम -2, सिमंदर जैन मंदिर कोव्हिड केअर सेंटर-2, श्री दत्त हॉस्पीटल-2, अशोका मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, महालक्ष्मी हॉस्पीटल-2, सरस्वती हॉस्पीटल-2, साई नर्सिंग होम-2, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, पल्स हॉस्पीटल-2, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, ऑरेंज हॉस्पीटल-2, ॲपेक्स  हॉस्पीटल-2, श्री सिध्दी नर्सिंग होम-2, कामटे हॉस्पीटल-2 असे एकूण 192 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. असे एकूण 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार-निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय):  कोरोना विषाणूमुळे यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ हा कार्यक्रम राज्यात अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री  सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या समारंभास जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.

00000

करवीर तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटर साहित्यात कोणताही गैरप्रकार नाही; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): यापुर्वी बंद करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य जवळच्या आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. राजर्षि छ. शाहू विद्यानिकेतन  शिंगणापूर येथे कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य बालिंगा येथील आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे सर्व साहित्य कोव्हिड केअर सेंटरचे आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. त्यामुळे कोव्हिड केअर सेंटरवरील साहित्यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही असे स्पष्टीकरण करवीर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहे.

करवीर तालुक्यात कोव्हिड-19 चे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने मागील वर्षी राजर्षि छ. शाहू विद्यानिकेतन, के. आय.डी. कॉलेज बॉईज होस्टेल गो. शिरगांव, भोगावती महाविद्यालय कुरुकली, डी.सी.नरके विद्यानिकेतन कुडीत्रे येथे कोव्हिड केअर सेंटर चालू करण्यात आले होते. डिसेंबर नंतर कोव्हिड-19 रुग्णांचे प्रमाण कमी आल्यानंतर टप्प्याटप्याने कोव्हिड केअर सेंटर बंद करण्यात आले संबंधित सर्व ठिकाणी विद्यार्थ्याचे  वसतिगृह असल्याने कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य रिकामे करणे आवश्यक होते. बंद करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य करवीर तालुक्यातील जवळच्या प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र याठिकाणी ठेवण्यात आले होते जेणेकरुन भविष्यात पुन्हा कोव्हिडची लाट आल्यास कोव्हिड सेंटर चालू करता येईल, असेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

00000

औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक पोर्टलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले.

 याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई,‍ नियोजन व वित्त राज्य मंत्री शंभुराज देसाई, उद्योग राज्य मंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, Industry Associate चे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगि क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/ राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग  जगतास या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.

जिल्ह्यामधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करुन राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे.

00000

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

जिल्ह्यात 8 लाख 22 हजार जणांनी घेतला पहिला डोस

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 22 हजार 002 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 39 हजार 987 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 19 हजार 993 जणांनी दुसरा डोस घेतला.  48 हजार 898 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 16 हजार 536 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 53 हजार 851 नागरिकांनी पहिला डोस तर 21 हजार 118 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 79 हजार 266 नागरिकांनी पहिला डोस तर 50 हजार 303 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 22 हजार 002 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 08 हजार 020 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

00000

 

 

आजअखेर 55 हजार 175 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2169 प्राप्त अहवालापैकी 1625 अहवाल निगेटिव्ह तर 487 अहवाल पॉझिटिव्ह (57 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1175 प्राप्त अहवालापैकी 1057 अहवाल निगेटिव्ह तर 158 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1000 प्राप्त अहवालापैकी 676 निगेटिव्ह तर 324 पॉझीटिव्ह  असे एकूण 969 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 32 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 65 हजार 603 पॉझीटिव्हपैकी 55 हजार 175 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8250 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 969 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-39 भुदरगड-53, चंदगड-19, गडहिंग्लज-19, गगनबावडा-2, हातकणंगले-64, कागल-54,  करवीर-118, पन्हाळा-17, राधानगरी-11, शाहूवाडी-9, शिरोळ-95, नगरपरिषद क्षेत्र-73, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 312 इतर जिल्हा व राज्यातील- 84 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1279, भुदरगड- 1669, चंदगड- 1434, गडहिंग्लज- 2020, गगनबावडा- 228, हातकणंगले-6715, कागल-2012, करवीर-7420, पन्हाळा- 2439, राधानगरी-1474, शाहूवाडी-1781, शिरोळ- 3235, नगरपरिषद क्षेत्र-9232, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 21 हजार 079 असे एकूण  62 हजार 017 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 3 हजार 586 असे मिळून एकूण 65  हजार 603  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 65 हजार 603 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 55 हजार 175 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 178 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8250 इतकी आहे.

