कोल्हापूर,
दि. 9 (जिमाका) :कासारी नदीच्या
दोन्ही तीरावरील भागात उन्हाळी हंगाम 2022-23 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा
करणाऱ्या उपसा यंत्रावर पाणी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे
विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.
कासारी(गेळवडे), ता. शाहुवाडी धरणापासून ठाणे-आळवे
कोल्हापूर पाटबंधाऱ्याच्या उर्ध्व भागापर्यंत नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या
व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या
उपसा यंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे. ही उपसाबंधी चालू मे महिन्यातील 14 व 15 मे
2023 असे 2 दिवस, 21 व 22 मे 2023 असे 2 दिवस, 28 व 29 मे 2023 असे 2 दिवस या
कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे.
उपसाबंदी कालावधीत पाण्याचा अनाधिकृत
उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1
वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते
जबाबदार राहणार नाही, असेही श्री. बांदिवडेकर यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.