इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदारांची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र आवश्यक

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्ववार्षिक निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित झाला आहे. सदर निवडणूकीचे मतदान मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार असून मतमोजणी गुरूवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. 

मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त खालील नमुद कागदपत्रे आयोगाच्या निर्देशानुसार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

यामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायविंग लायसन्स), पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य/केंद्र शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य खाजगी उद्योग समूहांनी कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र, लोकसभा व राज्यसभा सदस्य/विधानसभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना निर्गमित केलेली अधिकृत ओळखपत्र, पदवीधर/शिक्षक मतदार संघामधील शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना संबंधित संस्थांनी निर्गमित केलेले ओळखपत्र, विद्यापीठाने निर्गमित केलेले पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.