इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

कंटेन्टमेन्ट झोन बाहेरील व्यायामशाळा मार्गदर्शक तत्वानुसार सुरु जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील कंटेन्टमेट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा जारी केलेल्या मानक कार्यप्रणाली/ उद्या दिनांक 25 ऑक्टोबरपासून सुरु  करण्याचे  आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा दि. 25 ऑक्टोबर पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासाठी मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कंटेन्टमेन्टच्या झोनच्या बाहेरील उद्या दि. 25 आक्टोबर पासून सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

सर्व संबंधीत व्यायामशाळांकडून परिशिष्ट - 1 मध्ये नमूद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करण्याचे अधिकारी त्या त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत आहेत.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असा, इशाराही देण्यात आला आहे.

परिशिष्ट-1

कन्टेटमेंट झोनच्या बाहेरील सर्व व्यायामशाळा दिनांक 25/10/2020 पासून संचालन / सुरु करणेबाबत मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक‍ तत्वे खालीलप्रमाणे राहतील.

सामाईक बंधनकारक सूचना –

1)     कोव्हीड -19 संसर्ग कमी करण्याबाबत सामाईक प्रतिबंधात्मक योजना मध्ये जसेकी सार्वजनिक आरोग्य चांगले राखणेबाबतच्या बाबीचा समावेश असेल. व्यायामशाळा व परिसरामध्ये प्रतिबंधात्मक बाबीचे निरिक्षण व पालन सर्वाकडून ( व्यायामशाळा येणारे सदस्य, भेट देणार व कर्मचारी वर्ग) केले जाईल.

अ)   वैयक्तिक सर्वानी शक्ततोवर कमीत कमी 6 फूट अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. 

ब)  व्यायामशाळा व परिसरामध्ये सर्व वेळी चेहऱ्यावर मास्क/ चेहरा कव्हर वापरणे बंधनकारक असेल. परंतू व्यायामशाळेमध्ये प्रत्यक्ष व्यायाम करत असताना N-95 मास्क चा वापर केल्यास श्वासोश्वासामध्ये अडथळे येऊ शकतात. त्याअनुषंगाने व्यायाम करत असताना सर्जीकल मास्क अथवा मल्टी लेअर असलेले कापडी मास्क , कापूस मिश्रणांचे घट्ट विणलेले जे सुरक्षितपणे नाक, तोंड आणि हनवटीच्या खाली व्यवस्थित बसतील ते वापरणे योग्य असेल. तसेच व्यायामादरम्यान सिंगल लेअर कपडयाचे मास्क वापरता येतील.

क) हात अस्वच्छ नसलेतरी साबणाचा वापर करून (कमीत कमी 40 ते 60 सेंकदापर्यत) हात धुणे. जेथे शक्य असले तेथे अक्लोहोल आधारित हॅण्ड सॅनिटायझर ( किमान 20 सेंकद) चा वापर करणे बंधनकारक असेल.

ड) नाक व श्वासोश्वासाविषयीचा शिष्टाचार कडकपणे पाळणे. जसेकी खोकतांना किंवा शिंकताना नाक व तोंड हे टिश्यू पेपर/ रुमाल/ कोपर वळवून पूर्ण झाकले जाईल याची खबरदारी घेणे. व वापरलेला टिश्यू पेपरचा तात्काळ योग्य पध्दतीने विल्वेवाट लावणे.

इ) व्यायामशाळेत येणाऱ्या व भेट देणाऱ्या सर्वानी स्वताच्या आरोग्याचे निरिक्षणे करणे आणि आजारी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक असेल.

फ) व्यायामशाळा व परिसरामध्ये थुंकण्यास पूर्ण पणे प्रतिबंध असेल.

ग) व्यायामशाळेत येणाऱ्या ( व्यायामशाळा येणारे सदस्य, भेट देणार व कर्मचारी वर्ग ) सर्वाना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक असलेबाबत सूचित करणे.

सामाईक प्रतिबंधात्मक उपाययोजना 

1)     कन्टेटमेंट झोनच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व व्यायामशाळा या बंदच राहतील. फक्त कन्टेटमेंट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरू करणेस परवानगी असेल.

