गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध सर्व्हेक्षण मोहीम सर्व सहभागाने यशस्वी करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 




संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान-  2020

 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : अदयापही निदाना पासून वंचित असणाऱ्या क्षयरोग कुष्ठरुग्ण, गृहभेटीव्दारे शोधून काढण्यासाठी रुग्णशोध मोहीम राबविण्याचे ठरविलेले आहे. कोव्हिड 19 च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाचे तुलनेत अत्यंत कमी झालेले आहे. भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक उपाययोजना म्हणून संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवावी. सर्व्हेक्षण मोहीमत कोव्हिड संशयित सापडल्यास त्यांची ही त्वरित तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.  

संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण मोहीम कुष्ठरुग्ण शोध अभियानाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे जिल्हा श्यल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी , सहायक संचालक, (कुष्ठरोग) डॉ.  पी. आर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ, डॉ. विनोद मोरे ,डॉ. प्रकाश पवारा, डी. टी. सी. वैद्यकीय अधिकारी डॉ.  मानसी कदम, डॉ. विनायक भोई समिती सदस्य उपस्थीत होते.

          जिल्हात 1डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020या दरम्यान मोहीम राबविण्यात येणार आहे. रुग्ण शोधण्याचे  प्रमाण वाढविणे, समाजामध्ये या रोगांबददल जास्तीत जास्त जनजागृती करणे. रोगाबददलची शास्त्रोक्त माहिती लोकांपर्यंत पोहचविणे लवकर निदान करणे रुग्णांना लवकरात लवकर उपचारावर घेणे. ही या मोहीमेची ध्येआहेत. 12 तालुक्यांतर्गत कार्यक्षेत्रांची एकूण 3482726 लोकसंख्या 696545 इतकी घरांची निवड करण्यात आलेली आहे. मोहीमेसाठी एकूण 2846 पथके 5692 इतके कर्मचारी काम करणार आहेत. मोहीमेसाठी कोल्हापूर ग्रामीण मधील 100 टक्के लोकसंख्या शहरी भागातील 30 टक्के  लोकसंख्या निवडलेली आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी संगणक सादरीकरणाद्वारे दिली.

          डॉ. कुंभार म्हणाल्या, एकूण 14 दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.  दररोज एका टिम नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात प्रत्येक पथकाद्वारे दर दिवशी 20 घरे शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. घरातील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल, महिला सभासदांची तपासणी आशा महिला स्वयंसेविकेमार्फत पुरुष सभासदांची तपासणी टीम मधील पुरुष कर्मचारी स्वयंसेवका मार्फत  करण्यात येईल. ऑटोरिक्षाव्दारे माइकिंग,पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके, पथनाट्य, आकाशवाणी वरील मुलाखती द्वारे या मोहिमेचे जनजागरण करण्यात येणार आहे.

क्षयरोगाची लक्षणे जसे-  दोन आठवडयापेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ.

 प्राथमिक टप्प्यात जर औषधे व्यवस्थित नाही घेतली तर औषधाला दाद देणारा (एम.डी.आर.टी.बी.) रोग होऊ शकतो. एम.डी.आर.टी.बी. चे त्वरीत निदान व्हावे म्हणून सी.बी.नेट मशीन सारखे अदयावत मशीन सी. पी.आर. सावित्रिबाई फुले हॉस्पिटल तर उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आय. जी. एम. हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपलब्ध आहे. या मशीनद्वारे 2 तासामध्ये टी.बी. आणि एम. डी. आर. (रिफाम्पसिन रेझिन्स्टन्ट ) आहे का नाही हे तपासले जाते. एच. आर. सी. टी. /एक्सरे/ सोनोग्राफी इ. तपासण्या जिल्हा क्षयरोग केंद्रात पूर्णपणे मोफत केल्या जातात.

कुष्ठरोगाची लक्षणे जसे- त्वचेवर,फिकट/लालसर,बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम येणे, जाड,बधीर,तेलकट,/चकाकणारी  त्वचा, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण पणे बंद करता ने येणे

लक्षणे असणा-या व्यक्तींनी मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वयंसेवकांकडून योग्य ती माहिती द्यावी स्वयंसेवकांकडून तपासणी करून घ्यावी. एच.आर.सी.टी./एक्स.रे/ सोनोग्राफी इ. निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या जिल्हा क्षयरोग केंद्रात पूर्णपणे मोफत केल्या जातात. लवकर निदान, उपचार तसेच रुग्ण पोषण आहार इत्यादी योजनांचा लाभ घेऊन जिल्हा क्षयमुक्त कुष्ठरोगमुक्त,निरोगी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी केले.

00000

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.