इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १९ मे, २०१२

शिक्षण प्रगतीचा पाया - उद्योगमंत्री राणे


    कोल्हापूर दि.19: शिक्षण हा प्रगतीचा आणि विकासाचा पाया आहे. त्यामुळे नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे हे राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे, असे प्रतिपादन उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री नारायण राणे यांनी आज केले.
      कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विस्तारीत वास्तूचे उद्‌घाटन व नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम आज श्री. राणे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार वीरकुमार पाटील, छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश साळोखेआदी उपस्थित होते. सिध्दनेर्ली येथील शाळेच्या आवारात हा कार्यक्रम झाला.
      श्री. राणे म्हणाले, धविकास आणि समृध्दी आवश्यक असेल तर शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. आधुनिक समाजाची जडणघडण करण्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाची भूमिका बजावते. शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षकाची जबाबदारी अधिक आहे. कारण शिक्षक हा व्यवसाय नसून तो पेशा आहे.ध
      राज्यातील उद्योग क्षेत्रात गतीने विकास व्हावा यासाठी शासन पावले उचलीत आहे. उद्योगाचा विकास होण्यासाठी शिक्षण, कुशल मनुष्यबळ, मुलभूत, पायाभूत सुविधा यांचा विकास करण्यासाठी शासनाचा भर आहे. राज्याची उद्योगात प्रगती होत असताना राज्यातील लोकांचीही प्रगती होणे अपेक्षित असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.
      गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, शिक्षकांकडे उद्याचा समाज घडविण्याची जबाबदारी आहे कारण सध्याचा विद्यार्थी अतिशय हूशार आहे. तो चौकस आहे. अशा विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. केंद्ग सरकारने शिक्षणाचा अधिकार कायदा मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान आहे.
      यावेळी श्री. विक्रमसिंह घाटगे यांचेही भाषण झाले. प्रा. सुनिल मगदूम यांनी स्वागत केले. कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम यांनी प्रास्ताविक तर एन. के. मगदून यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.