0000000

रूग्णालयांना अविरत ऑक्स‍िजन होण्याकरिता पुरवठा साखळीचे संनियंत्रण करण्यासाठी समिती गठीत -जिल्हाधिकारी दौलत देसाई


 

 

कोल्हापूर दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हयामध्ये कोव्हीड -19 विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून  जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेल्या CCC / DCHC / DCH या ठिकाणी ऑक्स‍िजन पुरवठा समन्वय व नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर संनियंत्रण समिती व समन्वय अधिकारी व  सहाय्यक तालुकानिहाय नियंत्रण अधिकारी यांची  नियुक्ती करण्यात येत आहे.  कोव्हीड -19 रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हयातील ऑक्स‍िजन उत्पादक, रिफिलींग वितरक व अन्य ठिकाणाहून ऑक्स‍िजन आणुन वितरित करणारे / रिफिलींग करणारे वितरक यांचे सनियंत्रण  पुरवठा साखळीवर कडक नियंत्रण ठेवण्याकरिता ऑक्स‍िजन पुरवठा सुरळीत राहण्याकरिता  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मुख्य नियंत्रण अधिकारी, संपर्क कक्ष प्रमुख व समन्वय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

मुख्य नियंत्रण अधिकारी

नियुक्तीचे पदनाम

पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या व कामकाज

श्री किशोर पवार,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर

मो.नं. 9822596979

मुख्य नियंत्रण अधिकारी

जिल्हयातील सर्व ऑक्सिजन उत्पादक, उद्योग यांचेकडील ऑक्सिजन साठा वितरण व जिल्हयातील सर्व रूग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पुरवठयावर नियंत्रण करणे.

 

 

श्री भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर

मो.नं. 9689993035

 

सहाय्यक-

श्रीमती अर्चना कुलकर्णी

ना.तह.निवडणूक

 

1.श्री आदित्य कांबळे , अ.का.

 

2. श्रीमती रिमा गणपत्ये, अ.का.

 

3. श्री गजानन कुरणे, म.सहा.

 

4. श्री रोहिदास ढगे, म.सहा.

 

संपर्क कक्ष प्रमुख(जिल्हाधिकारी कार्यालय)

1) जिल्हयातील सर्व ऑक्सिजन उत्पादक, उद्योग यांचेकडील ऑक्सिजन साठा वितरण याची माहिती संकलित करणे व मा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांना सादर करणे.

2)CCC, DCH, DCHC  व खाजगी रुग्णालय यांचेकडून ऑक्सिजन मागणी विषयी नियुक्त समन्वय समितीशी संपर्क करून मागणी निश्चित करणे.

3) जिल्हा कंट्रोल रुम या ठिकाणी रुग्णालयाकडून येणारे ऑक्सिजनची मागणी एकत्रित करून पुरवठादारामार्फत वितरण विषयक नियोजन करणे.

4) जिल्हयातील ऑक्सिजन वापर, मागणी व पुरवठा यामध्ये कमतरता असल्यास संबंधित समन्वय समितीमार्फत मागणी करणे.

5)Daily Oxygen Report जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांना सादर करणे.

 

तसेच खालील प्रमाणे नोडल अधिकारी व सहाय्यक अधिकारी /कर्मचारी  म्हणून कामकाज करणेसाठी खालील प्रमाणे नियुक्ती करणेत येत आहे.

                                                                                                                                                                               

अधिकारी यांचे नाव

नियुक्तीचे पदनाम

पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या व कामकाज

 

श्री दत्तात्रय कवितके,

उपजिल्हाधिकारी पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

मो.नं. 9422087077

 

नोडल ऑफिसर

1) जिल्हयातील सर्व ऑक्सिजन उत्पादक, उद्योग  याठिकाणी या आदेशामध्ये नमुद केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत संनियंत्रण करणे.

2)  सदर उदयोगामार्फत ऑक्सिजनच्या मागणी प्रमाणे केल्या जाणाऱ्या पुरवठयाचे नियंत्रण करणे.

3) उदयोगांना LMO चा सतत पुरवठा राहील याबाबत बेल्लारी येथील संपर्क अधिकारी यांचेशी समन्वय करून नियोजन करणे. 

                                                                                                               

अ.क्र.

