गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत सन २०२१-२२ या वर्षात दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यासह), अशा लाभार्थ्यांनी 16 जानेवारी 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

       

(निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी दि. 16 जानेवारी 2022 रोजी  रात्री 12 वाजेपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://ah.mahabms.com

अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव : AH-MAHABMS (google play store

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी: 16 जानेवारी 2022 (रात्री 12 वाजेपर्यंत)

 

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.