इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

         कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : कोविड-19 मुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी संबंधितांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व सर्व तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती किंवा संबंधित तालुका संरक्षण अधिकारी कार्यालयामध्ये जमा करावीत, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.व्ही.पाटील यांनी केले आहे.

आर्थिक सहाय्याची कमाल मर्यादा 10 हजार रुपये इतकी असेल व एका बालकांस एकाच वेळी रक्कम देता येईल. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास यापूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या प्रस्तावधारकांनी परत प्रस्ताव सादर करू नये.

प्रस्ताव सादर करण्यासाठी मागणी अर्ज, शालेय शुल्क पावती, वसतिगृह शुल्क पावती, शैक्षणिक साहित्य खरेदी केल्याची विहित नमुन्यातील पावती, शालेय मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र, पालकाचा कोविडने मृत्यू झालेचा दाखला, प्रमाणपत्र, बालकाचे आधारकार्ड, पालक / बालक यांचे बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.