शनिवार, ५ मे, २०१२

शासनाच्या कृषी योजनांत लोकसहभाग वाढला पाहिजे --- कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

   कोल्हापूर दि. 4: राज्य शासनाच्या कृषी योजनांत लोकसहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशा सूचना कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या.
       कृषी व पणन विभागाची आढावा बैठक आज कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. येथील रेसिडेन्सी क्लब येथील सभागृहात ही बैठक      झाली.
       यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयसिंह मंडलिक, माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे आदि उपस्थित होते.
       श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, 'पुढील वर्षापासून शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याचा विचार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा कृषी आराखडा तयार करण्यात येत आहे. खताचे वितरण व्यवस्थित होईल. रेक पाँईटवरुन थेट बांधावर खत पुरवठा होईल याची तयारी करण्यात आली आहे.'
       राज्यात सर्वत्र खरीपांच्या पूर्व तयारीसाठी बैठक घेण्यात आली आहे. त्यामध्ये अतिशय काटेकोरपणे नियोजन करण्यात आल्याचेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी, शेतकर्‍यांनी शेती आणि शेतीमालाच्या विपणन विषयक आपल्या समस्या व मते मांडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.