इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

अटल वयो अभ्युदय योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): ज्येष्ठ नागरिकांसाठी सन 2021-22 अंतर्गत केंद्र पुरस्कृत अटल वयो अभ्युदय योजनेसाठी ई-अनुदान पोर्टलव्दारे खुली अधिसूचना आणि ई-अनुदान पोर्टलव्दारे अर्ज मागविले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारतर्फे 30 मे पर्यंत अर्जासाठी ई-अनुदान प्रणाली सुरू होणार आहे. इच्छुक संस्थांनी वृध्दाश्रम स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाच्या https://grants-msje.gov.in/ngo-login (ई-अनुदान प्रणाली)Scheme-atalVayoAbhyudayYojna (AVYAY) या प्रणालीवर आपले परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

25 लाभार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वृध्दाश्रमांची देखभाल. 50 लाभार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वृध्दाश्रमांची देखभाल, 50 वृध्द महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वृध्दाश्रमांची देखभाल. अल्झाईमर रोग/डिमेंशियाग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी संलग्न केअर होम आणि वृध्दाश्रमांची देखभाल, प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्राची देखभाल, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईल मेडिकेअर युनिटची देखभाल (फक्त चालू प्रकल्प) व ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी क्लिनिक (केवळ चालू प्रकल्प) या प्रकल्पांतर्गत या योजना अंमलात येणार आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.