इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

आजअखेर 56 हजार 359 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2716 प्राप्त अहवालापैकी 2201 अहवाल निगेटिव्ह तर 417 अहवाल पॉझिटिव्ह (98 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1351 प्राप्त अहवालापैकी 1001 अहवाल निगेटिव्ह तर 350 अहवाल पॉझिटिव्ह (तर 138 आरटीपीसीआरला पाठवले). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1174 प्राप्त अहवालापैकी 691 निगेटिव्ह तर 483 पॉझीटिव्ह  असे एकूण 1250 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 39 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 67 हजार 975 पॉझीटिव्हपैकी 56 हजार 359 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9359 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1250 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-117, भुदरगड-31, चंदगड-16, गडहिंग्लज-112, गगनबावडा-6, हातकणंगले-66, कागल-21,  करवीर-164, पन्हाळा-70, राधानगरी-33, शाहूवाडी-5, शिरोळ-64, नगरपरिषद क्षेत्र-107 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 303, इतर जिल्हा व राज्यातील-135 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1409, भुदरगड- 1719, चंदगड- 1465, गडहिंग्लज- 2151, गगनबावडा- 244, हातकणंगले-6911, कागल-2055, करवीर-7749, पन्हाळा- 2557, राधानगरी- 1519, शाहूवाडी-1799, शिरोळ- 3450, नगरपरिषद क्षेत्र-9440, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 21 हजार 695 असे एकूण  64 हजार 163 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 3 हजार 812 असे मिळून एकूण 67  हजार 975  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 67 हजार 975 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 56 हजार 359 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 257 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9359 इतकी आहे.

0000000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.