 

ऑक्सीजन निर्मीत / ऑक्सीजन सिलेंडर भरणारे कारखान्याचे नांव

पर्यवेक्षन अधिकारी यांचे नाव

24 X 7 सदर कारखान्यावर लक्ष्य ठेवणेसाठी प्रत्येकी 8 तास प्रमाणे कारखाना स्थळावर उपस्थीत राहून आदेशा नमुद सूचनेप्रमाणे नियंत्रण ठेवणे व पर्यवेक्षन अधिकारी यांना अहवाल सादर करणे

कामाची वेळ

1.

कोल्हापूर ऑक्सीजन & असीटीलीन प्रा.लि. डी-30, पंचतारांकीत एमआयडीसी, कागल, कोल्हापूर.  श्री.आर.एम.गावडे

9422045716

1. श्री शिवाजी गवळी,

निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, कागल

मो.नं. 8390387206

 

2. श्री.सुधाकर जमादार, क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर

मो.नं.8208763736

श्री विनोद पाटील, अ.का. कार्या. 5 रो.ह.यो., जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

स.7.00 ते  दु.3.00

श्री बाळासाहेब कागलकर, लिपीक, ग्रा.पं. 12/5 , जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

दु.3.00 ते रा.10.00

श्री बबन पटकारे, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

रा.10.00 ते स.7.00

2.

के इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि., डी-30, शिरोली, शिरोली एमआयडीसी,  ता.हातकणंगले, कोल्हापूर

श्री.वाय.जे.चौधरी

9881491680

1. श्रीमती एस. ए. कोळी, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, हातकणंगले

मो.नं. 9421247158

 

2. श्री.विकास माने,

  क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर

9689939187

श्री संतोष महाडेश्वर, अ.का. कार्या. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

स.7.00 ते  दु.3.00

 श्री निलेश दिवसे, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

मो.नं.

 

दु.3.00 ते रा.10.00

श्री उल्हास कांबळे, अ.का. कार्या. 7 करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

रा.10.00 ते स.7.00

3.

मे.धवल गॅसेस, गेट नं. 715, मिळकत नं.5 ,नागांव, एम.आय.डी.सी.जवळ, शिरोली , कोल्हापूर.

श्री.रोहण घोटगे

8149957172

श्री संजय वेसणेकर, अ.का. कार्या.1 आस्था., जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

मो.नं.

 

स.7.00 ते  दु.3.00

श्री संभाजी पाटील, लिपीक, कार्या. 6 वसुली , जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

दु.3.00 ते रा.10.00

श्री चंद्रकांत यादव, लिपीक, कार्या. 12/5 ग्रा.पं.शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

रा.10.00 ते स.7.00

4.

देवी इडस्टी्रयल गॅसेस प्रा.लि. प्लॉट नं. एच.10, एमआयडीसी, गोकुळ शिरगांव  ता.करवीर

 

1. श्री. पी. आर. आरगे, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, करवीर

मो.नं. 9423042683

 

2. श्री.बालाजी बरबडे,    क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर

9673451115

 श्री सुरेश बन्ने, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

स.7.00 ते  दु.3.00

श्री प्रकाश दावणे, लिपीक, कार्या. 6‍ब ना.ऑ. जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

दु.3.00 ते रा.10.00

श्री शैलेश उंडाळे, अ.का. कार्या. 7 करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

रा.10.00 ते स.7.00

5.

महालक्ष्मी ऑक्सीजन, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव

9326789380

1. मनोजकुमार ऐतवडे, नायब तहसिलदार, राधानगरी उप. वि. अ. कार्यालय, राधानगरी

मो.नं. 9130833514

 

2. श्री.बालाजी बरबडे,    क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर

9673451115

श्री बाळु कोथरे, अ.का. कार्या. 7 करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

स.7.00 ते  दु.3.00

श्री धोत्रे, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

दु.3.00 ते रा.10.00

श्री तानाजी जाधव, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

रा.10.00 ते स.7.00

6.

महालक्ष्मी गॅसेस, प्लॉट नं.03 ते 11, पार्वती इडस्ट्रीयल इस्टेट, यड्राव, शिरोळ,कोल्हापूर.

श्री सी.एन.बलदोडा

9923425402

1. संजय काटकर, नायब तहसिलदार, सं.गा.यो. तहसिलदार कार्यालय, शिरोळ

मो.नं. 9823933370

2. श्री.एस.एस.देशमुख, कनिष्ठ अभियंता, जि.प.उप विभाग, बांधकाम विभाग,  पं.स. शिरोळ

7755997835

श्री. राजाराम आरगे, अ.का. कार्या.4 गावठाण, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

स.7.00 ते  दु.3.00

श्री सुधाकर गावित, अव्वल कारकून, कार्या.- 6 गौ.ख. , जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

 

दु.3.00 ते रा.10.00

श्री महेश खेतमर, अ.का. कार्या. 6 स्वा.सै. जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.