2)     सर्व व्यायामशाळा संचालकांना केंद्र शासन, राज्य शासन यांचेकडून वेळोवेळी कोव्हीड -19 संसर्ग रोखणेबाबत निर्गमित केलेल्या आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचना / SOP / अधिसूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

3)     65 वर्षावरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुलांना व्यायामशाळेच्या बंधिस्त परिसराचा वापर व्यायामासाठी करता येणार नाही. व्यायामशाळेचे व्यवस्थापन करणारी संस्था यांनी सदस्य, अभ्यागत आणि कर्मचारी वर्गास याप्रमाणे सूचना देणे बंधनकारक असेल.

व्यायामशाळा सुरू करणेबाबत विशिष्ट उपाययोजना –

अ)   व्यायामशाळा सुरू करणेपूर्वी योग्य प्लेसमेंट किंवा उपकरणे यासह प्रक्रिया आणि परिसर पुनर्निदेशित करणे.

I)      व्यायामशाळा मजला क्षेत्राचे प्रत्येक व्यक्तीस 4 चौ. मीटर वर आधारित नियोजन करणे.

II)   सामाजिक अंतर राखले जाणेसाठी Cardio & Strength  उपकरणे हलवून कमीत कमी 6 फूट अंतरावर ठेवणे. व्यायामादरम्यान शारीरिक श्रम केल्याने श्वास बाहेर टाकणे व तीव्रता यामध्ये  वाढ होत असल्याने कोव्हीड -19 चा संसर्ग रोखणेसाठी सामाजिक / शारीरिक अंतर राखणे महत्वाचे आहे. श्वासाची गती व तीव्रता वाढविणाऱ्या व्यायामासाठी असलेल्या उपकरणा दरम्यान 12 फूट अंतर राखले जावे. तसेच श्वासाची गती व तीव्रता वाढविणाऱ्या व्यायामाव्यतिरिक्त इतर व्यायाम प्रकाराच्या साधानामध्ये कमीत कमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल. जिथे शक्य असेल त्या ठिकाणी X  पॅर्टनमध्ये उपकरणांची मांडणी करावी जेणेकरून जास्तीत जास्त अंतर राखले जाईल. इतर प्रत्येक मशीन बंद करा किंवा उपकरणे इतरत्र हलवा जेणेकरून जागा उपलब्ध होईल.

III)जेथे उपलब्ध असेल तेथे उपकरणे हलवून व्यायामशाळेच्या बाहेरील जागेचा वापर करावा.

IV)व्यायामशाळेमध्ये व्यायामासाठी असलेल्या बंधिस्त भागात प्रवेश आणि व्यायाम करताना विशिष्ट खुणा आणि रांगा यांचे मार्कीग करावे.

V)   6 फूटाचे सामाजिक अंतर राखले जाईल, याअनुषंगाने व्यायामशाळेच्या आत व बाहेरील परिसरात विशिष्ट खुणासह रांगाचे व्यवस्थापन करावे.

VI)संपर्क न येणाऱ्या कार्ड आधारित ऑनलाईन पेंमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

VII)वातानुकूलन / व्हेटिंलेशनसाठी CPWD  ने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल जसेकी सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान सेंटींग 24 ते 30 सेल्सियस, सापेक्ष आर्दता 40 ते 70 % राखली जाईल त्याचबरोबर जास्तीत जास्त स्वच्छ हवा आतमध्ये येईल आणि Cross व्हेटिंलेशन पुरेशे असेल.

VIII)सामान्य व्यायामशाळा मजला, विशिष्ट व्यायाम क्षेत्र आणि कर्मचारी खोल्यामध्ये कमीत कमी कर्मचारी आणि सदस्य राहतील यासाठी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

. विशिष्ट भागात परवानगी असलेल्या सदस्यांची संख्या कमीत कमी ठेवावी.

