इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी रेमडीसीव्हीर व इतर औषधांची खरेदी करावी -जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 


कोल्हापूर, दि. २९ (जिल्हा माहिती कार्यालय)- जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांनी दाखल रुग्णांच्या उपचारासाठी रेमडीसीव्हीर आणि इतर औषधांची खरेदी बाजारातून करुन साठा ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खासगी रुग्णालयांना आज दिले.

     कोव्हीड-१९ बाधित रुग्णांसाठी रेमडीसीव्हीरचा वापर करण्यात येत आहे. या इंजेक्शनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने सद्यस्थितीत जिल्हा परिषदेकडे उपलब्ध होणाऱ्या साठ्यामधून गठित समितीच्या शिफारशीनुसार संदर्भीय पत्राद्वारे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी इंजेक्शन देण्यात येत आहेत. 

          ही इंजेक्शन बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करावा.  

रेमडीसीव्हीर (सिप्ला) अमीर अली ९५७५१२२७८६, विश्वासराज अहुजा ९८२०२७३५६७, वितरक कश्यप मोदी ९८२०२१४५५८, आशिष मिश्रा ९९६५४९११, तारकेश ९९०२४९८५९६, राकेश सिंग ९८६७९२२३५५, वितरक करण ९८२०६६८८०९, टॅब फॅव्हीपीरावीर (ग्लेनमार्क) ए जी प्रसाद ९८२०८५२९७७, वितरक स्वप्नील हर्णे ९३२६०२३९३०, यासाठी शासनाच्या समितीने दर निश्चिती केली आहे, ती अशी-रेमडीसीव्हीर १०० एम जी १ वाईल ३ हजार ३९२.४८ पै टॅब फॅव्हीपिरावीर २०० एम जी १ हजार ९९९.२० पै प्रती ३४ टॅब

     भविष्यातील रुग्ण संख्येतील वाढ विचारात घेवून आणि  जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी या इंजेक्शनची खरेदी करुन साठा ठेवावा. आवश्यकतेनुसार ही इंजेक्शन रुग्णांसाठी वापरावीत. खासगी रुग्णालयांनी केलेल्या या औषध खरेदीची तपासणी रुग्णालयांवरील नियुक्त नोडल अधिकारी करतील आणि तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला देतील. ज्या रुग्णांना शक्य असेल त्यांनीही ही औषधे थेट खरेदी करुन रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्यास हरकत नाही. 

      या औषधांच्या खरेदीमुळे जिल्ह्यात तुटवडा भासणार नाही. रुग्णांवरील उपचारासाठी ही औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे औषधं मागणीसाठी होणारी गर्दी कमी होवून, औषधं मिळणार की नाहीत, ही रुग्णांना वाटणारी धास्तीही कमी होईल. 

    याबाबत इंडीयन मेडीकल असोशिएशन आणि इंडीयन असोशिएशन ऑफ पिडियाट्रीक्स यांना पत्र पाठवून सर्व रुग्णालयांना कळविण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सूचना दिली आहे

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.