रा.10.00 ते स.7.00

सदर सुधारीत आदेशातील नवीन नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियुक्त ठिकाणी उपस्थित होवून पर्यवेक्षन अधिकारी यांना उपस्थिती बाबत अवगत करावे.

सदर नियुक्त केलेल्या संनियंत्रण पथकामधील अधिकारी यांनी खालीलप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडणेच्या आहेत. 

1.      नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी नेमूण दिलेल्या वेळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाज करावयाचे आहे. याबाबत नोडल अधिकारी व जिल्हा संपर्क कक्ष यांचेशी सतत संपर्क ठेवून खालीलप्रमाणे कामकाज करणेचे आहे.

2.      जिल्हयामध्ये नेमणेत आलेल्या पर्यवेक्षन अधिकारी यांचेशी संपर्क करून CCC / DCHC / DCH  या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठा अव्याहत सुरू राहील याची संपूर्ण जबाबदारी व पुरवठादार आणि संबंधित कोव्हीड केंद्र/ रुग्णालये यांचेशी समन्वय ठेऊन ऑक्सीजनचा पुरवठा 24X7 सुरू राहील याची दक्षता घेणे. 

3.      ऑक्सीजन रिफिलर्स ते उत्पादित करित असलेल्या एकूण ऑक्सीजन साठयापैकी 100% ऑक्सीजन साठा हा आत्पकालीन वैदयकीय वापरासाठीच राखीव ठेवणे बंधकारक आहे.

4.      नियुक्त केले पथकाने 100% ऑक्सीजन साठा केवळ वैदयकिय कारणासाठी पुरवठा होत असलेची खात्री करावी. तसेच वैद्यकिय कारणा व्यतीरीक्त अन्य बाबीसाठी ऑक्सीजन पुरवठा होणार नाही याची दक्षता घेणेत यावी. तरीही काराखानदार हे अन्य कारणासाठी ऑक्सीजन पुरवठा करत असलेस अशी बाब इकडील कार्यालयाचे निदर्शनास आणून द्यावी.

5.      ऑक्सीजन उत्पादन कारणाऱ्या व ऑक्सीजन सिलेंडर रिफिलींग करणाऱ्या आस्थापनेमधून ऑक्सीजन पुरवठा कोव्हीड-19 रूग्णांवर वैदयकीय उपचार करणाऱ्या रूग्णालयांना 100% पुरवठा होत आहे किंवा कसे याबाबत तपासणी करणे.

6.      नियुक्त केले पथकाने समन्वय अधिकारी व सहा. तालुका निहाय नियंत्रण अधिकारी यांचेशी संपर्क करून CCC / DCHC / DCH  या ठिकाणी आवश्यक असणारी  पुढील 3 दिवसांची ऑक्सीजनची मागणीची नोंद घेवून ती निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत नोंदवावी व जिल्हयात असलेल्या ऑक्सीजनचा पुरवठा व वापर योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करावी.

7.      प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडील अधिकारी/कर्मचारी यांचे संपर्कात राहून सर्व रूग्णालयांना ऑक्सीजन वाहतूक करणाऱ्या टँकरची वाहतुक सुरळीत, काटेकोरपणे व वेळेवर होईल यांची खात्री करावी.

8.      सदर पथकाने जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती व CCC / DCHC / DCH समन्वय अधिकारी व सहा. तालुका निहाय नियंत्रण अधिकारी यांचेशी संपर्क करून जिल्हयातील ऑक्सीजन पुरवठा  सुरळीत राहील तसेच सर्व कोविड-19 रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा वेळेत होईल याबाबत दक्षता घ्यावी.

9.      सदर नियुक्त पथकाने कारखान्यातून बाहेर ऑक्सीजन पुरवठा होणाऱ्या सिलेंडर कोण कोणत्या दवाखन्यांना कोणत्या वेळी देणेत आले आहे. याबाबतच्या सविस्तर नोंदी नोंदवहीत घेणेत येवून त्याचा दैनंदिन अहवाल नोडल अधिकारी यांचेकडे सादर करणेचा आहे.

या आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेणेत यावी. 

00000