. विशिष्ट व्यायामासाठी फिटनेस सेशन लागू करून विशिष्ठ सत्रासाठी सदस्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करून घेऊन त्यांना नेमून दिलेल्या वेळेमध्ये  प्रवेश देणे.

IX)योग्य सामाजिक अंतर राखून लॉकर सुविधेचा वापर करावा.

X)   डस्टबिन व कचरापेटी हे नेहमीच झाकलेले राहील याची खात्री करणे.

XI)जेथे लागू असेल तेथे स्पा, सौना, स्टीम बाथ आणि जलतरण तलाव हे बंद राहतील.

निर्जतुकीकरण –

वैद्यकीयदुष्टया परवानगी असलेल्या निर्जतुक साधनांचा वापर करून व्यायामशाळा आणि परिसर निर्जतुकीकरण करणे बंधनकारक असेल. यामध्ये खालील बाबींचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक असेल.  ( याव्यतिरिक्त ही इतर बाबींचे निर्जतुकीकरण करता येईल)

i.        व्यायामशाळा इमारतीमधील प्रवेशव्दार, खोल्या.

ii.     कर्मचारी , सदस्य आणि अभ्यागत यांनी वापरलेले सर्व खुल्या जागा.

iii.   वॉशरुम व शौचालय.

iv.    Shoe Bath. (सदस्यांना स्वतंत्र कसरत शुज घेणेस प्रोत्साहित करावे) .

v.      वारंवार स्पर्श केले जात असलेले सर्व पृष्ठभाग / जागा ( Door knobs, Handles etc.)

vi.    व्यायामशाळेतील उपकरणे.

व्यायामशाळेतील व्यायामक्रियेचे नियोजन आणि वेळापत्रक –

i.        व्यायामशाळेतील उपकरणांच्या फेर मांडणी नंतर उपलब्ध होणाऱ्या प्रति सत्र जास्तीत जास्त क्षमतेचे मोजणी करावी आणि त्याप्रमाणे सत्राचे वेळापत्रक तयार करून सदस्यांना सुचित करावे.

ii.     गट फिटनेस रुम व वर्ग 

अ)   प्रत्येक सत्रामध्ये सदस्यांचे येत जात असताना होणारा संपर्क टाळणेसाठी वर्ग सत्र व वेळामध्ये कमीत कमी 15 ते 30 मिनिटाचा कालावधी राखणे.

ब) जेथे शक्य असेल त्या ठिकाणी ग्रुप फिटनेस वर्ग हे ऑनलाईन पध्दतीने घ्यावेत.

क) खोलीचा आकार आणि व्यायामाच्या स्वरूपावर प्रत्येक गट फिटनेस वर्गामध्ये परवानगी  असलेल्या सदस्यांची संख्या प्रतिबंधित करावी.

व्यायामशाळेतील वैयक्तिक प्रशिक्षण –

अ)   वैयक्तिक प्रशिक्षणा दरम्यान जेथे शक्य असेल तेथे प्रशिक्षक व ग्राहक यांच्यामध्ये 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल.

ब) सत्रामध्ये फक्त अशा व्यायामाचा व उपकरणांचा वापर / समावेश करावा की ज्यामध्ये प्रशिक्षक आणि ग्राहक यांच्यामध्ये कमीत कमी सामाजिक संपर्क येईल. 

क) व्यायामाच्या प्रति सत्रामध्ये ग्राहकामध्ये पुरेसे अंतर राखले जाणेच्या दृष्टीने कमीत कमी पुरेसे सदस्य / ग्राहकांची संख्या निश्चित करावी.

ड) जिथे उपलब्ध असेल तेथे व्यायामशाळेच्या बाहेरील परीसराचाही वापर करावा.

कर्मचाऱ्यांसाठी 

अ)   सामाजिक अंतर राखणेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची शिफ्ट आणि उपस्थिती सुनिश्चित करावी.

ब)  कन्टेटमेंट झोनमध्ये रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यत कन्टेटमेंट झोन बंद होत नाही, तोपर्यत व्यायामशाळेमध्ये प्रवेश देणेत येवू नये.

क) कचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचारी वर्गास मार्गदर्शक सूचनांची माहिती आणि प्रशिक्षण देणेत यावे.

ड) अधिक जोखिम असलेल्या जसेकी वयस्कर, गर्भवती महिला कर्मचारी व्याधीग्रस्त कर्मचारी यांच्याबाबत अधिक सावधगिरी बाळगावी. त्यांना ग्राहकांशी थेट संपर्क येणाऱ्या कामामध्ये समावेश करू नये.

पुरवठयाची उपलब्धतता आणि व्यवस्थापन 

i.        व्यायामशाळेचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेने सदस्य, अभ्यागत आणि कर्मचारी वर्गासाठी वैयक्तिक सुरक्षीततेची साधने जसेकी मास्क, फेस कव्हर, हॅण्ड सॅनिटायझर याची पुरेश्या प्रमाणात उपलब्धतता करावी.

ii.     सदस्य आणि कर्मचारी यांना व्यायामाचे उपकरण , व्यायामापूर्वी आणि नंतर स्वच्छ करणेसाठी पुरेश्या प्रमाणात निर्जतुकीकरण वाइप्स, सोल्युशन आणि नष्ट करण्याजागे पेपर टॉवेल्सची उपलब्धतता करावी.

iii.   व्यायामापूर्वी सदस्यांच्या O2 Saturation ची नोंद करणेसाठी पल्स ऑक्सीमीटरची उपलब्धता करावी.

व्यायामशाळा उघडल्यानंतर –

        प्रवेशावेळी -

i.        व्यायामशाळेमध्ये प्रवेश करताना प्रवेश व्दाराजवळ  हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंनसर व थर्मल स्क्रिनिंगची सोय करावी.

ii.     व्यायामशाळेमध्ये केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींना ( कर्मचाऱ्यांसह) प्रवेश असेल.

iii.   व्यायामशाळेमध्ये फक्त चेहरा कव्हर / मास्क वापरणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश बंधनकारक असेल.   (No Mask – No Entry)

iv.    व्यायामशाळेमध्ये सर्व सदस्य / अभ्यागत व कर्मचारी यांनी धोका ओळखणेसाठी पूर्ण वेळ आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.

v.      व्यायामशाळा परिसरामध्ये व आतील बाजूस कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयक पोष्टर स्टिकर्स ठळकपणे दर्शविणेत यावी. कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या जनजागृती बाबत असलेल्या Audio & Video क्लिप  नियमितपणे सुरू ठेवाव्यात.

vi.    रांगेमध्ये नेहमीच 6 फूट सामाजिक अंतर राखावे.

vii. पुरेसे सामाजिक अंतर राखले जाणेच्या दृष्टीने पार्कीगच्या ठिकाणे , कॉरीडॉर आणि लिफ्टमधील गर्दीचे व्यवस्थापन करावे.

viii.           सदस्य / अभ्यांगताना व्यायामशाळेमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राखणेच्या दृष्टीने आणि परिसर व उपकरणे यांचे निर्जतुकीकरण करणेसाठी वेळा राखीव ठेवून स्वंतत्र सत्र निहाय वेळा निश्चित करून द्याव्यात.

ix.    व्यायामशाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या सर्व सदस्य आणि अभ्यागताची नोंदणी ( पूर्ण नांव, पत्ता, मोबाईल क्रंमाक इत्यादी) स्वंतत्र रजिस्टरमध्ये केली जाईल.

व्यायामशाळेत Cardio & Strength Training  उपकरणे वापरून व्यायाम करणेपूर्वी. –

i.        वापर करावयाची सर्व उपकरणे तसेच पुन्हा पुन्हा स्पर्श केल्या जाणाऱ्या जागा इत्यादीचे निर्जतुकीकरण करावे.

ii.     व्यायामशाळेत येणाऱ्या सदस्य, अभ्यागत, कर्मचारी यांच्या हाताच्या मधल्या बोटाचे निर्जतुकीकरण करून पल्स ऑक्सीमिटरच्या सहाय्याने O2 Saturation ची तपासणी करावी. ज्याची O2 Saturation  95 % पेक्षा कमी असेल त्यांना व्यायामासाठी परवानगी देणेत येवू नये व त्यांच्याबाबत जवळ असलेल्या आरोग्य यंत्रणेस सूचना देवून संदर्भीत करावे.

iii.   प्रत्येक व्यायामाच्या उपकरणाजवळ हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन असावे.

iv.    व्यायामाच्या साधानांचा वापर करणेपूर्वी हात स्वच्छ केले जात असलेबाबत खात्री करावी.

व्यायाम सत्राच्या दरम्यान –

i.        व्यायामसाठी सर्वासाठी एकत्र असलेल्या मॅटचा वापर टाळावा यासाठी सदस्यांना त्यांची स्वंतत्र मॅट आणणेस सूचित करावे जे की ते परत घेवून जाऊ शकतील.

ii.     कोव्हीड -19 संसर्गाचा संभ्याव धोका लक्षात घेता, शक्य तेथे संगीत / गाणी वाजवली जाऊ शकतात. परंतू  ओरडणे / हास्य योगा यांना परवानगी असणार नाही.

iii.   श्वास घेणेमध्ये अडथळा येत असल्यास तात्काळ व्यायाम बंद करून O2 Saturation ची तपासणी करावी. ज्याची O2 Saturation  95 % पेक्षा कमी असेल त्यांना व्यायामासाठी परवानगी देणेत येवू नये व त्यांच्याबाबत जवळ असलेल्या आरोग्य यंत्रणेस सूचना देवून संदर्भीत करावे.

व्यायामानंतर आणि कॉमन परिसराबाबत –

i.        झाकण असलेल्या डस्टबिनचा वापर करून फेस कव्हर, मास्क, वापरलेले टॉवेल यांची योग्य विल्वेवाट लावावी.

ii.     वॉशरूममधील शॉवर परिसर व इतर भागांचे वापर करणेपूर्वी आणि वापरानंतर निर्जतुकीकरण करणे.

iii.   व्यायामाचे प्रत्येक सत्र संपलेनंतर इतर सदस्यांनी व्यायाम सुरू करणेपूर्वी व्यायामाची उपकरणे , पुन्हा पुन्हा स्पर्श केल्या जाणाऱ्या जागा ( Hand rails, Benches etc.) यांची स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे.

iv.    व्यायाम सत्रा दरम्यान मजल्यांची स्वच्छता करावी.

व्यायाम शाळा बंद करताना –

i.        शॉवर रुम आणि लॉकर/ चेंजिंग रूम यांचे निर्जतुकीकरण करावे.

ii.     सर्व वॉशरुमची खोलवर साफसफाई केली जाईल याची खात्री करणे.

iii.   व्यायाम शाळा बंद करणेपूर्वी सर्व परिसराचे निर्जतुकीकरण करावे.

व्यायामशाळा परिसरामध्ये संशयित प्रकरणी करावयाच्या अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाययोजना –

i.        आजारी असलेल्या व्यक्तीला इतरापासून दूर अशा स्वंतत्र खोली अथवा वेगळया असलेल्या भागामध्ये ठेवावे.

ii.     डॉक्टरांकडून तपासणी केली जात नाही तोपर्यत मास्क / चेहरा कव्हर संबंधितास वापरणेस द्यावा.

iii.   तात्काळ जवळ असलेल्या आरोग्य यंत्रणेला ( दवाखाना / क्लिनिक) माहिती द्यावी अथवा जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावे.

iv.    संबंधित आजारी व्यक्तीबाबत सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणामार्फत ( जिल्हा रॅपिड रिस्पॉन्स टिम / चिकित्सक) यामार्फत पुढील कार्यवाही केली जाईल आणि त्याअनुषंगाने Contact Tracing , सदर आजारी व्यक्तीवरील उपचार आणि निर्जतुकीकरण विषयक बाबी पार पाडल्या जातील.

v.      संबंधित व्यक्ती कोव्हीड -19 +Ve आढळल्यास संपूर्ण परिसराचे निर्जतुकीकरण करावे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.